पाणी पिण्याची योग्य पद्धत
जीवन जगण्यासाठी अन्न, पाणी,निवारा या तीन गोष्टींची मूलभूत गरज असते. पाण्याशिवाय माणूस जगूच शकत नाही. एकवेळ माणसाला अन्न मिळाले नाहीतरी चालेल पण पाणी हे हवेच. सर्वच ऋतूंमध्ये शरीराला पाण्याची आवश्यकता असते. शरीरामध्ये पाण्याची कमतरता भासू लागल्यानंतर आरोग्यसंबंधित अनेक समस्या उद्भवण्यास सुरुवात होते. त्यामुळे रोज भरपूर पाणी प्यावे. पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. डिहायड्रेशनपासून बचाव करण्यासाठी दररोज पाणी पिणे आवश्यक आहे. शरीरामध्ये पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्य बिघडण्यास सुरुवात होते. पण चुकीच्या पद्धतीने पाणी प्यायल्यामुळे आरोग्यासंबंधित गंभीर समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पाणी पिण्याची योग्य पद्धत सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
नेहमी पाणी पिताना बसून पाणी प्यावे. ऑफिसमध्ये किंवा घरात, इतर ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला उभं राहून पाणी पिण्याची सवय असते. पण असे केल्यामुळे पोटात दुखणे किंवा आरोग्यसंबंधित इतर समस्या उद्भवण्याची शक्यता असते. आयुर्वेदात सांगितल्यानुसार, उभं राहून पाणी प्यायल्यामुळे शरीरातील द्रवांचे संतुलन बिघडून जाते, जे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
हे देखील वाचा: सतत केस गळून पातळ झाले आहेत? तर ‘हे’ योग नक्की करून पहा
पाणी पिण्याची योग्य पद्धत
नेहमी पाणी पिण्यासाठी काचेचा ग्लास वापरावा. काहींना बाटलीमधून पाणी पिण्याची सवय असते, पण हे आरोग्यसाठी हानिकारक ठरू शकते. बाटलीने पाणी पिण्याऐवजी ग्लासातून पाणी प्यावे. ग्लासमधून प्यायलेले पाणी शरीरामध्ये हळूहळू जाऊन तहान भागते. यामुळे शरीराला कोणतीही हानी पोहचत नाही. त्यामुळे नेहमी काचेच्या ग्लासमधून किंवा कोणत्या ग्लासचा वापर करून सीप करत पाणी प्यावे.
हे देखील वाचा: झटपट Collagen बूस्ट करतील ‘हे’ 5 फूड्स, चेहरा नेहमी राहील तरुण
नेहमी पाणी पिताना जास्त थंड पाणी पिऊ नये. थंड पाणी प्यायल्यामुळे सर्दी किंवा खोकला होण्याची शक्यता असते. थंडगार पाणी आरोग्यासाठी हानिकारक आहे.सतत थंड पाणी प्यायल्यामुळे पचनसंस्था बिघडण्याची शक्यता असते. शरीराचे नुकसान होऊ नये म्हणून नेहमी कोमट किंवा साधे पाणी प्यावे.