Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

केस गळून टक्कल पडण्याची भीती वाटते? केसांच्या वाढीसाठी ‘या’ पद्धतीने करा केळीच्या सालीचा वापर, केस होतील घनदाट

केसांच्या घनदाट वाढीसाठी महिला सतत काहींना काही करत असतात. नेहमीच केमिकल ट्रीटमेंट करण्याऐवजी घरगुती उपाय करून केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारावी. जाणून घ्या केळी हेअर मास्क बनवण्याची कृती.

  • By सुरुची कदम
Updated On: May 10, 2026 | 09:50 AM
केस गळून टक्कल पडण्याची भीती वाटते? केसांच्या वाढीसाठी 'या' पद्धतीने करा केळीच्या सालीचा वापर

केस गळून टक्कल पडण्याची भीती वाटते? केसांच्या वाढीसाठी 'या' पद्धतीने करा केळीच्या सालीचा वापर

Follow Us
Follow Us:

सर्वच महिलांना घनदाट आणि मजबूत केस हवे असतात. केसांच्या वाढीसाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कधी हेअर ट्रीटमेंट करून घेतल्या जातात तर काहीवेळा वेगवेगळे हेअर शाम्पू, हेअर सीरम किंवा हेअर केअर प्रॉडक्टचा वापर करतात. पण वारंवार चुकीच्या पद्धतीने शाम्पू किंवा हेअर केअर प्रॉडक्टचा वापर केल्यास केस आणखीनच कोरडे आणि निस्तेज होऊन जातात. केसांच्या मुळांना आवश्यक पोषण न मिळाल्यामुळे केस कमकुवत होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे केसांच्या घनदाट वाढीसाठी कायमच घरगुती उपाय करावेत. धूळ, प्रदूषण आणि कडक उन्हात जास्त वेळ बाहेर फिरल्यानंतर सतत येणाऱ्या घामामुळे केस ओले होतात आणि केसांमध्ये कोंडा वाढतो.टाळूवर वाढलेल्या कोंड्यामुळे केसांना खूप जास्त खाज येते.(फोटो सौजन्य – istock)

उन्हामुळे चेहरा भाजून निघाला आहे? मग बटाट्याच्या रसाचा ‘या’ पद्धतीने करा वापर, त्वचेमधील जळजळ होईल कमी

धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता जाणीव मानसिक तणाव वाढल्यामुळे केवळ शरीरावरच नाहीतर त्वचा आणि केसांवर सुद्धा परिणाम दिसू लागतात. त्यामुळे केस स्वच्छ आणि कायमच चमकदार ठेवण्यासाठी कोणत्याही हेअर केअरचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करावेत. केळीची साल केसांसाठी खूप जास्त फायदेशीर ठरते. केळी खाल्ल्यानंतर साल फेकून दिली जाते. पण असे न करता केळीची साल ठेवून त्याचा हेअर मास्क बनवून केसांवर लावावा. केळीच्या सालीमध्ये पोटॅशियम, अँटिऑक्सिडंट्स आणि अनेक पोषक घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. यामुळे केसांची वाढ होते आणि केस सुंदर दिसतात.

केळीच्या सालीचा हेअर मास्क बनवण्याची कृती:

हेअर मास्क बनवण्यासाठी सर्वप्रथम, ताज्या केळीच्या सालीचे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यात टाका आणि बारीक पेस्ट करून घ्या. तयार केलेली पेस्ट वाटीमध्ये काढून त्यात खोबरेल तेल किंवा दही घालून व्यवस्थित मिक्स करा. तयार केलेले मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर केसांच्या मुळांपासुन ते अगदी टोकांपर्यंत सगळीकडे लावून घ्या. त्यानंतर हेअर मास्क ४० मिनिटं केसांवर लावून तसाच ठेवा. हेअर मास्क धुवून टाकण्याआधी हलक्या हाताने मसाज करावा. मसाज केल्यामुळे टाळूवरील घाण स्वच्छ होण्यास मदत होते.

Summer Special : लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल ही रेसिपी, नारळाच्या मलाईपासून बनवा ‘कोकोनट आईस्क्रिम’

केळीची साल केसांमध्ये वाढलेला कोंडा कमी करण्यास मदत करतो. ४० मिनिटं झाल्यानंतर केस पाण्याने स्वच्छ धुवून टाका. केळीच्या सालीचा हेअरमास्क लावल्यामुळे केस अतिशय सॉफ्ट आणि मुलायम होतील. याशिवाय केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल. खोबरेल तेल किंवा दह्याचा वापर केल्यामुळे केसांची नैसर्गिक चमक कायम टिकून राहील आणि केस मुलायम होतील. केसांची गुणवत्ता सुधारण्यासाठी केस कधीही गरम पाण्याने धुवू नयेत. केस स्वच्छ करण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करावा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Scared of hair loss and baldness use banana peel in this way for hair growth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2026 | 09:50 AM

Topics:  

  • hair beauty
  • hair care tips
  • home remedies

संबंधित बातम्या

ब्लॅकहेड्स- टॅनिंगमुळे त्वचा निस्तेज झाली आहे? मग चमचाभर मसूर डाळीचा ‘या’ पद्धतीने करा वापर, नॅचरल स्क्रबने त्वचा दिसेल सुंदर
1

ब्लॅकहेड्स- टॅनिंगमुळे त्वचा निस्तेज झाली आहे? मग चमचाभर मसूर डाळीचा ‘या’ पद्धतीने करा वापर, नॅचरल स्क्रबने त्वचा दिसेल सुंदर

मान आणि पाठीवर साचलेला मळ दूर करायचाय? मग घरीच अशाप्रक्रारे तयार करा बेसन-दह्याचा नैसर्गिक क्लींजर
2

मान आणि पाठीवर साचलेला मळ दूर करायचाय? मग घरीच अशाप्रक्रारे तयार करा बेसन-दह्याचा नैसर्गिक क्लींजर

चेहऱ्यावरील डलनेस होईल कमी? सोप्या पद्धतीने बीटरूटचा वापर करून घरीच करा फेशिअल, त्वचेवर येईल गुलाबी ग्लो
3

चेहऱ्यावरील डलनेस होईल कमी? सोप्या पद्धतीने बीटरूटचा वापर करून घरीच करा फेशिअल, त्वचेवर येईल गुलाबी ग्लो

सकाळी उठल्यानंतर पोटात कायमच जडपणा जाणवतो? मग ‘या’ पद्धतीने करा इरंडेल तेलाचे सेवन, आतड्यांमधील घाण होईल स्वच्छ
4

सकाळी उठल्यानंतर पोटात कायमच जडपणा जाणवतो? मग ‘या’ पद्धतीने करा इरंडेल तेलाचे सेवन, आतड्यांमधील घाण होईल स्वच्छ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.