योगासने करण्याचे फायदे
वातावरणातील बदल, चुकीची जीवनशैली इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. अशात केस गळतीची समस्या वाढू लागल्यानंतर केस गळून टक्कल पडेल की काय आधी भीती अनेकांना असते. त्यामुळे केस आणि त्वचेची योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. केसांसंबधित समस्या उद्भवू लागल्यानंतर अनेकदा बाजारात मिळणारे महागडे शॅम्पू किंवा हेअर ऑइल वापरले जातात. पण केमिकल युक्त उत्पादनांचा वापर केल्यामुळे केस गळती आणखीन वाढू लागते. त्यामुळे केसांना सूट होईल असे शॅम्पू आणि हेअर ऑईलचा वापर केला पाहिजे.केस गळतीची समस्या वाढू लागल्यानंतर कितीही उपाय केले तरीसुद्धा आराम मिळत नाही. अशावेळी तुम्ही योगासने करून केस गळती थांबवू शकता. चला तर जाणून घेऊया केसांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी कोणती योगासने करावीत.(फोटो सौजन्य-istock)
कॅमल योग केल्याने केस गळतीची समस्या कमी होते. हे योगासन करताना गुडघ्यांवर बसून मान वर उंच करा. केस मोकळे सोडून मान उलट दिशेने मागे वाकवा. तसेच हे योगासन करताना दोन्ही हात उलट्या दिशेला ठेवून पायांवर टेकवा. हात मागे आणि डोकं खाली या स्थितीमध्ये 30 सेकंड तसेच राहून नंतर पुन्हा नॉमल स्थितीमध्ये या. हे योगासन नियमित केल्यामुळे केसांच्या मुळांमधील रक्तभिसरण सुधारण्यास मदत होईल.
हे देखील वाचा: पावसाळ्यातील आजारांपासून ‘अशा’ पद्धतीने करा शरीराचे रक्षण, आरोग्य राहील निरोगी
केसांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी अधोमुखासन करावे. यामुळे केस गळती थांबून केसांची वाढ होण्यास मदत होते. केसांसोबतच तुमचे आरोग्य सुद्धा चांगले राहण्यासाठी मदत होते. नियमित योगासने केल्यास तुमच्या केसांवर काही दिवसांमध्ये फरक दिसू लागेल.
दीर्घ श्वास घेणे हा योग प्रकार केल्यामुळे तुमच्या केसांची वाढ होण्यास मदत होईल. हे आसन करताना वज्रासनात बसावे. त्यानंतर दीर्घ श्वास घ्यावा. यामुळे मन शांत राहून मानसिक ताण तणाव कमी होण्यास मदत होते.
हे देखील वाचा: आरोग्याची काळजी करणाऱ्यांमध्ये जास्त असते हार्ट अटॅकचे प्रमाण? जाणून घ्या