केसांची होईल दुप्पट वाढ! 'या' औषधी फुलांचा वापर करून घरीच बनवा हेअर टोनर
सर्वच महिलांना आपले केस कायमच सुंदर आणि चमकदार हवे असतात. केसांच्या वाढीसाठी सतत काहींना काही करत असतात. पण धूळ, माती, प्रदूषणामुळे केस अतिशय कोरडे आणि निस्तेज होतात. तर काहीवेळा मोठ्या प्रमाणावर केस गळू लागतात. केस गळण्यास सुरुवात झाल्यानंतर केसांमध्ये टक्कल पडेल की अशी भींती अनेकांच्या मनात निर्माण होते. केसांच्या समस्या उद्भवू लागल्यानंतर वेगवेगळ्या ब्रँडचे हेअर केअर प्रॉडक्ट. डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतलेली औषध इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. मात्र तरीसुद्धा केस चमकदार दिसत नाही. याशिवाय केस आणखीनच गळून पातळ होतात. केसांचे सौंदर्य दीर्घकाळ कायम टिकवून ठेवण्यासाठी कोणत्याही महागड्या ब्रँडचे हेअर केअर वापरण्यापेक्षा घरगुती उपाय करून केसांची काळजी घ्यावी.(फोटो सौजन्य – istock)
केस चमकदार आणि सुंदर दिसण्यासाठी महागड्या ट्रीटमेंट न करता घरगुती उपाय करून केसांची काळजी घ्यावी. केसांची नैसर्गिक चमक वाढवण्यासाठी घरगुती उपाय करावे. घरगुती उपाय आरोग्यासाठी कायमच प्रभावी ठरतात. केस गळणे, कोरडेपणा, डोक्यातील इंफेक्शन आणि केसांची वाढ थांबणे इत्यादी समस्या उद्भवू लागल्यानंतर घरगुती हेअर टोनरचा वापर करावा. आज आम्ही तुम्हाला औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या फुलांचा वापर करून हेअर टोनर बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. हे टोनर महिनाभर नियमित केसांसाठी वापरावे.
केसांच्या समस्या वाढू लागल्यानंतर कोणत्याही हेअर ट्रीटमेंट करून घेण्याऐवजी घरगुती उपाय करावे. हेअर टोनर बनवण्यासाठी मेथी दाणे, पाणी, लवंग, रोझमेरी, जास्वंदीची पाने,कढीपत्त्याची पाने, गुलाब पाणी, खोबऱ्याचे तेल, जास्वंदीची फुले इत्यादी पदार्थ लागतात.
हेअर टोनर बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या भांड्यात पाणी घ्या. पाण्यामध्ये मेथी दाणे, लवंग काड्या, रोझमेरी, जास्वंदीची पाने, कडीपत्त्याची पाने, जास्वंदीची फुले टाकून २४ तास तसेच ठेवून घ्या. ज्यामुळे सर्वच पदार्थांचा अर्क पाण्यामध्ये उतरेल. त्यानंतर पाणी १५ मिनिटं व्यवस्थित उकळवून घ्या. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करून पाणी गाळून घ्या. सगळ्यात शेवटी तयार केलेल्या पाण्यात गुलाब पाणी आणि खोबऱ्याचे तेल टाकून व्यवस्थित मिक्स करा. तयार केलेले पाणी तुम्ही फ्रिजमध्ये स्टोर करून ठेवू शकता. या पाण्यात असलेले गुणधर्म केसांच्या वाढीसाठी अतिशय महत्वाचे ठरतील. तयार केलेल्या टोनरचा आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा वापर करावा. केसांच्या मुळांपासून ते अगदी टोकांपर्यंत सगळीकडे तयार केलेले टोनर लावावे आणि काही तासांनंतर केस पाण्याने स्वच्छ धुवा.
केसांची काळजी घेण्यासाठी उपयुक्त टिप्स?
तुमच्या आहारात प्रथिने, जीवनसत्त्वे (विशेषतः बी-व्हिटॅमिन्स) आणि खनिजे (जसे की लोह आणि जस्त) भरपूर प्रमाणात असल्याची खात्री करा. यामुळे केसांच्या वाढीस मदत होते.केसांना नियमितपणे तेल लावा. नारळ, बदाम, किंवा ऑलिव्ह ऑइल यांसारखे नैसर्गिक तेल केसांसाठी चांगले असतात. तेल लावताना टाळू आणि केसांना हलक्या हाताने मसाज करा. यामुळे रक्ताभिसरण सुधारते.
केस धुण्यासाठी गरम पाणी चांगले की थंड पाणी?
गरम पाण्याने केस धुतल्यास ते स्वच्छ होतात, पण जास्त गरम पाणी टाळायला हवे.थंड पाण्याने केस धुतल्यास केसांतील ओलावा टिकून राहतो आणि केस चमकदार दिसतात
केसगळती थांबवण्यासाठी काय करावे?
केसगळतीचे कारण शोधणे आवश्यक आहे.संतुलित आहार, पुरेसा व्यायाम आणि ताण-तणाव टाळणे आवश्यक आहे.आवश्यक असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या, काही घरगुती उपाय जसे की, आवळा, मेथी, कढीपत्ता वापरणे फायदेशीर ठरू शकते.