संध्याकाळची हलकी भूक भागवण्यासाठी झटपट बनवा चविष्ट शेंगदाण्याचे चाट
संध्याकाळी शाळेतून घरी आल्यानंतर किंवा कामावरून थकून घरी आल्यानंतर सगळ्यांचं खूप जास्त भूक लागते. काहींना काही खाण्याची इच्छा होते. अशावेळी नाश्त्यात बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाल्ले जातात. वडापाव, भजी, कांदाभजी, शेवपुरी किंवा पाणीपुरी इत्यादी पदार्थ आणून खाल्ले जातात. पण वारंवार बाहेरील तिखट आणि तेलकट पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरात उच्च कोलेस्ट्रॉल जमा होण्यास सुरुवात होते. रक्तात वाढलेले कोलेस्ट्रॉल संपूर्ण शरीराला हानी पोहचवते. त्यामुळे नाश्त्यात घरी बनवलेल्या हेल्दी पदार्थांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये शेंगदाणा चाट बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो. त्यामुळे नाश्त्यात कायमच सहज पचन होणाऱ्या आणि शरीरास आवश्यक असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. शेंगदाणे हेल्दी फॅट्सने समृद्ध असतात. त्यामुळे नाश्त्यात किंवा इतर वेळी भूक लागल्यानंतर शेंगदाण्यांपासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन करावे. चला तर जाणून घेऊया शेंगदाणा चाट बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)






