पिंपल्समुळे त्वचा निस्तेज झाली आहे? 'या' कारणांमुळे चेहऱ्यावर येतात सतत पिंपल्स
वर्षाच्या बाराही महिने सर्वच महिलांसह पपुरुषांनासुद्धा त्वचेसंबंधित अनेक समस्या उद्भवते. चेहऱ्यावर सतत येणारे पिंपल्स, फोड, मुरूम, लाल रॅश इत्यादी समस्यांमुळे त्वचा अधिकच निस्तेज आणि कोरडी होऊन जाते. कामाच्या धावपळीमध्ये चेहऱ्याची जास्त काळजी घेतली जात नाही. बदलेल्या वातावरणाचा परिणाम चेहऱ्यावर लगेच दिसून येतो. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचा अधिकच तेलकट आणि चिकट होऊन जाते. त्यामुळे चेहऱ्यावर सतत पिंपल्स आणि मोठे फोड येतात. चेहऱ्यावर आलेले पिंपल्स आणि मुरुमांचे डाग घालवण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कधी स्किन केअर प्रॉडक्ट तर कधी महागड्या ब्युटी क्रीम, फेसमास्क इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. पण तरीसुद्धा चेहऱ्यावर सतत पिंपल्स येतात.(फोटो सौजन्य – istock)
पिंपल्स आल्यानंतर ते कमी करण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या ट्रीटमेंट केल्या जातात. पण तरीसुद्धा पिंपल्स कमी होत नाही. यामुळे त्वचा काहीकाळच सुंदर दिसते. पण कालांतराने पुन्हा एकदा त्वचेवरील ग्लो कमी होऊन जातो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावर कोणत्या कारणांमुळे पिंपल्स किंवा फोड येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
वाढलेले प्रदूषण, उन्हाचा त्रास, आहारात सतत होणारे बदल,जंक फूडचे अतिसेवन, कामाचा वाढलेला तणाव, मानसिक ताण, अपुरी झोप, पचनाच्या समस्या इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यासोबत त्वचेवर सुद्धा लगेच दिसून येतो. त्यामुळे दैनंदिन जीवनात चुकीच्या सवयी फॉलो न करता योग्य सवयी अंगीकारून शरीराची काळजी घेणे आवश्यक आहे. वारंवार अपचनाची समस्या उद्भवत असेल तर आहारात बदल करणे आवश्यक आहे. कारण आहारात होणाऱ्या बदलांच्या परिणामामुळे चेहऱ्यावर सतत पिंपल्स येतात. शरीराच्या पचनसंस्थेत बिघाड झाल्यानंतर आरोग्याला हानी पोहचते. अन्नपदार्थ व्यवस्थित पचन न झाल्यामुळे शरीरात उष्णता वाढते. शरीरात वाढलेल्या उष्णतेमुळे त्वचेवर सतत पिंपल्स किंवा मोठे मोठे फोड येतात. वारंवार गॅस होणे, आंबट ढेकर येणे इत्यादी लक्षणे दिसू लागल्यास आहारात सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे.
केसांमध्ये कोंडा होणे ही अतिशय सामान्य समस्या असली तरीसुद्धा यामुळे त्वचेचे नुकसान होते. केसांमध्ये वाढलेल्या कोंड्यामुळे चेहऱ्यावर किंवा पाठीवर बारीक बारीक मुरूम येतात. कपाळावर, भुवयांच्या आसपास किंवा मानेवर बारीक बारीक पिंपल्स येतात. हे पिंपल्स लवकर कमी होत नाहीत. अस्वच्छ केस किंवा केसांची योग्य पद्धतीने काळजी न घेतल्यास टाळूवर मोठ्या प्रमाणात कोंडा होतो. त्यामुळे केसांमध्ये वाढलेला कोंडा नियंत्रणात ठेवण्यासाठी वेगवेगळ्या ट्रीटमेंट केल्या जातात.