Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बोरिंग पोहे सोडा, यंदा नाश्त्याला बनवा विदर्भ स्टाईल झणझणीत ‘तर्री पोहे’, सकाळचा नाश्ता होईल रंगतदार

Tarri Poha Recipe : महाराष्ट्रीयन घरात नाश्ता म्हटलं की पोहे आवर्जून बनवले जातात. पण तेच तेच पोहे खाऊन कंटाळा येतो, अशात पारंपरीक पदार्थालाच ट्विस्ट देऊन तुम्ही झणझणीत चवीचे तर्री पोहे तयार करू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 15, 2026 | 09:38 AM
बोरिंग पोहे सोडा, यंदा नाश्त्याला बनवा विदर्भ स्टाईल झणझणीत 'तर्री पोहे', सकाळचा नाश्ता होईल रंगतदार

बोरिंग पोहे सोडा, यंदा नाश्त्याला बनवा विदर्भ स्टाईल झणझणीत 'तर्री पोहे', सकाळचा नाश्ता होईल रंगतदार

Follow Us
Close
Follow Us:
  • नाश्ता म्हटलं की मराठी घरात पोहे हे नाव आलंच.
  • या पारंपरिक पदार्थांविषयी आपल्याला कितीही प्रेम असलं तरी सारखं सारखं तेच खाण कंटाळवाणं बनत.
  • पोह्यांना नवीन ट्विस्ट देऊन तुम्ही अधिक रुचकर असे तर्री पोहे तयार करू शकता.
महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीत नाश्त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सकाळी दिवसाची सुरुवात करताना हलके, पण चवीला दमदार असे काही खायची सवय आपल्याला लहानपणापासूनच लागलेली असते. अशाच नाश्त्यांमध्ये पोहे हे नाव प्रत्येक मराठी माणसाच्या मनात खास स्थान राखून आहे. कांदेपोहे, दाण्याचे पोहे, बटाट्याचे पोहे असे अनेक प्रकार आपण खातो; पण नागपूरची ओळख बनलेले तर्री पोहे हे त्याहून वेगळे, खास आणि जबरदस्त चवीचे असतात.

दर्याची सुकी दौलत! घरी बनवा आगरी कोळी स्टाईल ‘सुका जवळा’, रेसिपी आहे फार सोपी

तर्री पोहे म्हणजे साधे पोहे आणि तिखट, मसालेदार उसळ (तर्री) यांचा अप्रतिम संगम.  नागपूरच्या गल्लीगल्लीत सकाळी लवकर उघडणारी तर्री पोह्यांची टपरी, गरम वाफाळणारी तर्री आणि त्याभोवती जमलेली लोकांची गर्दी – हे दृश्य आजही अनेकांच्या आठवणींत कोरलेले आहे. घरीही अगदी सोप्या साहित्यांत आणि थोड्या वेळात ही रेसिपी तयार करता येते. चला तर मग, घरच्या घरी नागपूर स्टाइल तर्री पोहे कसे बनवायचे याची सोपी रेसिपी जाणून घेऊया.

साहित्य

पोहेसाठी:

  • जाड पोहे – 2 कप
  • कांदा – 1 मध्यम (बारीक चिरलेला)
  • तेल – 2 टेबलस्पून
  • मोहरी – 1 टीस्पून
  • हळद – ½ टीस्पून
  • हिरव्या मिरच्या – 2 (बारीक चिरलेल्या)
  • मीठ – चवीनुसार
  • साखर – चिमूटभर
  • लिंबाचा रस – 1 टेबलस्पून
  • कोथिंबीर – सजावटीसाठी
तर्री (उसळीसाठी):
  • मटकी/वाटाणे – 1 कप (भिजवून उकडलेले)
  • कांदा – 1 मोठा (बारीक चिरलेला)
  • टोमॅटो – 1 मध्यम (चिरलेला)
  • तेल – 3 टेबलस्पून
  • आलं-लसूण पेस्ट – 1 टेबलस्पून
  • लाल तिखट – 1 ते 1½ टीस्पून
  • गरम मसाला – ½ टीस्पून
  • गोडा मसाला – 1 टीस्पून
  • हळद – ½ टीस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • पाणी – आवश्यकतेनुसार
सजावटीसाठी:
  • शेव
  • बारीक चिरलेला कांदा
  • कोथिंबीर
  • लिंबाचे काप
संध्याकाळची हलकी भूक भागवण्यासाठी झटपट बनवा चविष्ट शेंगदाण्याचे चाट, पौष्टिक पदार्थांचा शरीराला होतील फायदा

कृती

  • सर्वप्रथम पोहे चाळणीत घेऊन हलक्या हाताने धुवा. पाणी निथळल्यावर त्यात मीठ, साखर आणि हळद मिसळा आणि बाजूला ठेवा.
  • कढईत तेल गरम करून त्यात मोहरी घाला. मोहरी तडतडल्यावर हिरव्या मिरच्या आणि कांदा घालून कांदा गुलाबी होईपर्यंत परता.
  • आता भिजवलेले पोहे कढईत घालून हलक्या हाताने परता. झाकण ठेवून 2–3 मिनिटे वाफ द्या. शेवटी लिंबाचा रस आणि कोथिंबीर घालून पोहे तयार ठेवा.
  • दुसऱ्या कढईत तेल गरम करून त्यात कांदा परता. कांदा लालसर झाला की आलं-लसूण पेस्ट घाला. त्यानंतर टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत शिजवा.
  • हळद, लाल तिखट, गोडा मसाला, गरम मसाला आणि मीठ घालून मसाला तेल सुटेपर्यंत परता.
  • उकडलेली मटकी/वाटाणे घालून थोडे पाणी टाका. झाकण ठेवून 5–7 मिनिटे उकळू द्या. तर्री थोडी पातळ आणि मसालेदार असावी.
  • प्लेटमध्ये पोहे घ्या, त्यावर गरमागरम तर्री ओता. वरून शेव, कांदा, कोथिंबीर आणि लिंबाचा रस घालून लगेच सर्व्ह करा.

Web Title: Have you try spicy tarri poha know the recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 15, 2026 | 09:37 AM

Topics:  

  • breakfast tips
  • Maharashtrian Recipe
  • marathi recipe

संबंधित बातम्या

दर्याची सुकी दौलत! घरी बनवा आगरी कोळी स्टाईल ‘सुका जवळा’, रेसिपी आहे फार सोपी
1

दर्याची सुकी दौलत! घरी बनवा आगरी कोळी स्टाईल ‘सुका जवळा’, रेसिपी आहे फार सोपी

रात्रीच्या जेवणाला अशाप्रकारे बनवा मसालेदार अन् खमंग ‘भरलेलं कारलं’, चव अशी की कडू पदार्थाचेही फॅन व्हाल
2

रात्रीच्या जेवणाला अशाप्रकारे बनवा मसालेदार अन् खमंग ‘भरलेलं कारलं’, चव अशी की कडू पदार्थाचेही फॅन व्हाल

तोच तोच पास्ता खाऊन कंटाळलात? मग आता 10 मिनिटांत बनवा ‘क्रिस्पी पास्ता’; संध्याकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय
3

तोच तोच पास्ता खाऊन कंटाळलात? मग आता 10 मिनिटांत बनवा ‘क्रिस्पी पास्ता’; संध्याकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय

लाडवांची झंझट सोडा यंदाच्या मकर संक्रांतीला घरी बनवा कुरकुरीत आणि खमंग ‘तिळाची पापडी’
4

लाडवांची झंझट सोडा यंदाच्या मकर संक्रांतीला घरी बनवा कुरकुरीत आणि खमंग ‘तिळाची पापडी’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.