Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 23 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uric Acid: शरीरातील युरिक ॲसिडची पातळी वाढल्यानंतर दिसून येतात ‘ही’ गभींर लक्षणे, सांध्यांमधील वेदना कमी करण्यासाठी घरगुती उपाय

Uric Acid: सांध्यांमध्ये वाढलेली युरिक ॲसिडची पातळी कमी करण्यासाठी आहारात बदल करणे आवश्यक आहे. खाद्यपदार्थ, प्रिझर्व्हेटिव्हस, यीस्ट असलेले पदार्थ, बाजारात मिळणारे डबाबंद शितपेये इत्यादी पदार्थांचे अजिबात सेवन करू नये.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 23, 2026 | 05:30 AM
Uric Acid: शरीरातील युरिक ॲसिडची पातळी वाढल्यानंतर दिसून येतात 'ही' गभींर लक्षणे, सांध्यांमधील वेदना कमी करण्यासाठी घरगुती उपाय

Uric Acid: शरीरातील युरिक ॲसिडची पातळी वाढल्यानंतर दिसून येतात 'ही' गभींर लक्षणे, सांध्यांमधील वेदना कमी करण्यासाठी घरगुती उपाय

Follow Us
Follow Us:

Uric Acid: धावपळीची जीवनशैैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, पोषक घटकांची कमतरता, अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. त्यामुळे शरीरात होणाऱ्या बदलांकडे अजिबात दुर्लक्ष करणे धोक्याचे ठरू शकते. वयाच्या ४०- ५० व्या वर्षानंतर शरीरातले  युरिक ॲसिड झपाट्याने वाढू लागते, जे शरीरासाठी निरुपयोगी आणि हळूहळू त्रासदायक ठरते.  युरिक ॲसिड वाढल्यानंतर पायाच्या अंगठ्याजवळ जास्त वेदना होतात. सकाळी उठल्यानंतर  पाय जमिनीवर टेकवने सुद्धा नकोसे वाटते. सांध्यांमध्ये  युरिक ॲसिडची पातळी वाढल्यानंतर सुरवातीच्या दिवसांमध्ये फारशी लक्षणे दिसून येत नाहीत, पण कालांतराने अतिशय तीव्र वेदना होतात. चला तर जाणून घेऊया युरिक ॲसिडची पातळी वाढल्यानंतर दिसून येणारी लक्षणे आणि युरिक ॲसिड कमी करण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा. (फोटो सौजन्य – istock)

International Stuttering Awareness Day: ‘नीट बोल’चा दबाव तोतरेपणाची भीती वाढवतो! शाळेत जाणाऱ्या ५ टक्के मुलांमध्ये आढळतो तोतरेपणा

युरिक ॲसिडची पातळी वाढल्यानंतर दिसून येणारी लक्षणे:

  •  पायाच्या मोठ्या अंगठ्यात अचानक आणि तीव्र वेदना होणे.
  • घोटा, गुडघा, कोपर किंवा मनगटाच्या सांध्यांमध्ये वेदना होणे.
  • लघवी करताना जळजळ होणे.
  • सतत मळमळणे, उलट्या होण्याची इच्छा होणे.
  • थकवा, अशक्तपणा
  • लघवीचा रंग गढूळ होणे किंवा लघवीतून रक्त पडणे, इत्यादी लक्षणे दिसू लागल्यास अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावेत.

शरीरात वाढलेले युरिक ॲसिड कमी करण्यासाठी उपाय:

शरीरात वाढलेले युरिक ॲसिड कमी करण्यासाठी नियमित २ ते ३ लिटर पाणी पिणे फार आवश्यक आहे. पाण्याच्या सेवनामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जाण्यास मदत होते. जास्तीच युरिक ॲसिड शरीरातून बाहेर पडून गेल्यास सांध्यांना आलेली सूज कमी होईल. प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ, प्रिझर्व्हेटिव्हस, यीस्ट असलेले पदार्थ, बाजारात मिळणारे डबाबंद शितपेये आणि फ्रुक्टोज इत्यादी पदार्थांचा आहारात अजिबात समावेश करू नये. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला हानि पोहचण्याची जास्त शक्यता असते.

Urinary Incontinence: खोकताना, शिंकताना लघवीचे थेंब पडतात? शरीरसंबंधित असू शकतो ‘या’ गंभीर आजारांचा धोका

दैंनदिन आहारात वेगवेगळ्या भाज्यांचा समावेश केला जातो. पण भेंडी, कोबी, वांगं अशा भाज्यांचे अतिसेवन करणे टाळावे. त्याऐवजी आहारात पालेभाज्या, विटामिन सी जास्त प्रमाणात असलेल्या भाज्यांचा आणि फळांचा समावेश आहारात करावा. आंबट फळांचे सेवन केल्यामुळे युरिक ॲसिड कमी होण्यास मदत होते. तसेच दूध, तूप इतर दुग्धजन्य पदार्थ योग्य प्रमाणात खाणे शरीरासाठी फायदेशीर ठरते. आहारात जास्तीतजास्त प्रमाणात फायबर युक्त पदार्थ खाल्ल्यास पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: युरिक ॲसिड म्हणजे काय?

    Ans: युरिक ॲसिड हा शरीरात प्युरीन (Purine) नावाच्या घटकाच्या विघटनातून तयार होणारा एक टाकाऊ पदार्थ आहे.

  • Que: युरिक ॲसिड वाढण्याची कारणे काय आहेत?

    Ans: लाल मांस (Red meat), सीफूड, मद्यपान (विशेषतः बिअर), आणि जास्त फळसाखर (Fructose) किंवा गोड पेये यांचे सेवन

  • Que: युरिक ॲसिड वाढल्याची लक्षणे कोणती?

    Ans: सांध्यांमध्ये तीव्र वेदना आणि सूज, चालताना किंवा हालचाल करताना सांधे आखडणे.

Web Title: Uric acid serious symptoms that appear when uric acid levels in the body rise home remedies to alleviate joint pain sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • uric acid
  • Uric Acid Remedies

संबंधित बातम्या

International Stuttering Awareness Day: ‘नीट बोल’चा दबाव तोतरेपणाची भीती वाढवतो! शाळेत जाणाऱ्या ५ टक्के मुलांमध्ये आढळतो तोतरेपणा
1

International Stuttering Awareness Day: ‘नीट बोल’चा दबाव तोतरेपणाची भीती वाढवतो! शाळेत जाणाऱ्या ५ टक्के मुलांमध्ये आढळतो तोतरेपणा

Urinary Incontinence: खोकताना, शिंकताना लघवीचे थेंब पडतात? शरीरसंबंधित असू शकतो ‘या’ गंभीर आजारांचा धोका
2

Urinary Incontinence: खोकताना, शिंकताना लघवीचे थेंब पडतात? शरीरसंबंधित असू शकतो ‘या’ गंभीर आजारांचा धोका

Menopause: वयाच्या तिशीनंतर महिलांच्या शरीरात होतात ‘हे’ मोठे बदल, रजोनिवृत्तीच्या काळात स्वतःच्या आरोग्याची घ्या योग्य काळजी
3

Menopause: वयाच्या तिशीनंतर महिलांच्या शरीरात होतात ‘हे’ मोठे बदल, रजोनिवृत्तीच्या काळात स्वतःच्या आरोग्याची घ्या योग्य काळजी

हृदयापासून बद्धकोष्ठतेपर्यंत…! नियमित एक किवीचे सेवन केल्यास शरीराला होतील भरमसाट फायदे, जाणून घ्या खाण्याची वेळ
4

हृदयापासून बद्धकोष्ठतेपर्यंत…! नियमित एक किवीचे सेवन केल्यास शरीराला होतील भरमसाट फायदे, जाणून घ्या खाण्याची वेळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.