Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वयाच्या ९१ व्या वर्षी ‘ही-मॅन’ ॲक्शन फिगरचे निर्माते रॉजर स्वीट यांनी घेतला अखेरचा श्वास, ‘या’ गंभीर आजाराने होते त्रस्त

१९७० आणि १९८० च्या दशकात मॅटेलसाठी स्नायुबळ असलेल्या ही-मॅन पात्राची रचना केली होती. त्यानंतर त्याच्या मालिका जगभरात प्रदर्शित झाल्या होत्या. २९ एप्रिलला रॉजर स्वीट यांनी अखरेचा श्वास घेतला. जाणून घेऊया सविस्तर माहिती.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 30, 2026 | 09:59 AM
वयाच्या ९१ व्या वर्षी 'ही-मॅन' अॅक्शन फिगरचे निर्माते रॉजर स्वीट यांनी घेतला अखेरचा श्वास, 'या' गंभीर आजाराने होते त्रस्त

वयाच्या ९१ व्या वर्षी 'ही-मॅन' अॅक्शन फिगरचे निर्माते रॉजर स्वीट यांनी घेतला अखेरचा श्वास, 'या' गंभीर आजाराने होते त्रस्त

Follow Us
Follow Us:

स्मृतिभ्रंश म्हणजे काय?
स्मृतिभ्रंश झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे:
ॲक्शन फिगर डिझायनर रॉजर स्वीट यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी निधन.

‘ही-मॅन’ आणि ‘मास्टर्स ऑफ द युनिव्हर्स’ कार्टून मालिकेत व आगामी चित्रपटात रूपांतरित झालेले ॲक्शन फिगर डिझायनर रॉजर स्वीट यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले आहे. स्वीटने १९७० आणि १९८० च्या दशकात मॅटेलसाठी स्नायुबळ असलेल्या ही-मॅन पात्राची रचना केली होती. त्यानंतर त्यांची मालिका १९८२ पहिल्यांदा प्रदर्शित झाली. स्वीट यांच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून स्वीट हे स्मृतिभ्रंशाच्या समस्येने त्रस्त होते. मॅटेलच्या ॲक्शन फिगर्सवर आधारित ‘ही-मॅन अँड द मास्टर्स ऑफ द युनिव्हर्स’ या ॲनिमेटेड मालिका १९८३ ते १९८४ काळामध्ये प्रदर्शित झाल्या होत्या. स्वीट यांच्या निधनामुळे मनोरंजन आणि खेळणी उद्योग शोककळा पसरली आहे.(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)

कोमट की थंड? औषध खाताना कोणते पाणी पिणे शरीरासाठी ठरेल योग्य, पहा गोळ्या खाण्याचा सोपा नियम

स्वीट यांच्या पत्नी मार्लीन यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्याआधी त्यांचा एक अपघात झाला होता. अपघातात त्यांच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली होती. मेंदूच्या दोन भागांत रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना स्मृती काळजी केंद्रात हलवण्यात आले. पण २९ एप्रिलला त्यांनी अखरेचा श्वास घेतला. चला तर जाणून घेऊया स्मृतिभ्रंश होण्याची कारणे आणि लक्षणे, याबद्दल सविस्तर माहिती.

स्मृतिभ्रंश म्हणजे काय आणि त्याची कारणे?

डिमेंशिया म्हणजे स्मृतिभ्रंश किंवा स्मरणशक्ती कमी होणे. ही समस्या प्रामुख्याने मेंदूसंबंधित आजाराची लागण झाल्यानंतर किंवा अपघातात मेंदूला गंभीर दुखापत झाल्यामुळे उद्भवते. हा आजार विचार, स्मृती, भाषा आणि रोजच्या दैनंदिन कार्यांवर परिणाम करतो. यामुळे निर्णय घेण्याची क्षमता आणि विचार करण्याची क्षमता कमी होऊन जाते. याशिवाय मेंदूच्या पेशींना होणाऱ्या नुकसानीमुळे स्मृतिभ्रंश होण्याची जास्त शक्यता असते.

स्मृतिभ्रंश झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे:

  • स्मरणशक्ती कमी झाल्यामुळे घटना किंवा माहिती विसरणे
  • योग्य शब्द न सुचणे
  • बोलताना कायमच अडथळे येणे
  • ओळखीच्या ठिकाणी रस्ता विसरणे किंवा वेळ-काळ न समजून येणे
  • चिडचिड, उदासीनता, भीती किंवा व्यक्तिमत्त्वात अचानक होणारे बदल
तळपायांमध्ये कायमच जळजळ आणि आग होते? शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

मेंदूसंबंधित आजारांची लागण झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये अतिशय सामान्य लक्षणे दिसू लागतात. या लक्षणांकडे कायमच दुर्लक्ष केले जाते. पण अल्झायमर सारखा गंभीर आजार मेंदूमध्ये पसरल्यानंतर मेंदूच्या नसांचे नुकसान करतो. तसेच मेंदूला व्यवस्थित रक्तपुरवठा न झाल्यामुळे, मेंदूला दुखापत, व्हिटॅमिनची कमतरता, मेंदूतील संसर्ग इत्यादी कारणांमुळे स्मृतिभ्रंश सारख्या गंभीर आजाराची लागण होते. डिमेंशियावर पूर्णपणे उपचार उपलब्ध नसल्यामुळे औषधे आणि थेरपी घेऊन सामान्य उपचार करू शकता.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: He man action figure creator roger sweet breathed his last at the age of 91 after suffering from a serious illness

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2026 | 09:59 AM

Topics:  

  • Actor
  • brain
  • Health Care Tips

संबंधित बातम्या

दैनंदिन आहारात खाल्लेल्या चुकीच्या तेलामुळे वाढतो कोलेस्ट्रॉलचा धोका! हृदय निरोगी राहण्यासाठी ‘हे’ तेल आहे सर्वोत्तम
1

दैनंदिन आहारात खाल्लेल्या चुकीच्या तेलामुळे वाढतो कोलेस्ट्रॉलचा धोका! हृदय निरोगी राहण्यासाठी ‘हे’ तेल आहे सर्वोत्तम

शरीरात दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! कावीळ झाल्यास लाल रक्तपेशी तुटण्यासोबतच उद्भवतील गंभीर समस्या
2

शरीरात दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! कावीळ झाल्यास लाल रक्तपेशी तुटण्यासोबतच उद्भवतील गंभीर समस्या

कच्चा कांदा खाणे शरीरासाठी चांगले की वाईट? कांद्यामुळे पोटात इन्फेक्शन वाढते का? जाणून घ्या कच्चा कांदा खाण्याची योग्य पद्धत
3

कच्चा कांदा खाणे शरीरासाठी चांगले की वाईट? कांद्यामुळे पोटात इन्फेक्शन वाढते का? जाणून घ्या कच्चा कांदा खाण्याची योग्य पद्धत

पावसाळ्यात खालेल्या ‘या’ भाज्यांमुळे वर्षभर राहाल तंदुरुस्त आणि फिट, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासोबतच आजार होतील गायब
4

पावसाळ्यात खालेल्या ‘या’ भाज्यांमुळे वर्षभर राहाल तंदुरुस्त आणि फिट, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासोबतच आजार होतील गायब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.