केस अतिशय कोरडे झाले आहेत? मग केस धुवताना लावा 'हा' पदार्थ
सुंदर आणि चारचौघांमध्ये उठावदार दिसण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. केसांमध्ये सौंदर्य आणखीनच खुलून दिसते. पण बऱ्याचदा चुकीचे शॅम्पू किंवा हेअर केअर प्रॉडक्ट वापरल्यामुळे केस अतिशय निस्तेज होऊन जातात. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये केस भिजल्यानंतर बऱ्याचदा ते व्यवस्थित कोरडे होत नाही, ज्यामुळे केसांमध्ये कोंडा होणे किंवा केस अचानक गळू लागतात. केसांची वाढ खुंटल्यानंतर केस अतिशय लहान आणि रुक्ष दिसतात. त्यामुळे शरीराची काळजी घेण्यासोबतच केसांची सुद्धा काळजी घेणे जास्त गरजेचे आहे. प्रसिद्ध हेअर स्टायलिश जावेद हबीब केसांच्या निरोगी वाढीसाठी आणि केस मऊ चमकदार दिसण्यासाठी सोशल मीडियावर सतत काहींना काही शेअर करत असतात. त्यांनी सांगितलेले घरगुती उपाय केसांच्या वाढीवर सकारात्मक परिणाम करतात. आज आम्ही तुम्हाला प्रसिद्ध हेअर स्टायलिश जावेद हबीब यांनी केस मऊ होण्यासाठी केस स्वच्छ करताना कोणत्या पदार्थाचा वापर करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगितली आहे.(फोटो सौजन्य – istock)
पिंपल्समुळे त्वचा निस्तेज झाली आहे? ‘या’ कारणांमुळे चेहऱ्यावर येतात सतत पिंपल्स, जाणून घ्या सविस्तर
वातावरणातील बदलांमुळे शरीरासोबतच केसांचे सौंदर्य कमी होऊन जाते. केस अचानक तुटणे किंवा केसांमध्ये मोठ्या प्रमाणावर कोंडा होतो. अशावेळी महिला बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या हेअर ट्रीटमेंट करून घेतात. या ट्रीटमेंट केल्यानंतर काहीकाळ केस सुंदर आणि चमकदार दिसतात. मात्र कालांतराने पुन्हा एकदा केस कोरडे आणि अतिशय रुक्ष दिसू लागतात. त्यामुळे केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधरण्यासाठी घरगुती पदार्थांचा वापर करावा. यामुळे केसांवर नैसर्गिक चमक टिकून राहते.
आठवड्यातून दोनदा केस स्वच्छ धुवाने आवश्यक आहे. केस स्वच्छ ठेवण्यासाठी शॅम्पू आणि कंडिशनरचा वापर केला जातो. केस शॅम्पूने स्वच्छ धुतल्यानंतर कंडिश्नरमध्ये थोडं ग्लिसरिन मिक्स करून केसांवर लावावे. त्यानंतर काहीवेळ तसेच ठेवून पाण्याने केस स्वच्छ धुवून घ्या. केस धुवण्यासाठी कायमच कोमट किंवा थंड पाण्याचा वापर करावा. कधीही गरम पाण्याने केस धुवू नये. यामुळे केसांची चमक कमी होऊन केसांमध्ये कोरडेपणा वाढतो. ग्लिसरिन लावल्यामुळे केस अतिशय मऊ आणि मुलायम होतील.
केसांवर ग्लिसरीन नैसर्गिक ह्युमेक्टेंट म्हणून काम करते. यामुळे त्वचा आणि केसांमधील मॉईश्चर कायमच टिकून राहते. कंडीशनरमध्ये ग्लिसरीन मिक्स करून लावल्यामुळे केसांमध्ये वाढलेला कोरडेपणा कमी होतो आणि केस सुंदर दिसू लागतात. याशिवाय तुमचे कोरडे आणि निस्तेज झालेले केस सुधारण्यासाठी आठवड्यातून एकदा कंडिश्नरमध्ये ग्लिसरीन मिक्स करून लावावे. ग्लिसरीन तुम्ही पाण्यात मिक्स करून सुद्धा केसांवर लावू शकता. यामुळे केस अतिशय चमकदार आणि सुंदर दिसतील. याशिवाय दही, मध, मेथीच्या हेअर मास्कमध्ये ग्लिसरीन मिक्स करून केसांवर लावल्यास केस सुंदर चमकदार होतील.