
केसांच्या वाढलेल्या कोंड्यामुळे टाळूवर चिकटपणा वाढला आहे? मग एक चमचा मुलतानी मातीचा 'या' पद्धतीने करा वापर
पावसाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये केसांच्या समस्या मोठ्या प्रमाणावर वाढू लागतात. पाऊस पडून गेल्यानंतर वातावरणात निर्माण झालेल्या दमटपणामुळे किंवा केसांमध्ये वाढलेल्या कोंड्यामुळे टाळूवर खूप जास्त चिकटपणा वाढतो. टाळू आणि केस पूर्णपणे तेलकट, चिकट होऊन जाते. तेलकट झालेल्या केसांची हेअर स्टाईल करणे सुद्धा अवघड होऊन जाते. केसांमध्ये वाढलेला चिकटपणा आणि तेलकटपणा कमी करण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कधी शाम्पूमध्ये बदल केला जातो तर कधी बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या हेअर ट्रीटमेंट घेतल्या जातात. पण यामुळे मनासारखा परिणाम केसांवर दिसून येत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला टाळूवर वाढलेला चिकटपणा आणि तेलकटपणा कमी करण्यासाठी मुलतानी मातीचा वापर कशा पद्धतीने करावा, याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – istock)
मुलतानी माती, दही आणि पाणी इतकेच साहित्य लागणार आहे. मुलतानी मातीचा हेअर पॅक बनवण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये मुलतानी घेऊन त्यात दही मिक्स करा आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून मिश्रण बनवून घ्या. पेस्ट तयार करताना जास्त पातळ बनवू नये. त्यानंतर केसांच्या मुळांपासून ते अगदी टोकांपर्यंत सगळीकडे हेअर पॅक लावून केसांवर हलक्या हाताने मसाज करा.
हेअर पॅक लावण्यासाठी ब्रशचा सुद्धा वापर करू शकता. त्यानंतर केसांच्या मुळांवर हलक्या हाताने मसाज करा. मसाज केल्यामुळे केसांमधील धूळ, माती आणि प्रदूषणामुळे चिकट झालेले केस स्वच्छ होण्यास मदत होईल. मुलतानी मातीच्या वापरामुळे केसांमध्ये वाढलेला तेलकटपणा कमी होण्यास मदत होईल. त्यानंतर १० मिनिट ठेवून केस सौम्य शाम्पूचा वापर करून स्वच्छ धुवून घ्या. हा उपाय आठवड्यातून एकदा किंवा दोनदा करू शकता. यामुळे केसांना आवश्यक पोषण मिळेल.
मुलतानी मातीमध्ये मिनरल्स आणि अँटीबॅक्टेरिअल गुणधर्म मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. ज्याच्या परिणामामुळे टाळूवरील घाण स्वच्छ होते आणि केस अतिशय सॉफ्ट आणि मुलायम होण्यास मदत होते. केसांमध्ये कोंडा झाल्यानंतर खूप जास्त खाज येते. ही खाज कमी करण्यासाठी मुलतानी माती फायदेशीर ठरते. मुलतानी मातीच्या मिश्रणात दही, एलोवेरा जेल, खोबरेल तेल सुद्धा मिक्स करू शकता.
Ans: टाळूवर अतिरिक्त तेल, मृत त्वचेच्या पेशी आणि कोंडा साचल्यामुळे चिकटपणा जाणवू शकतो. ऑयली स्काल्प असल्यास ही समस्या अधिक जाणवू शकते.
Ans: मुलतानी माती अतिरिक्त तेल आणि अशुद्धता शोषून घेण्यास मदत करू शकते. त्यामुळे टाळू स्वच्छ आणि कमी तेलकट वाटू शकतो. मात्र कोंड्याचे मूळ कारण दूर करण्यासाठी ती हमखास उपचार नाही.
Ans: एक चमचा मुलतानी माती आवश्यकतेनुसार पाण्यात मिसळून पातळ पेस्ट तयार करू शकता. ती टाळूवर हलक्या हाताने लावून काही मिनिटांनी स्वच्छ धुवावी. टाळू कोरडा किंवा संवेदनशील असल्यास काळजी घ्यावी.