Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावसात भिजल्यामुळे उद्भवू शकतात आरोग्यसंबंधित ‘हे’ गंभीर आजार,जाणून घ्या सविस्तर

पाऊस पडून गेल्यानंतर सगळीकडे आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण होते. पण पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर सगळीकडे रोगराई सुद्धा पसरते. रोगराई पसरल्यामुळे आजार वाढू लागतात. पावसात भिजायला सगळ्यांचं आवडत. या दिवसांमध्ये लहानमुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच पावसात भिजण्याचा छान आनंद घेतात. पण पावसात भिजून आल्यानंतर आजारी पडण्याची शक्यता असते. सर्दी, खोकला, साथीचे आजार झाल्यानंतर रोगप्रतिकारशक्ती पूर्णपणे कमकुवत होण्यास सुरुवात होते.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 13, 2024 | 09:45 AM
पावसाळ्यातील आजार

पावसाळ्यातील आजार

Follow Us
Follow Us:

राज्यभरात सगळीकडे पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पाऊस पडून गेल्यानंतर सगळीकडे आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण होते. पण पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर सगळीकडे रोगराई सुद्धा पसरते. रोगराई पसरल्यामुळे आजार वाढू लागतात. पावसात भिजायला सगळ्यांचं आवडत. या दिवसांमध्ये लहानमुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच पावसात भिजण्याचा छान आनंद घेतात. पण पावसात भिजून आल्यानंतर आजारी पडण्याची शक्यता असते. सर्दी, खोकला, साथीचे आजार झाल्यानंतर रोगप्रतिकारशक्ती पूर्णपणे कमकुवत होण्यास सुरुवात होते. वातावरणातील आद्रतेचा परिणाम रोग्यावर लगेच दिसून येतो. सतत घाम येण्यास सुरुवात झाल्यानंतर आजार वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पावसाळ्याच्या दिवसांमध्ये कोणते आजार मोठ्या प्रमाणावर वाढू लागतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)

फुफ्फुसाशी संबंधित समस्या:

वातावरणातील आद्र्रता, दूषित हवा, खराब पाणी इत्यादींमुळे आजार वाढू लागतात. हवेतील दूषित कण पाण्यात मिक्स झाल्यामुळे न्यूमोनिया, दमा आणि ब्राँकायटिस यांसारखे आजार होण्याची शक्यता असते. यामुळे तुम्हाला वारंवार श्वसनाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे पावसात भिजणे टाळावे. पावसात भिजून आल्यानंतर जर तुम्हाला श्वसनाचा त्रास होत असेल तर लगेच डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावेत.

हे देखील वाचा: एका जागेवर बसून सतत पाठ दुखते? मग सकाळी उठल्यावर करा ‘ही’ योगासने

त्वचा रोग:

पावसात भिजून आल्यानंतर त्वचा रोग होण्याची दाट शक्यता असते. वातावरणातील ओलाव्यामुळे जीवाणू, विषाणू आणि बुरशीजन्य आजार वाढण्याची शक्यता असते. यामुळे त्वचेवर पुरळ, ॲलर्जी आणि त्वचारोग यांसारख्या समस्या जाणवण्याची शक्यता असते. हे संसर्ग होऊ नये म्हणून पावसाळ्यात भिजणे टाळावे.

हायपोथर्मिया:

हायपोथर्मिया म्हणजे शरीर ओल झाल्यानंतर शरीराच्या तापमानात घट होणे. जास्त वेळ पावसाच्या पाण्यात भिजल्यामुळे शरीरातील तापमानात घट होण्यास सुरुवात होते. थरथरणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे इत्यादी समस्या जाणवू लागतात. या समस्या जाणवू लागल्यानंतर तात्काळ डॉक्टरांच्या मदतीने योग्य ते औषध उपचार करणे आवश्यक आहे.

हे देखील वाचा: डायबिटीज असणाऱ्या व्यक्तीने किती वेळा ब्लड शुगर चेक केली पाहिजे? जाणून घ्या योग्य पद्धत

लेप्टोस्पायरोसिस:

पावसाळ्याच्या घाणेरड्या पाण्यामुळे अनेक गंभीर आजार होण्याची शक्यता असते. हे पाणी चुकूनही तोंडात गेल्यानंतर ताप, पोटदुखी, डोळे लाल होणे, पोटदुखी, मळमळ आणि त्वचेवर पुरळ इत्यादी अनेक समस्या जाणवू लागतात. दूषित पाणी नाका तोंडात गेल्यानंतर लेप्टोस्पायरोसिस होण्याची शक्यता असते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Health care tips rainy season disease

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2024 | 09:45 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • Health Tips

संबंधित बातम्या

Gardening Tips : आल्याचे दर गगनाला भिडले? घरातल्या कुंडीतच अशा प्रकारे वाढवा आले; ही सोपी पद्धत येईल कामी
1

Gardening Tips : आल्याचे दर गगनाला भिडले? घरातल्या कुंडीतच अशा प्रकारे वाढवा आले; ही सोपी पद्धत येईल कामी

Hormonal Imbalance च्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, अन्यथा मासिक पाळीच्या चक्रात बदल होण्यासोबतच वाढेल वजन
2

Hormonal Imbalance च्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, अन्यथा मासिक पाळीच्या चक्रात बदल होण्यासोबतच वाढेल वजन

‘पायांना सूज अन् त्वचेला खाज’ ही असू शकते Kidney Disease ची लक्षणे, चुकूनही करू नका दुर्लक्ष
3

‘पायांना सूज अन् त्वचेला खाज’ ही असू शकते Kidney Disease ची लक्षणे, चुकूनही करू नका दुर्लक्ष

पावसाळ्यातील साथीच्या आजारांपासून बचाव करण्यासाठी नियमित करा पारिजातकाच्या पानांपासून बनवलेल्या काढ्याचे सेवन
4

पावसाळ्यातील साथीच्या आजारांपासून बचाव करण्यासाठी नियमित करा पारिजातकाच्या पानांपासून बनवलेल्या काढ्याचे सेवन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.