High BP च्या त्रासाने हैराण झाला आहात? मग सकाळी उठल्यानंतर नियमित प्या 'हे' ड्रिंक, रक्तदाब राहील नियंत्रणात
High Blood Pressure: जीवनशैलीत सतत होणाऱ्या बदलांमुळे तरुण वयात शरीराला गंभीर आजारांची लागण होते. त्यातील अतिशय त्रासदायक आजार म्हणजे उच्च रक्तदाब. उच्च रक्तदाब वाढल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. पण कालांतराने लक्षणे अधिक स्पष्ट दिसू लागतात. त्यामुळे शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता योग्य ते उपचार करावेत. वाढत्या रक्तदाबाचा परिणाम हृदय, किडनी आणि शरीराच्या इतर भागांवर होऊ शकतो. त्यामुळे रक्तदाब वाढल्यानंतर तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे फार आवश्यक आहे. गोळ्या औषधांसोबतच या ड्रिंकचे सेवन केल्यास रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होईल.(फोटो सौजन्य – istock)
वाढलेला रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी सकाळच्या वेळी या ड्रिंकचे सेवन करावे. यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यासोबतच शरीराला सुद्धा फायदे होतात. बीट, जवस, दालचिनी आणि आलं एवढेच पदार्थ लागणार आहेत. सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी ड्रिंक प्यावे. बीटामध्ये नायट्रेट्स युक्त घटक असतात, ज्यामुळे रक्तवाहिन्या सैल होण्यास मदत होते आणि शरीराचा रक्तप्रवाह सुधारतो. जवस बियांमध्ये असलेले ओमेगा-३ फॅटी अॅसिड आणि फायबर हृदयाच्या आरोग्यसाठी गुणकारी ठरतात.
दालचिनीच्या सेवनामुळे हृदयाचा रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते. तर आल्यामध्ये असलेले दाहक विरोधी गुणधर्म आणि अँटीऑक्सिडंट शरीराला आलेली सूज कमी करतात. त्यामुळे हे ड्रिंक हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. सामान्य रक्तदाब साधारणपणे १२०/८० असावा. पण रक्तदाब वाढल्यानंतर सिस्टोलिक रक्तदाब १३० ते १३९ आणि डायस्टोलिक रक्तदाब ८० ते ८९ दरम्यान असू शकतो. रक्तदाब १८०/१२० पर्यंत पोहचत असेल तर शरीरासाठी धोक्याचे लक्षण आहे.
ड्रिंक बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात बीटचे तुकडे आणि थोडस पाणी घालून बारीक पेस्ट तयार करा. तयार केलेले मिश्रण गाळून घ्या. त्यानंतर त्यात जवस बियांची पावडर, दालचिनी पावडर आणि चमचाभर आल्याचा रस घालून व्यवस्थित मिक्स करा. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी नियमित बीटच्या रसाचे सेवन केल्यास रक्तदाब कमी होण्यास मदत होईल. याशिवाय रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात कमीत कमी मिठाचा समावेश करावा.
Ans: सकाळी बीटरूटचा रस, कमी मीठ असलेले लिंबूपाणी किंवा साधे पाणी पिणे हा आहाराचा भाग असू शकतो. बीटरूटमधील नायट्रेट्स रक्तवाहिन्यांच्या कार्यास मदत करू शकतात.
Ans: बीटरूटमध्ये नैसर्गिक नायट्रेट्स असतात. त्यांचे शरीरात नायट्रिक ऑक्साइडमध्ये रूपांतर होते, ज्यामुळे रक्तवाहिन्या शिथिल होण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे काही लोकांमध्ये रक्तदाबात सौम्य घट दिसू शकते.
Ans: रिकाम्या पोटी ज्यूस पिणे आवश्यक नाही. संतुलित आहाराचा भाग म्हणून मर्यादित प्रमाणात फळे किंवा भाज्यांचा रस घेता येतो.






