Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Health Care Tips: हातापायांना कायमच सूज येते? किडनीपासून हृदयापर्यंत ‘या’ कारणांमुळे पायाला येऊ शकते सूज

Health Care Tips: शरीरात साचून राहिलेले द्रव पदार्थ, सोडियम किंवा पाण्याची वाढती पातळी इत्यादी बदलांमुळे हातापायांना सूज येण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे सूज दोन ते तीन दिवसांपेक्षा जास्त वेळ टिकून राहिल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे फार आवश्यक आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 01, 2026 | 01:59 PM
हातापायांना कायमच सूज येते? किडनीपासून हृदयापर्यंत ‘या’ कारणांमुळे पायाला येऊ शकते सूज

हातापायांना कायमच सूज येते? किडनीपासून हृदयापर्यंत ‘या’ कारणांमुळे पायाला येऊ शकते सूज

Follow Us
Follow Us:

हातापायांना सूज येण्याची कारणे?
रक्तभिसरणात कशामुळे अडथळे निर्माण होतात?
शरीरात कोणत्या कारणांमुळे पाणी साचून राहते?

Health Care Tips: धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, जंक फूडचे अतिसेवन, पोषक घटकांची कमतरता आणि शरीरात होणाऱ्या बदलांकडे वारंवार दुर्लक्ष केल्यामुळे आरोग्य बिघडण्याची जास्त शक्यता असते. कामाच्या धावपळीमध्ये आरोग्याकडे जास्त लक्ष दिले जात नाही. वारंवार हातापायांना सूज येणे, खूप जास्त थकल्यासारखे वाटते, अशक्तपणा इत्यादी लक्षणे दिसू लागल्यानंतर सुद्धा उपचार केले जात नाहीत. यामुळे छोटे आजार गंभीर स्वरूप घेतात. त्यामुळे शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे फार आवश्यक आहे. किडनीचे आजार, शरीरात जास्त द्रव साचणे, रक्ताभिसरणातील अडथळे किंवा आरोग्यासंबंधित समस्यांमुळे हातापायांना सूज येते. सूज आल्यानंतर काहींना वेदना, लालसरपणा किंवा श्वास घेण्याचा सुद्धा त्रास होतो.(फोटो सौजन्य – istock)

Drinking Water Tips: पाणी पिताना केलेली ‘ही’ एक चूक किडनीच्या आरोग्यासाठी ठरेल धोकादायक, जाणून घ्या पाणी पिण्याची योग्य पद्धत

कोणत्या कारणांमुळे हातापायांना सूज येते:

तासनतास एका जागेवर बसून राहणे किंवा उभं राहिल्यामुळे पायांना सूज येऊ शकते. पण वारंवार पायांना सूज येत असेल तर दुर्लक्ष करू नये. पायांमधील रक्तभिसरणात अडथळे निर्माण झाल्यानंतर किंवा पायांमध्ये द्रव पदार्थ साचून राहिल्यानंतर पाय टम्म फुगलेले दिसतात. याशिवाय प्रवास करताना किंवा दिवसभर उभं राहिल्यामुळे पायांच्या धोट्यांजवळ सूज येते. ही सूज जास्त दिवस टिकून राहिल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत. आहारात अतिप्रमाणात मिठाचे सेवन केल्यानंतर किडनीच्या आरोग्यावर परिणाम होतो आणि शरीरात सोडियमची पातळी वाढते. सतत प्रक्रिया केलेले किंवा जास्त वेळ स्टोर करून ठेवलेले पदार्थ चवीला चांगले लागतात, पण यामुळे शरीरावर दीर्घकालीन परिणाम होण्याची शक्यता असते.

पोषक घटकांची कमतरता:

कायमच निरोगी राहण्यासाठी शरीराला पोषक घटकांची आवश्यकता असते. पण काहीवेळा आहारात होणाऱ्या बदलांमुळे पोषक घटकांची कमतरता निर्माण होऊन हातापायांना सूज येणे, स्नायूंमध्ये वेदना इत्यादी लक्षणे दिसू लागतात. रक्तातील अल्ब्युमिनसारख्या प्रथिनांची पातळी कमी झाल्यानंतर शरीरातील द्रव रक्तवाहिन्यांमध्ये साचून राहतात. यामुळे हात किंवा पायांना सूज येते. संबंधित लक्षणे शरीरात दिसू लागल्यानंतर तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे फार आवश्यक आहे.

डासांचा करायचाय नायनाट! लिंबाचे साल फेकून देण्याऐवजी त्याचा असा करा वापर; घरगुती उपायाने सर्व डास होतील छुमंतर

किडनीच्या कार्यात निर्माण झालेले अडथळे:

शरीरामध्ये पाण्याची किंवा सोडियमची पातळी वाढल्यानंतर किडनीच्या आरोग्यावर थेट परिणाम होतो. शरीरातील द्रव पदार्थ खालच्या बाजूला साचून राहतात. ज्याच्या परिणामामुळे हात, पाय, घोटे किंवा चेहऱ्याला सूज येते. किडनीच्या आजारांची लागण झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये दिसून येणारे मुख्य लक्षण म्हणजे सूज येणे. नेहमीच झोपेतून उठल्यानंतर पायांमध्ये सूज दिसत असेल तर दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावेत.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: हातापायांना सतत सूज येण्यामागे कोणती कारणे असू शकतात?

    Ans: शरीरात द्रव साचणे, जास्त वेळ उभे राहणे किंवा बसणे, काही औषधे, शिरांमधील रक्तप्रवाहातील समस्या तसेच किडनी, हृदय किंवा यकृताशी संबंधित आजारांमुळे सूज येऊ शकते.

  • Que: किडनीच्या आजारामुळे पायांना सूज का येते?

    Ans: किडनी शरीरातील अतिरिक्त द्रव आणि सोडियम बाहेर काढण्याचे काम करते. किडनीचे कार्य बिघडल्यास शरीरात द्रव साचू शकतो आणि पाय, घोटे किंवा इतर भागांमध्ये सूज दिसू शकते.

  • Que: हृदयाच्या समस्येमुळे पाय सुजू शकतात का?

    Ans: होय. काही हृदयविकारांमध्ये हृदयाची रक्त पंप करण्याची क्षमता कमी झाल्यास शरीरात द्रव साचू शकतो. त्यामुळे विशेषतः पाय आणि घोट्यांमध्ये सूज दिसू शकते.

Web Title: Health care tips what causes persistent swelling in the legs and feet know the warning signs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2026 | 01:59 PM

Topics:  

  • Health Care Tips
  • health issue
  • Kidney Health Tips

संबंधित बातम्या

अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असलेल्या भोपळ्याचे सेवन केल्यास शरीराला होतील भरमसाट फायदे, हार्मोन्स राहील संतुलित
1

अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असलेल्या भोपळ्याचे सेवन केल्यास शरीराला होतील भरमसाट फायदे, हार्मोन्स राहील संतुलित

Drinking Water Tips: पाणी पिताना केलेली ‘ही’ एक चूक किडनीच्या आरोग्यासाठी ठरेल धोकादायक, जाणून घ्या पाणी पिण्याची योग्य पद्धत
2

Drinking Water Tips: पाणी पिताना केलेली ‘ही’ एक चूक किडनीच्या आरोग्यासाठी ठरेल धोकादायक, जाणून घ्या पाणी पिण्याची योग्य पद्धत

Eating Chicken Daily: ३० दिवस नियमित चिकन खाल्ल्यास शरीरावर होतील ‘हे’ परिणाम, वजनापासून पचनक्रियेपर्यंत दिसून येतील बदल
3

Eating Chicken Daily: ३० दिवस नियमित चिकन खाल्ल्यास शरीरावर होतील ‘हे’ परिणाम, वजनापासून पचनक्रियेपर्यंत दिसून येतील बदल

Kidney Detox Food: किडनीमधील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी खा ‘हे’ हेल्दी पदार्थ, शरीर होईल स्वच्छ
4

Kidney Detox Food: किडनीमधील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी खा ‘हे’ हेल्दी पदार्थ, शरीर होईल स्वच्छ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.