कोमट की थंड? औषध खाताना कोणते पाणी पिणे शरीरासाठी ठरेल योग्य, पहा गोळ्या खाण्याचा सोपा नियम
औषध कशासोबत खावी?
चुकीच्या पद्धतीने औषध खाल्ल्यास शरीराचे होणारे नुकसान?
गोळ्या खाण्याची योग्य पद्धत?
धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येत आहे. कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता आणि शरीरसंबंधित उद्भवणाऱ्या गंभीर समस्यांमुळे आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. आजारी पडल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये अजिबात लक्ष दिले जात नाही. पण कालांतराने शरीरात आजार वाढतो आणि आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. त्यामुळे डॉटरांच्या सल्ल्याने औषध उपचार करणे आवश्यक आहे. शरीरात निर्माण झालेली कॅल्शियम आणि इतर विटामिनची कमतरता भरून काढण्यासाठी वेगवेगळ्या गोळ्या आणून खाल्ल्या जातात. नेहमीच औषध खाणे हे रोजच काम झालं आहे. बऱ्याचदा घरामध्ये असलेल्या गोळ्या घेऊन त्या पाण्यासोबत खाल्ल्या जातात. तर काही लोक दूध, ज्यूस, कॉफी किंवा चहासोबत खाल्ली जातात. पण योग्य पद्धतीने औषध न खाल्ल्यास शरीरावर त्याचे परिणाम होऊ शकतात.(फोटो सौजन्य – istock)
चुकीच्या पद्धतीने गोळ्या औषधांचे सेवन केल्यामुळे शरीरावर साईड इफेक्स होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे कायमच योग्य पद्धतीने गोळ्या औषधांचे सेवन करावे. टॅबलेट्स, कॅप्सूल, सिरप, पावडर, ड्रॉप्स किंवा इंजेक्शन इत्यादी वेगवेगळ्या प्रकारची औषध घेतली जातात. गंभीर आजारांची लागण झाल्यानंतर इंजेक्शनद्वारे औषध उपचार केले जाते. आज आम्ही तुम्हाला औषध घेण्याची योग्य पद्धत आणि औषध घेताना थंड की गरम पाणी प्यावे? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. योग्य पद्धतीने औषध खाल्ल्यास त्याचे परिणाम शरीरावर लगेच दिसून येतात. त्यामुळे गोळ्या तोडू किंवा चावून खाऊ नये.
कोणत्याही आजारासंबंधित औषधांचे सेवन करताना कायमच कोमट पाणी प्यावे. कोमट पाण्याच्या सेवनामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. थंड पाण्यासोबतच औषध घेतल्यास गोळ्या सहज पचन होत नाहीत. गोळ्या पचन होण्यासाठी जास्तीचा वेळ लागतो. तर औषधांचा परिणाम शरीरावर हळूहळू होतो. जास्त गरम पाण्यासोबतच औषधांचे अजिबात सेवन करू नये. त्यामुळे कायमच औषध खाताना कोमट पाणी किंवा नॉर्मल पाणी प्यावे.
दूध, ज्यूस, चहा किंवा कॉफीसोबत औषधांचे सेवन अजिबात करू नये. यामुळे शरीराला हानी पोहचण्यासोबतच औषधांचा प्रभाव सुद्धा कमी होऊन जातो. दुधातील कॅल्शिअम औषधांमधील आवश्यक घटक कमी करून टाकतात. त्यामुळे थायरॉइड, कॅल्शिअम कंट्रोल किंवा अँटी-बायोटिक औषध दुधासोबत घेऊ नये. चहा कॉफीमध्ये कॅफिन असते. कॅफिन युक्त पदार्थांसोबतच गोळ्या घेऊ नये. याशिवाय चहा किंवा कॉफीसोबत औषधांचे सेवन केल्यामुळे पोटासंबंधित समस्या किंवा पोटाचे विकार होऊ शकतात. हृदयाचे ठोके वाढून आरोग्य पूर्णपणे बिघडते. त्यामुळे कायमच साध्या पाण्यासोबत औषध घेणे फायदेशीर आहे.
Ans: सामान्यतः कोमट किंवा साधे (रूम टेंपरेचर) पाणी पिणे योग्य ठरते. खूप थंड पाणी टाळावे.
Ans: थंड पाण्यामुळे काही वेळा औषध विरघळण्यास उशीर होतो आणि त्याचा परिणाम उशिरा दिसू शकतो.
Ans: सर्व औषधांसोबत दूध किंवा ज्यूस घेणे योग्य नसते. काही औषधांवर त्याचा परिणाम होऊ शकतो, त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.






