Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

केसांची मूळ कमकुवत झाली आहेत? मग ‘या’ हिरव्या पानांचा वापर करून घरीच तयार करा नॅचरल आयुर्वेदिक तेल, केस होतील घनदाट

केसांच्या वाढत्या समस्या कमी करण्यासाठी कढीपत्ता आणि मेथी दाण्यांचा वापर करून घरी तयार केलेले नॅचरल तेल केसांच्या वाढीवर परिणाम करेल. यामुळे महिनाभरात तुमचे केस घनदाट आणि मजबूत होतील.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 10, 2026 | 09:34 AM
केसांची मूळ कमकुवत झाली आहेत? मग 'या' हिरव्या पानांचा वापर करून घरीच तयार करा नॅचरल आयुर्वेदिक तेल, केस होतील घनदाट

केसांची मूळ कमकुवत झाली आहेत? मग 'या' हिरव्या पानांचा वापर करून घरीच तयार करा नॅचरल आयुर्वेदिक तेल, केस होतील घनदाट

Follow Us
Follow Us:

महिलांच्या सौंदर्यात भर पाडण्याचे काम केस करतात. महिलांसह पुरुषसुद्धा केसांची खूप जास्त काळजी घेतात. हेअर ऑइल, हेअर मास्क तर काहीवेळा हेअर केअर रुटीनमध्ये बदल केला जातो. पण वातावरणात होणारे बदल, प्रदूषण, धूळ, आहारात होणारे बदल, मानसिक तणाव, हार्मोन्सचे असंतुलन इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. केसांच्या समस्या वाढू लागल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये अजिबात लक्ष दिले जात नाही. पण कालांतराने केस गळून टक्कल किंवा इतर समस्या उद्भवल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार केले जातात. पण वारंवार केसांच्या समस्या उद्भवत असतील तर घरगुती उपाय करून पाहावेत. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये नॅचरल आयुर्वेदिक तेल बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले तेल केसांच्या कमकुवत मुळांना आवश्यक पोषण देण्यास मदत करेल.(फोटो सौजन्य – istock)

तरुण वयात केस पांढरे झाले आहेत? आलं आणि लिंबाचा ‘या’ पद्धतीने वापर करून बनवा इन्स्टंट हेअर डाय, केस होतील काळेभोर

जेवण बनवताना कढीपत्त्याच्या पानांचा वापर फोडणीसाठी केला जातो. यामुळे पदार्थाची चव वाढते आणि शरीराला सुद्धा फायदे होतात. चवीसोबतच कढीपत्त्याची पाने केसांच्या वाढीवर सकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे केमिकल युक्त हेअर केअरचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. कढीपत्त्याच्या पानांमध्ये पोषक घटक आणि अँटिऑक्सिडंट्स आढळून येतात, ज्यामुळे केसांची झपाट्याने वाढ होण्यास मदत होते. केसांचे आरोग्य व सौंदर्य जपण्यासाठी योग्य पद्धतीने कढीपत्त्याचा वापर केल्यास महिनाभरात केस अतिशय चमकदार आणि घनदाट होतील. यामुळे टाळूवर वाढलेले इन्फेक्शन स्वच्छ होते.

घरच्या घरी तयार करा कढीपत्त्याचे तेल:

आयुर्वेदिक गुणधर्माने समृद्ध असलेली तेल तयार करण्यासाठी खोबरेल तेल, मेथी दाणे आणि कढीपत्त्याची पाने इत्यादी गोष्टींची आवश्यकता आहे. तेल तयार करण्यासाठी सर्वप्रथम, टोपात खोबरेल तेल घेऊन त्यात मेथी दाणे आणि कढीपत्त्याची पाने घालून गरम करून घ्या. कढीपत्त्याची पाने पूर्णपणे सुकल्यानंतर गॅस बंद करून तेल थंड होण्यासाठी ठेवा. थंड तेल गाळून काचेच्या बाटलीमध्ये भरून ठेवा. आठवड्यातून दोनदा केस स्वच्छ धुवण्याच्या आधी केसांच्या मुळांपासून ते टोकांपर्यंत तेल लावून हलक्या हाताने मसाज करून घ्या. यामुळे केसांच्या मुळांना आवश्यक पोषण मिळेल आणि केस घनदाट होतील.

Hair Care: केस होतील घनदाट, मजबूत आणि चमकदार? आहारात ‘या’ पदार्थांचा करा समावेश

कढीपत्त्याचे तेल केसांवर लावून हलक्या हाताने मसाज केल्यास टाळूवरील रक्तभिसरण सुधारण्यास मदत होईल आणि केस घनदाट होतील. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शाम्पूचा वापर करून स्वच्छ धुवून घ्या. तयार केलेल्या तेलाचा मसाज केसांवर केल्यास हेअर फॉलिकल्स मजबूत होण्यास मदत होते. खोबरेल तेल, कढीपत्ता आणि मेथी दाणे केसांसाठी वरदान ठरतात. त्यामुळे केसांच्या कोणत्याही समस्या उद्भवल्यास घरगुती उपाय करण्यास जास्त प्राधान्य द्यावे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: केसांची मुळे कमकुवत होण्याची कारणे कोणती?

    Ans: पोषक घटकांची कमतरता, ताणतणाव, हार्मोनल बदल, अपुरी झोप, कोंडा आणि केसांची अयोग्य निगा यामुळे केसांच्या मुळांवर परिणाम होऊ शकतो.

  • Que: हिरव्या पानांपासून बनवलेले तेल केसांसाठी फायदेशीर आहे का?

    Ans: काही औषधी हिरव्या पानांमध्ये अँटिऑक्सिडंट आणि वनस्पतीजन्य घटक असतात. त्यांचा वापर केसांच्या निगेसाठी केला जातो; मात्र केसगळती थांबवण्याचा ठोस उपचार म्हणून याकडे पाहू नये.

  • Que: घरच्या घरी नैसर्गिक आयुर्वेदिक तेल कसे बनवावे?

    Ans: निवडलेली पाने स्वच्छ धुऊन वाळवून नारळ किंवा इतर योग्य बेस ऑइलमध्ये मंद आचेवर गरम करून त्यातील गुणधर्म तेलात उतरवता येतात. तेल पूर्ण थंड झाल्यावर गाळून स्वच्छ बाटलीत ठेवावे.

Web Title: Have your hair roots become weak then prepare natural ayurvedic oil at home using these green leaves

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2026 | 09:34 AM

Topics:  

  • hair beauty
  • hair care tips
  • home remedies

संबंधित बातम्या

Skin Care: तरुण वयात चेहऱ्यावरील त्वचा सैल झाली आहे? मग स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा फेसपॅक
1

Skin Care: तरुण वयात चेहऱ्यावरील त्वचा सैल झाली आहे? मग स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा फेसपॅक

Lip Care: ओठांची काळजी घेण्यासाठी महागडे प्रॉडक्ट वापरत असाल तर थांबा! ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा नॅचरल लीपबाम
2

Lip Care: ओठांची काळजी घेण्यासाठी महागडे प्रॉडक्ट वापरत असाल तर थांबा! ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा नॅचरल लीपबाम

Hair Care: पांढऱ्या केसांसाठी कायमच केमिकल हेअर डायचा वापर करता? केसांना लावा ‘या’ हिरव्या पानांचा रस, केस होतील काळेभोर
3

Hair Care: पांढऱ्या केसांसाठी कायमच केमिकल हेअर डायचा वापर करता? केसांना लावा ‘या’ हिरव्या पानांचा रस, केस होतील काळेभोर

Hair Care: केसांना मिळेल पोषण अन् चमकही! अंड्यात ‘या’ गोष्टी मिसळून बनवा हेअर मास्क; जाणून घ्या पद्धत
4

Hair Care: केसांना मिळेल पोषण अन् चमकही! अंड्यात ‘या’ गोष्टी मिसळून बनवा हेअर मास्क; जाणून घ्या पद्धत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.