चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या, डाग कमी करण्यासाठी 'या' फळांच्या सालींचा करा वापर
सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी फळांचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी आहारात नियमित हंगामी फळांचे सेवन करावे. फळे खाल्ल्यानंतर फळांच्या साली फेकून दिल्या जातात. पण याच सालींचा वापर तुम्ही त्वचा अधिक सुंदर आणि चमकदार करण्यासाठी करू शकता. फळांच्या सालींचा वापर आरोग्यासंबंधित अनेक समस्यांपासून सुटका मिळवून देण्यासाठी केला जातो. डाळिंब, केळी किंवा संत्र्याची साल काढून फेकून दिली जाते. पण असे न करता या सालींचा वापर करून तुम्ही फेसपॅक किंवा फेसमास्क बनवू शकता. अभिनेत्री भाग्यश्री तिच्या सोशल मीडियावर स्किन केअर, हेल्थ, हेअर केअर इत्यादीबद्दल सतत काहींना काही शेअर करत असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अभिनेत्री भाग्यश्रीने फळांच्या सालींचा वापर करून फेसपॅक बनवण्याची सोपी कृती सांगितली आहे. चला तर जाणून घेऊया सविस्तर.(फोटो सौजन्य – istock)
बऱ्याचदा धावपळीच्या जीवनशैलीमुळे आरोग्य आणि त्वचेकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. सतत काम करत राहिल्यामुळे त्वचेकडे दुर्लक्ष होते. यामुळे काहीवेळा डोळ्यांखाली काळी वर्तुळ किंवा सुरकुत्या येण्याची शक्यता असते. या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी महिला अनेक वेगवेगळ्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करतात. पण असे न करता घरगुती उपाय करून त्वचेची काळजी घ्यावी. त्वचेच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी केळीच्या सालीचा वापर करावा. यामुळे चेहऱ्यावर वाढलेल्या सुरकुत्या कमी होतात.
सर्वच महिलांच्या चेहऱ्यावर डार्क सर्कल्स असतात. हे डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी वेगवेगळ्या क्रीम किंवा मास्क लावले जातात. पण तरीसुद्धा त्वचा उजळदार दिसत नाही. अशावेळी फळांच्या सालींचा वापर करावा. केळीच्या सालींचा मास्क बनवण्यासाठी सर्वप्रथम, केळीची साल मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक वाटून पेस्ट तयार करा. तयार केलेली पेस्ट वाटीमध्ये काढून त्यात हळद, साखर घालून स्क्रब तयार करा. तयार केलेला स्क्रब संपूर्ण त्वचेवर लावून हलक्या हाताने मसाज करून घ्या. त्यानंतर काहीवेळ तसेच ठेवून त्वचा पाण्याने स्वच्छ करून घ्या. यामुळे त्वचेवर डेड स्किन कमी होते आणि चेहरा सुंदर दिसतो. त्वचेच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी केळीची साल अतिशय गुणकारी आहे.