Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महिलांमध्ये थायरॉईड झाल्यानंतर कोणती लक्षणे दिसतात? जाणून घ्या उपाय

चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. महिलांमध्ये थायरॉईडचे प्रमाण वाढल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. हा एक सामान्य आजार असला तरीसुद्धा आरोग्यसंबंधित गंभीर समस्या थायरॉईड उद्भवतात. त्यामुळे पुढील लक्षणे दिसू लागल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करून आरोग्याची काळजी घ्यावी. तसेच आहारात शरीराला आवश्यक असलेल्या पदार्थांचे सेवन करावे.थायरॉईड असलेल्या लोकांनी गहू किंवा बेकरी पदार्थांचा आहारात समावेश करू नये.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 08, 2024 | 11:32 AM
थायरॉईडचे प्रकार आणि लक्षणे

थायरॉईडचे प्रकार आणि लक्षणे

Follow Us
Follow Us:

सर्वच महिलांमध्ये थायरॉईड हा आजार आढळून येतो. पुरुषांपेक्षा जास्त महिला थायरॉईड सारख्या गंभीर आजाराने त्रस्त आहेत. हा आजार शरीरातील हार्मोनल असंतुलित झाल्यानंतर उद्भवतो. घशामध्ये थायरॉईड ग्रंथी असते, जी हार्मोन्स तयार करण्यासाठी मदत करते. पण काही कारणांमुळे शरीरातील अंतःस्रावी ग्रंथीच्या कार्यक्षमतेवर परिणाम होण्यास सुरुवात होते आणि हार्मोनल असंतुलित होऊन जातात.यामुळे थायरॉईड हा आजार होतो. थायरॉईड झाल्यानंतर आरोग्यसंबंधित अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. थायरॉईड झाल्यानंतर शरीरामध्ये अनेक छोटे छोटे बदल घडून येतात. हे बदल पुढे जाऊन मोठे होण्याची शक्यता असते. त्यामुळे योग्य वेळी थायरॉइडवर लक्ष दिले नाही तर गंभीर आजार होऊ शकतात.आज आम्ही तुम्हाला थायरॉईडचे नेमकी किती प्रकार आहेत? शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य-istock)

थायरॉईडचे प्रकार आणि लक्षणे

थायरॉइडचे प्रकार:

थायरॉईडचे दोन प्रकार आहेत. त्यातील एक म्हणजे ‘हायपरथायरॉईडीझम’ आणि ‘हायपोथायरॉईडीझम’

हे देखील वाचा: उभं राहून पाणी पिता? मग थांबा, जाणून घ्या पाणी पिण्याची योग्य पद्धत

थायरॉईडची लक्षणे:

  • वजन कमी होणे
  • केस गळणे
  • मासिक पाळीमध्ये अडथळा निर्माण होणे
  • सतत मूड स्विंग होणे
  • स्नायू आणि सांधेदुखी
  • शरीरामध्ये सतत थंडावा उष्णता जाणवणे
  • मानेला किंवा घश्याला सूज येणे
हे देखील वाचा: सतत केस गळून पातळ झाले आहेत? तर ‘हे’ योग नक्की करून पहा

थायरॉईडचे प्रकार आणि लक्षणे

थायरॉईड नियंत्रणात ठेवण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा:

  • वाढलेला थायरॉईड नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात आयोडीन, जस्त, जीवनसत्त्व -डी,जीवनसत्त्व -बी, मॅग्नेशियम आणि सेलेनियम यांसारख्या पोषक घटकांचा आहारात समावेश करा.
  • थायरॉईड नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात सफरचंद, विटामिन सी युक्त पदार्थांचे सेवन करा.तसेच ब्राऊन राइस थायरॉईड कमी करण्याचे काम करतो.
  • थायरॉईड असलेल्या लोकांनी गहू किंवा बेकरी पदार्थांचा आहारात समावेश करू नये. यामुळे हा आजार आणखीन वाढू लागतो.
  • बदाम, अक्रोड आणि ब्राझील नट्स थायरॉईडसाठी योग्य आहेत. त्यामुळे या पदार्थांचा तुम्ही आहारात समावेश करू शकता.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Health care tips thyroid symptoms and remedies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2024 | 11:32 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • Health News

संबंधित बातम्या

Amravati News: मेळघाटात विद्यार्थ्यांची सिकलसेल तपासणी! एमईसीएलच्या सीएसआर निधीतून आरोग्य, पोषण अभियान
1

Amravati News: मेळघाटात विद्यार्थ्यांची सिकलसेल तपासणी! एमईसीएलच्या सीएसआर निधीतून आरोग्य, पोषण अभियान

Prakash Abitkar: ‘गर्भलिंग निदान’ करणाऱ्यांवर मोक्काची टांगती तलवार; कायदा कडक करण्याची तयारी
2

Prakash Abitkar: ‘गर्भलिंग निदान’ करणाऱ्यांवर मोक्काची टांगती तलवार; कायदा कडक करण्याची तयारी

Gut Health: सतत Bloating होऊन पोट कायमच फुगल्यासारखे वाटते? अपचन झाल्यानंतर दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करु नका दुर्लक्ष
3

Gut Health: सतत Bloating होऊन पोट कायमच फुगल्यासारखे वाटते? अपचन झाल्यानंतर दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करु नका दुर्लक्ष

Russia Plague Scare : रशियात न्यूमोनिक प्लेगची भीती? प्रयोगशाळेत कर्मचाऱ्याचा मृत्यू, 200 जण क्वारंटाईन
4

Russia Plague Scare : रशियात न्यूमोनिक प्लेगची भीती? प्रयोगशाळेत कर्मचाऱ्याचा मृत्यू, 200 जण क्वारंटाईन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.