पाणी पिताना केलेली 'ही' एक चूक किडनीच्या आरोग्यासाठी ठरेल धोकादायक, जाणून घ्या पाणी पिण्याची योग्य पद्धत
दिवसभरात किती लिटर पाणी पिणे आवश्यक आहे?
किडनीच्या आजार असल्यास पाण्याचे प्रमाण किती असावे?
अतिप्रमाणात पाणी पिण्याचे तोटे?
Drinking Water Tips: पाणी शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. शरीरातील द्रवपदार्थ आणि इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन राखण्यासाठी शरीरास आवश्यक असलेल्या प्रमाणात पाणी पिणे आवश्यक आहे. दिवसभरात २ ते ३ लिटर पाणी प्यावे. पण चुकीच्या पद्धतीने पाण्याचे सेवन केल्यास किडनीच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. अतिप्रमाणात पाण्याचे सेवन केल्यास रक्तातील सोडियमची पातळी कमी होऊन हायपोनेट्रेमियासारख्या गंभीर आजाराची लागण होऊ शकते. त्यामुळे तहान, लघवीचा रंग, हवामान आणि आरोग्याची स्थिती लक्षात घेऊन पाण्याचे प्रमाण ठरवावे. अनेक लोक सकाळी उठल्यानंतर एक किंवा दोन ग्लास पाणी उपाशी पोटी पितात. पण चुकीच्या पद्धतीने पाणी प्यायल्यामुळे पोटात वेदना किंवा इतर समस्या उद्भवण्याची शक्यता असते.(फोटो सौजन्य – istock)
अतिरिक्त पाणी प्यायल्यामुळे किडनीवर तणाव येतो. रक्तातील सोडियमचे प्रमाण अचानक कमी झाल्यामुळे हायपोनेट्रेमिया नावाची गंभीर आणि जीवघेणी स्थिती निर्माण होते, त्यामुळे किडनीचे आजार किंवा डायलिसीस असणाऱ्या व्यक्तींनी आवश्यक प्रमाणात पाणी प्यावे. रक्तातील सोडियमची पातळी कमी झाल्यामुळे पेशींमध्ये सूज, तीव्र डोकेदुखी, उलट्या, गोंधळ उडणे किंवा व्यक्ती कोमामध्ये जाऊ शकतो. चला तर जाणून घेऊया पाणी पिण्याची योग्य पद्धत.
प्रत्येक व्यक्तीच्या शरीरासाठी पाण्याचे प्रमाण निश्चित नसते. सामान्य व्यक्तींसाठी दिवसभरात २ किंवा ३ लिटर पाणी पुरेसे आहे. वय, शरीराची रचना, हवामान, शारीरिक श्रम आणि आरोग्याच्या स्थितीवर पाण्याचे प्रमाण अवलंबून असते. जर तुम्ही दिवसभरात सतत उन्हामध्ये काम करत असाल तर ४ ते ५ लिटर पाणी शरीरासाठी आवश्यक आहे. पाण्यासोबतच आहारात वेगवेगळ्या फळांचे आणि शरीराला ऊर्जा देणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीरातील पाण्याचे संतुलन टिकून राहते.
जर तुमचे शरीर हायड्रेट असेल तर लघवीचा रंग फिकट पिवळा असतो. तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी योग्य आहे. पण जर तुम्ही औषधे, सप्लिमेंट्स आणि इतर गंभीर आजाराची औषध घेत असाल तर लघवीच्या रंगात बदल होऊ शकतो. त्यामुळे पाणी पिण्याचे कोणतेही टारगेट नसते. शरीरास आवश्यक असलेल्या प्रमाणात पाणी पिणे फार आवश्यक आहे. रक्त तपासणी करण्याच्या आधी खूप जास्त पाणी प्यायले असाल तर रक्त सौम्य होते, ज्यामुळे क्रिएटिनिनचे प्रमाण कमी दिसू लागते. त्यामुळे दिवसभरात अतिप्रमाणात पाणी पिण्याऐवजी शरीरास आवश्यक असेल तेवढेच पाणी प्यावे.
Ans: एकाच वेळी खूप मोठ्या प्रमाणात पाणी पिणे किंवा शरीराला गरज नसताना अतिप्रमाणात पाणी पिणे टाळावे. योग्य प्रमाणात आणि दिवसभरात अंतराने पाणी पिणे अधिक योग्य आहे.
Ans: पाण्याची गरज प्रत्येक व्यक्तीच्या वय, वजन, शारीरिक हालचाल, हवामान आणि आरोग्यस्थितीनुसार बदलते. त्यामुळे प्रत्येकासाठी ठराविक प्रमाण लागू होत नाही.
Ans: तहान ही शरीराला द्रवपदार्थांची गरज असल्याचे एक संकेत आहे. मात्र उष्ण वातावरण, व्यायाम किंवा जास्त घाम येत असल्यास नियमितपणे द्रवपदार्थ घेणे महत्त्वाचे असते.






