मधुमेहापासून सुटका मिळवण्यासाठी आहारात करा 'या' भाजीच्या रसाचे सेवन
जगभरात मधुमेहाच्या रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. मधुमेह झाल्यानंतर शरीरात अनेक बदल होऊ लागतात. या बदलांकडे दुर्लक्ष केल्यास शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. मधुमेह झाल्यानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढू लागते. यामुळे सतत चक्कर येणे, अंगाला खाज येणे, थकवा, वारंवार लघवीला होणे इत्यादी अनेक लक्षणे शरीरात दिसून येतात. मधुमेह झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमधे दिसून येणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता तातडीने औषध उपचार करावे. याशिवाय रक्तातील साखरेचे प्रमाण वाढवणाऱ्या पदार्थांचे चुकूनही सेवन करू नये. याशिवाय खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये पथ्य पाळणे आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – iStock)
रोजच्या आहारात ‘या’ व्यक्तींनी चुकूनही करू नका केळ्यांचे सेवन, आतड्या आणि पोटामध्ये तयार होईल विष
मधुमेह झाल्यानंतर रोजच्या आहारात बदल करून हिरव्या पालेभाज्या. मेथी दाण्यांचे पाणी, कारल्याची भाजी इत्यादी पदार्थांचे सेवन करावे. यामुळे रक्तात वाढलेली साखरेची पातळी नियंत्रणात राहील आणि आरोग्याला अनेक फायदे सुद्धा होतील. आज आम्ही तुम्हाला शरीरात वाढलेली रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणत्या हिरव्या रसांचे आहारात सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या रसाचे आहारत सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात.
आल्याच्या रसात असलेले दाहक विरोधी गुणधर्म शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकतो. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी आल्याच्या रसाचे सेवन करावे. शरीरात वाढलेला मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी कोबी अतिशय प्रभावी आहे. यामध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळून येतात. याशिवाय आल्याचे सेवन केल्यामुळे शरीरात होणारी जळजळ कमी होते आणि आराम मिळतो. कोबी आल्याचा रस बनवण्यासाठी सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात बारीक चिरून घेतलेला कोबी आणि आल्याचा तुकडा टाकून वाटून घ्या. त्यानंतर त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून पुन्हा एकदा वाटून गाळून घ्या. तयार केलेल्या रसाचे नियमित उपाशी पोटी सेवन करावे.
मधुमेह झाल्यनंतर कारल्याच्या रसाचे सेवन करावे. कारल्याच्या रसाचे सेवन केल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते. कारल्याचा रस तयार करण्यासाठी सर्वप्रथम, कारली स्वच्छ करून त्यातील बिया काढून घ्या. त्यानंतर बारीक तुकडे करून मिक्सरच्या भांड्यात कारली टाकून आवश्यकतेनुसार पाणी घालून बारीक वाटून घ्या. त्यानंतर कारल्याचा रस गाळून त्यात लिंबाचा रस टाकून उपाशी पोटी सेवन करावे. या रसाच्या सेवनामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातील, याशिवाय आरोग्याला अनेक फायदे होतील. कारल्याचा रस इन्सुलिन संवेदनशीलता वाढवून रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतो.