डोळ्यांमध्ये वाढलेल्या पिवळेपणाकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, लिव्हर कॅन्सर झाल्यानंतर शरीरात दिसून येतात 'ही' महाभयंकर लक्षणे
लिव्हर कॅन्सर होण्याची कारणे?
लिव्हर कॅन्सर झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे?
लिव्हर कशामुळे खराब होते?
शरीरातील अतिशय महत्वाचा अवयव लिव्हर आहे. लिव्हर शरीरासाठी ५० पेक्षा अधिक कामे करते. खाल्लेले अन्नपदार्थ व्यवस्थित पचन करणे, शरीरातील घाण बाहेर काढून टाकणे, रक्त शुद्ध करणे, शरीराला दीर्घकाळासाठी ऊर्जा देणे इत्यादी अनेक कामे लिव्हर करते. पण वारंवार खाल्लेल्या जंक फूडचा परिणाम लिव्हरच्या आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे कायमच शरीराची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. लिव्हरमध्ये साचून राहिलेल्या अनावश्यक चरबीचा परिणाम शरीराच्या कार्यावर लगेच दिसून येतो. फॅटी लिव्हर, लिव्हर सोरायसिस, लिव्हर कॅन्सर इत्यादी गंभीर समस्या उद्भवून आरोग्य बिघडते. लिव्हर कॅन्सर झाल्यानंतर सुद्धा शरीरात अतिशय सामान्य लक्षणे दिसू लागतात. गॅस, ॲसिडिटी, साधे इन्फेक्शन इत्यादी लक्षणे दिसू लागल्यानंतर दुर्लक्ष केले जाते. मात्र असे न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावेत. आज आम्ही तुम्हाला लिव्हर कॅन्सर झाल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसू लागतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – istock)
लिव्हर खराब झाल्यानंतर किंवा लिव्हरसबंधित कोणत्याही समस्या उद्भवल्यानंतर पोटाच्या उजव्या बाजूला वेदना होतात. काहीवेळा या वेदना अतिशय तीव्र असतात. पोटाच्या उजव्या भागात जर वारंवार वेदना किंवा जडपणा जाणवत असेल तर दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करणे आवश्यक आहे. पोटाच्या उजव्या बाजूला जर वारंवार वेदना होत असतील दुर्लक्ष करू नये.
शरीराला कोणत्याही गंभीर आजाराची लागण झाल्यानंतर सगळ्यात आधी दिसून येणारे लक्षण म्हणजे अचानक वजन कमी होणे, भूक न लागणे, सतत मळमळ ही लक्षणे दिसू लागतात. लिव्हर कॅन्सरची लागण झाल्यानंतर जेवणावरील इच्छा कमी होऊन जाते. कोणताही पदार्थ पाहिल्यानंतर उलट्या किंवा मळमळ जाणवू लागते. लिव्हरच्या कार्यात अडथळे निर्माण झाल्यानंतर शरीरात गंभीर लक्षणे दिसू लागतात. विषारी घटक बाहेर पडून जाण्याऐवजी शरीरात तसेच साचून राहतात.
लिव्हरसबंधित समस्या म्हणजे शरीराला कावीळ होणे. कावीळ झाल्यानंतर डोळे आणि त्वचा पूर्णपणे पिवळी होऊन जाते. रक्तातील ‘बिलीरुबिन’ नावाचा घटक व्यवस्थित बाहेर पडून न गेल्यामुळे शरीरावर पिवळेपणा वाढून आरोग्य बिघडते. बिलीरुबिन रक्तात तसेच साचून राहिल्यामुळे इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नये.
Ans: यकृतातील पेशींची असामान्य आणि अनियंत्रित वाढ म्हणजे यकृत कर्करोग होय, जो यकृताच्या पेशींपासून सुरू होतो.
Ans: दीर्घकाळ मद्यपान केल्याने यकृताला हानी पोहोचते.
Ans: ओटीपोटात दुखणे किंवा सूज येणे.वजन कमी होणे.






