Analogue Paneer: तुम्हीही खात नाही ना बनावट पनीर? कसे तयार होते; आरोग्यासाठी किती धोकादायक
हेअर स्पा ही केस आणि टाळूची निगा राखण्यासाठी केली जाणारी उपचार प्रक्रिया आहे. यामध्ये केसांची स्वच्छता, टाळूला मसाज, पोषण देणारा हेअर मास्क आणि मॉइश्चरायझिंग उपचारांचा समावेश असतो. या प्रक्रियेमुळे टाळू स्वच्छ राहण्यास मदत होते आणि केसांना आवश्यक पोषण मिळते.
हेअर स्पामुळे कोरडे आणि निस्तेज केस मऊ व चमकदार दिसू शकतात. टाळूला मसाज मिळाल्याने रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते. तसेच केसांमधील कोरडेपणा कमी होतो. नियमित निगा राखल्यास केस अधिक व्यवस्थित आणि निरोगी दिसू शकतात.
तज्ज्ञांच्या मते, हेअर स्पा हा केस गळतीवर थेट उपचार नाही. टाळू स्वच्छ ठेवणे आणि केसांना पोषण देणे यामुळे केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते. मात्र, हार्मोन्समधील बदल, पोषणाची कमतरता, ताणतणाव किंवा वैद्यकीय कारणांमुळे केस गळत असतील, तर केवळ हेअर स्पावर अवलंबून राहणे योग्य ठरणार नाही. अशा परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे, जेणेकरुन केस गळण्यामागचे योग्य कारण समजू शकते.
हेअर स्पा हा मुख्यतः केसांना पोषण आणि मॉइश्चराइज्ड करणारा उपचार आहे. याउलट केराटिन किंवा हेअर बोटॉक्ससारख्या उपचारांमध्ये केसांना हेल्दी बनवण्यासाठी तात्पुरता रासायनिक प्रक्रियेचा वापर केला जातो. त्यामुळे नैसर्गिक केसांची निगा राखण्यासाठी अनेकजण हेअर स्पाला प्राधान्य देतात.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Choco Lava Cake: नो ओव्हन नो टेन्शन! घरच्या घरी बनवा चोको लावा केक! वाचा सोपी रेसिपी






