वाढत्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी नियमित 'या' पद्धतीने चालावे
चुकीचा आहार, बदललेली जीवनशैली, जंक फूडचे सेवन, शारीरिक हालचालींची कमतरता, अपुरी झोप, व्यायामाचा अभाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. आहारात सतत होणाऱ्या बदलांमुळे शरीराला आवश्यक पोषण मिळत नाही. ज्यामुळे वारंवार हाडं दुखणे, पाठ दुखणे, हाडांमध्ये वाढलेल्या वेदना, हाडांमधून आवाज येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. वयाच्या तिशीमध्येच हाडांचे दुखणे वाढल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. याशिवाय वारंवार खुर्चीवर बसून राहिल्यामुळे किंवा एका जागेवर बसून काम करत राहिल्यामुळे हाडांमध्ये वेदना होण्याची शक्यता असते. त्यामुळे हाडांचे वाढलेले दुखणे कमी करण्यासाठी आहारात बदल करून कॅल्शियम युक्त पदार्थांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला हाडांमधील वेदना कमी कारण्यासाठी चालण्याची सोपी पद्धत सांगणार आहोत. युवा पद्धतीने नियमित ५ ते ६ मिनिटं चालल्यास शरीराला अनेक फायदे होतील.(फोटो सौजन्य – iStock)
हाडांमध्ये किंवा गुडघ्यांमध्ये वाढलेल्या वेदना कमी करण्यासाठी आहारात कॅल्शियम युक्त पदार्थांचे नियमित सेवन करावे. कॅल्शियम युक्त पदार्थांचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. याशिवाय सकाळी उठल्यानंतर नियमित व्यायाम करावा. व्यायाम केल्यामुळे शरीर सक्रिय राहते आणि शारीरिक हालचाली वाढतात. याशिवाय गुडघे दुखीपासून आराम मिळवण्यासाठी नियमित उलटे चालावे. उलटे चालल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. नियमित उलटे चालल्यामुळे गुडघ्यांवर दाब निर्माण होतो.
निरोगी आरोग्यासाठी शरीरातील सर्वच अवयव अतिशय महत्वाचे आहेत. गुडघ्यांप्रमाणे शरीरासाठी घोटे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. काहीवेळा घोटे दुखण्यास सुरुवात झाल्यानंतर उलटे चालावे. उलटे चालल्यामुळे घोट्यांवर योग्य ताण निर्माण होतो आणि वाढलेल्या वेदना कमी होऊन आराम मिळतो. हाडांच्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी नियमित 10 मिनिटं उलटे चालावे.
रोजच्या आहारात ‘या’ व्यक्तींनी चुकूनही करू नका केळ्यांचे सेवन, आतड्या आणि पोटामध्ये तयार होईल विष
मेंदूचे कार्य सुधारण्यासाठी नियमित 10 मिनिटं उलटे चालावे. उलटे चालल्यामुळे मेंदू सक्रिय राहतो. याशिवाय शरीराचे रक्तभिसरण सुधारण्यास मदत होते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर समोर बघून चाललण्याऐवजी उलटे चालावे. यामुळे मेंदू अधिक कार्यक्षम होतो आणि मेंदूच्या हालचालींमध्ये वाढ होते.उलटे चालल्यामुळे पाय आणि मेंदूमधील समन्वय सुधारण्यास मदत होते. याशिवाय बिघडलेले मानसिक आरोग्य सुधारते. मन शांत आणि प्रसन्न ठेवण्यासाठी नियमित सकाळी उठल्यानंतर 10 ते 15 मिनिटं उलटे चालावे.