Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : ट्रॉपिकल सुगंधाने भरपूर… नारळ, अननस आणि केळीपासून बनवा टेस्टी ‘हवाईन ब्रेड’

Hawaiian Bread Recipe : नारळ, अननस आणि केळीच्या नैसर्गिक गोडव्याने भरलेला हा हवाईन ब्रेड चवीला मऊ, ओलसर आणि सुगंधी आहे. नाश्ता, चहासोबत किंवा हलक्या डेझर्टसाठी हा सोपा आणि खास पर्याय ठरतो.

  • By नुपूर भगत
Updated On: May 01, 2026 | 10:00 AM
Recipe : ट्रॉपिकल सुगंधाने भरपूर... नारळ, अननस आणि केळीपासून बनवा टेस्टी 'हवाईन ब्रेड'

Recipe : ट्रॉपिकल सुगंधाने भरपूर... नारळ, अननस आणि केळीपासून बनवा टेस्टी 'हवाईन ब्रेड'

Follow Us
Follow Us:
  • तुम्ही कधी हवाईयन ब्रेड खाल्ला आहे का?
  • फळांच्या नैसर्गिक चवीने भरलेला हा ब्रेड वेगळी चव देतो.
  • आम्हाला खात्री आहे याची चव तुम्हाला नक्कीच आवडेल.
फ्लेवर्स म्हणजे ताजेपणा, गोडवा आणि हलकासा ट्रॉपिकल सुगंध यांचा सुंदर संगम. कोकोनट, पायनॅपल आणि बनाना या तीनही घटकांची जोड दिल्यास साधा बनाना ब्रेड एकदम खास आणि वेगळा बनतो. हा ब्रेड मऊ, ओलसर (moist) आणि नैसर्गिक गोड चवीचा असतो. सकाळच्या नाश्त्यासाठी, चहासोबत किंवा हलक्या डेझर्टसाठी ही रेसिपी उत्तम पर्याय आहे.

हेल्दी आणि टेस्टी, यंदा कैरीचं नाही तर घरी बनवा आवळ्याचं चटकदार लोणचं, रेसिपी आहे फार सोपी

विशेष म्हणजे, यामध्ये कृत्रिम फ्लेवर्सची गरज नसते कारण फळांचा नैसर्गिक स्वादच पुरेसा असतो. घरच्या घरी सहज उपलब्ध साहित्य वापरून तुम्ही हा वेगळा आणि स्वादिष्ट ब्रेड बनवू शकता. आम्हाला खात्री आहे की याची चव तुम्हाला एक वेगळा अनुभव देऊन जाईल. हा ब्रेड सहजासहज कुठे विकत मिळणे कठीण आहे अशात तुम्ही घरीच याची रेसिपी ट्राय करू शकता.

साहित्य:

  • पिकलेले केळी – 3 (मॅश केलेले)
  • गव्हाचे पीठ किंवा मैदा – 1 ½ कप
  • साखर – ¾ कप (चवीनुसार कमी-जास्त)
  • बेकिंग पावडर – 1 टीस्पून
  • बेकिंग सोडा – ½ टीस्पून
  • मीठ – चिमूटभर
  • अंडी – 2 (व्हेजसाठी दही वापरू शकता)
  • वितळलेले बटर किंवा तेल – ½ कप
  • व्हॅनिला इसेन्स – 1 टीस्पून
  • किसलेला सुका नारळ (desiccated coconut) – ½ कप
  • पायनॅपल क्रश (पाणी काढून) – ½ कप
  • दूध – 2-3 टेबलस्पून
मासे प्रेमींसाठी खास! तंदुरशिवाय घरी बनवा स्मोकी आणि मसालेदार ‘तंदूर प्रॉन्स’, चव जी नेहमीच लक्षात राहिल…

कृती:

  • सर्वप्रथम ओव्हन 180°C वर प्रीहीट करा आणि बेकिंग टिनला बटर लावून तयार ठेवा.
  • एका भांड्यात मॅश केलेली केळी, साखर आणि अंडी घालून नीट फेटून घ्या.
  • त्यात वितळलेले बटर किंवा तेल आणि व्हॅनिला इसेन्स घालून मिश्रण एकजीव करा.
  • दुसऱ्या भांड्यात पीठ, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि मीठ चालवून घ्या.
  • आता कोरडे मिश्रण हळूहळू ओल्या मिश्रणात मिसळा.
  • त्यात पायनॅपल क्रश आणि किसलेला नारळ घालून हलक्या हाताने मिक्स करा.
  • जर बॅटर जास्त घट्ट वाटत असेल तर थोडे दूध घालून कंसिस्टन्सी योग्य करा.
  • तयार बॅटर बेकिंग टिनमध्ये ओता आणि 45-50 मिनिटे बेक करा.
  • टूथपिक घालून ब्रेड शिजला आहे का ते तपासा.
  • थंड झाल्यावर स्लाइस करून सर्व्ह करा.
  • पिकलेली केळी वापरल्यास ब्रेड अधिक गोड आणि मऊ होतो.
  • वरून थोडे नारळ किंवा नट्स टाकल्यास टेक्स्चर अधिक चांगले लागते.
  • हा ब्रेड फ्रिजमध्ये 2-3 दिवस टिकतो.
  • हा हवाईयन स्टाइल ब्रेड तुमच्या रोजच्या स्नॅक्सला एक वेगळा, ट्रॉपिकल ट्विस्ट देईल.

Web Title: Hawaiian coconut pineapple banana bread recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2026 | 10:00 AM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
1

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा
2

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा

Breakfast Recipe: गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ
3

Breakfast Recipe: गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ

Palak-Besan Chilla: रोजच्या नाश्त्याला द्या हेल्दी ट्विस्ट! झटपट बनवा पालक-बेसन चिला; चव लागेल एकदम झकास; वाचा सोपी रेसिपी
4

Palak-Besan Chilla: रोजच्या नाश्त्याला द्या हेल्दी ट्विस्ट! झटपट बनवा पालक-बेसन चिला; चव लागेल एकदम झकास; वाचा सोपी रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.