किडनी खराब होण्याआधी शरीरात दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे
निरोगी आरोग्यासाठी शरीरातील सर्वच अवयव निरोगी असणे आवश्यक आहे. कारण कोणत्याही एका अवयवाचे कार्य बिघडल्यानंतर रक्त शुद्ध करण्याच्या किंवा शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकण्याच्या प्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण होतात. शरीरासाठी किडनी हा अवयव अतिशय महत्वाचा आहे. कारण किडनी रक्तशुद्ध करून शरीरात साचून राहिलेले अनावश्यक घटक बाहेर काढून टाकण्याचे काम करते. याशिवाय शरीरातील विषारी घटक लघवीवाटे आणि घामावाटे बाहेर पडून जातात. पण किडनीच्या कार्यात अडथळे निर्माण झाल्यानंतर शरीर कमजोर होऊ लागते. यामुळे शरीरात विषारी घटक तसेच साचून राहतात आणि पचनसंबंधित किंवा आरोग्यासंबंधित इतर समस्या उद्भवण्याची शक्यता असते.(फोटो सौजन्य – iStock)
किडनीचे कार्य बिघडल्यानंतर शरीरात सुरुवातीच्या दिवसांमध्ये अनेक सामान्य लक्षणे दिसू लागतात. थकवा जाणवणे किंवा अशक्तपणा जाणवणे इत्यादी लक्षणे जाणवू लागल्यानंतर अनेक लोक दुर्लक्ष करतात. मात्र असे केल्यामुळे अनेक लहान आजार मोठे स्वरूप घेतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला किडनी खराब होण्याआधी शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
किडनीचे कार्य बिघडल्यानंतर शरीरात अनेक छोटे मोठे बदल दिसून येतात. यामुळे भूक अतिशय कमी होऊन वजन अचानक कमी होऊन जाते. याशिवाय भूक न लागल्याचं परिणाम पचनसंस्थेवर होण्याची शक्यता असते. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून न गेल्यामुळे अपचन आणि वारंवार गॅस किंवा ऍसिडिटी वाढू लागते. शरीरात वाढलेली अपचनाची समस्या संपूर्ण शरीरासाठी धोक्याची ठरते. शरीरात साचलेल्या विषारी घटकांमुळे भूक मंदावणे, मळमळ, उलट्या आणि अपचन इत्यादी समस्या उद्भवू लागतात.
आरोग्यासंबंधित विविध समस्यांमुळे अंगाला खाज येते. अंगाला खाज आल्यानंतर अनेक लोक दुर्लक्ष करतात तर काही घरगुती उपाय करून आराम मिळवतात. पण किडनीचे कार्य बिघडल्यानंतर त्वचेमध्ये जळजळ होणे, वारंवार अंगाला खाज सुटणे. रॅश इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. किडनीमध्ये साचून राहिलेल्या विषारी घटकांमुळे अंगाला सतत खाज येते.
किडनी खराब झाल्यानंतर संपूर्ण शरीरातील अवयवांना सूज येऊ लागते. किडनीच्या कार्यात निर्माण झालेले अडथळे वाढल्यानंतर ही समस्या आणखीनच वाढू लागते. याशिवाय उच्च रक्तदाब, मधुमेह, मूत्रपिंडांच्या कार्यातील बिघाड, हृदयाचे आजार, प्रथिनांची कमतरता इत्यादी अनेक कारणांमुळे किडनीला सूज येण्याची शक्यता असते. किडनी खराब झाल्यानंतर मूत्रपिंडाची तपासणी केल्यास किडनीच्या आजारांचे निदान होईल.याशिवाय लघवीमधून रक्त येणे किंवा लघवीमध्ये फेस येण्याची समस्या उद्भवू लागते.