Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Health Update: रक्ताच्या एका थेंबामधून समजणार आता दोन आजार! दुर्गम भागांतही कमी खर्चात निदान आता शक्य

Health Update : सिकलसेलवरील उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या हायड्रॉक्सियुरिया या औषधाचा परिणाम तपासण्यासाठीही हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरू शकते. उपचार सुरू असलेल्या रुग्णांच्या रक्तातील श्यानतेत अपेक्षित बदल होत असल्याचे संशोधकांना आढळले. त्यामुळे उपचारांचा प्रतिसाद तपासण्यास मदत होऊ शकते.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 24, 2026 | 08:57 AM
रक्ताच्या एका थेंबामधून समजणार आता दोन आजार! दुर्गम भागांतही कमी खर्चात निदान आता शक्य

रक्ताच्या एका थेंबामधून समजणार आता दोन आजार! दुर्गम भागांतही कमी खर्चात निदान आता शक्य

Follow Us
Follow Us:

Health Update: रक्ताच्या एका थेंबाचा काचेच्या पट्टीवर किती लांबपर्यंत लेप तयार होतो, यावरून अॅनिमिया आणि सिकल सेल या दोन आजारांची ओळख पटवता येणार आहे. आयआयटी मुंबईच्या संशोधकांनी विकसित केलेल्या या किफायतशीर तंत्रज्ञानासाठी सुसज्ज पॅथॉलॉजी प्रयोगशाळेची गरज नाही. त्यामुळे दुर्गम भागांतील आणि आदिवासी समुदायांतील रुग्णांसाठी निदानाचा नवा पर्याय उपलब्ध होण्याची शक्यता आहे. आयआयटी मुंबईच्या रासायनिक अभियांत्रिकी विभागातील प्रा. महेश तिरुमकुडुलू यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांनी रक्ताच्या दाटपणाचा अभ्यास केला. नियंत्रित पद्धतीने काचेच्या पट्टीवर रक्ताचा थेंब पसरवून तयार झालेल्या लेपाची लांबी मोजली जाते. रक्तातील लाल पेशींचे प्रमाण, प्लाझ्माची दाटपणा आणि पेशींची लवचिकता यांमुळे या लांबीमध्ये फरक पडतो. याच फरकाचा निदानासाठी उपयोग केला आहे.(फोटो सौजन्य – istock)

Sciatica Pain: सायटिकाची ‘ही’ लक्षणे दिसू लागल्यास अजिबात करू नका दुर्लक्ष, अन्यथा कायमच राहाल अंथरुणाला खिळून

सिकलसेलसाठी ऑक्सिजन काढून घेतली चाचणी

सिकलसेल निदानासाठी रक्तातील ऑक्सिजन कमी केल्यानंतर होणारा बदल मोजण्यात आला. यासाठी सोडियम मेटाबायसल्फाइट या स्वस्त रसायनाचा वापर केला. महाराष्ट्र आणि मध्य भारतातील आदिवासी भागांतील ३९४ व्यक्तींवर केलेल्या चाचण्यांत निरोगी व्यक्ती, सिकलसेलचे वाहक आणि बाधित रुग्ण यांच्यातील फरक स्पष्ट झाला. या पद्धतीने सुमारे ९५ टक्के बाधित रुग्णांची योग्य ओळख पटवता आली.

उपचारांचा परिणामही समजणार

सिकलसेलवरील उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या हायड्रॉक्सियुरिया या औषधाचा परिणाम तपासण्यासाठीही हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरू शकते. उपचार सुरू असलेल्या रुग्णांच्या रक्तातील श्यानतेत अपेक्षित बदल होत असल्याचे संशोधकांना आढळले. त्यामुळे उपचारांचा प्रतिसाद तपासण्यास मदत होऊ शकते. या संशोधनाच्या प्रथम लेखिका डॉ. महरूख मीर असून, शोधनिबंध ‘लॅब ऑन अ चिप’ या नियतकालिकात प्रकाशित झाला आहे. तंत्रज्ञानाच्या व्यावसायिक वापरासाठी ‘रिओहीम प्रायव्हेट लिमिटेड’ या स्टार्टअपला परवाना देण्यात आला आहे. प्रत्यक्ष वापर आणि आवश्यक प्रशासकीय मान्यतांसाठी संशोधक संबंधित संस्थांसोबत काम करत आहेत.

ॲनिमियासाठी ५१६ व्यक्तींचा अभ्यास

तीव्र ॲनिमियाच्या निदानासाठी ५१६ व्यक्तीच्या रक्ताच्या नमुन्यांचा अभ्यास करण्यात आला. हिमोग्लोबिनचे प्रमाण आणि रक्ताची श्यानता यांचा संबंध आढळला. या पद्धतीने तीव्र अॅनिमिया असलेल्या ९५.१ टक्के व्यक्ती, तर हा आजार नसलेल्या ८६ टक्के व्यक्तीची योग्य ओळख पटवता आली. हिमोग्लोबिनचे प्रमाण अंदाजे ±०.८ ग्रॅम प्रति डेसीलिटर अचूकतेने ओळखता आले.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

💡

Frequently Asked Questions

  • Que: रक्ताच्या एका थेंबातून दोन आजारांचे निदान कसे करता येते?

    Ans: आधुनिक निदान तंत्रज्ञानाच्या मदतीने रक्तातील विशिष्ट जैविक घटकांचे विश्लेषण करून एकाच नमुन्यातून दोन किंवा अधिक आजारांशी संबंधित संकेत शोधता येऊ शकतात.

  • Que: एका रक्ताच्या नमुन्यातून दोन आजार ओळखण्याचे फायदे काय आहेत?

    Ans: एकाच नमुन्यातून अनेक चाचण्या करता आल्यास रुग्णांना वारंवार रक्त देण्याची गरज कमी होऊ शकते. तसेच वेळ आणि काही परिस्थितींमध्ये तपासणीचा खर्चही वाचू शकतो.

  • Que: ही चाचणी दुर्गम भागांमध्ये कशी उपयुक्त ठरू शकते?

    Ans: चाचणीसाठी कमी प्रमाणात रक्त, कमी खर्चाची उपकरणे आणि तुलनेने सोपी प्रक्रिया आवश्यक असल्यास दुर्गम भागांमध्ये प्राथमिक निदान करणे अधिक सुलभ होऊ शकते.

Web Title: Health update two diseases can be understood from one drop of blood even in remote areas at low cost at least now possible sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2026 | 08:57 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • Health Update
  • IIT Bombay

संबंधित बातम्या

Sciatica Pain: सायटिकाची ‘ही’ लक्षणे दिसू लागल्यास अजिबात करू नका दुर्लक्ष, अन्यथा कायमच राहाल अंथरुणाला खिळून
1

Sciatica Pain: सायटिकाची ‘ही’ लक्षणे दिसू लागल्यास अजिबात करू नका दुर्लक्ष, अन्यथा कायमच राहाल अंथरुणाला खिळून

Uric Acid: शरीरातील युरिक ॲसिडची पातळी वाढल्यानंतर दिसून येतात ‘ही’ गभींर लक्षणे, सांध्यांमधील वेदना कमी करण्यासाठी घरगुती उपाय
2

Uric Acid: शरीरातील युरिक ॲसिडची पातळी वाढल्यानंतर दिसून येतात ‘ही’ गभींर लक्षणे, सांध्यांमधील वेदना कमी करण्यासाठी घरगुती उपाय

International Stuttering Awareness Day: ‘नीट बोल’चा दबाव तोतरेपणाची भीती वाढवतो! शाळेत जाणाऱ्या ५ टक्के मुलांमध्ये आढळतो तोतरेपणा
3

International Stuttering Awareness Day: ‘नीट बोल’चा दबाव तोतरेपणाची भीती वाढवतो! शाळेत जाणाऱ्या ५ टक्के मुलांमध्ये आढळतो तोतरेपणा

Urinary Incontinence: खोकताना, शिंकताना लघवीचे थेंब पडतात? शरीरसंबंधित असू शकतो ‘या’ गंभीर आजारांचा धोका
4

Urinary Incontinence: खोकताना, शिंकताना लघवीचे थेंब पडतात? शरीरसंबंधित असू शकतो ‘या’ गंभीर आजारांचा धोका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.