दही खाण्याचे फायदे
सर्वच ऋतूंमध्ये दही, दुधाचे सेवन केले जाते. दही, दूध, ताक इत्यादी पदार्थ लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप आवडतात. आपल्यातील अनेकांना दूध किंवा दह्यापासून बनवलेले पदार्थ खायला आवडत नाहीत. दही खाणे आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये रोजच्या आहारात अनेक घरांमध्ये नियमित दही आणि ताकाचे सेवन केले जाते. दही खाल्यामुळे शरीराला थंडावा मिळतो. त्यामुळे नियमित तुम्ही दही खाऊ शकता. दुपारच्या आहारात दह्याचे सेवन केल्यास पचनक्रिया सुधारण्यासोबतच आरोग्य सुधारण्यासाठी सुद्धा मदत होते. दह्यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, विटामिन बी 6 आणि विटामिन बी 12 इत्यादी अनेक घटक आढळून येतात. त्यामुळे रोजच्या आहारात किंवा इतर वेळी तुम्ही दह्याचे सेवन करू शकता. चला तर जाणून घेऊया दही खाण्याचे गुणकारी फायदे.(फोटो सौजन्य-istock)
रोजच्या आहारात दह्याचे सेवन केल्यामुळे शरीराला थंडावा मिळतो. तसेच शरीरातील उष्णता कमी होऊन आरोग्य सुधारण्यास मदत होते. दह्यामध्ये चांगल्या बॅक्टेरिया मुबलक प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे दही खाल्यास शरीर निरोगी राहून आरोग्य सुधारण्यास मदत होते. बद्धकोष्ठता, गॅस, ॲसिडिटी आणि पोटासंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आहारात दही किंवा ताकाचे सेवन करावे.
हे देखील वाचा: रोज किती शेंगदाणे खाणं आरोग्यासाठी फायदेशीर माहितेय?
नियमित दही खाल्यास शरीरातील कमी झालेली ऊर्जा वाढण्यास मदत होते. त्यामुळे रोज दुपारच्या आहारात एक वाटी दह्याचे सेवन करावे. दह्यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन बी चे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे शरीरातील कमी झालेली ऊर्जा वाढण्यास मदत होते. दही किंवा ताक प्यायल्यामुळे शरीरातील ऊर्जा वाढण्यासोबतच आरोग्य सुधारण्यास मदत होते.
अनेकदा खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. यामुळे उलट्या, जुलाब किंवा अतिसारची समस्या अनेकांना जाणवते. अशावेळी शरीराला थंडावा देण्यासाठी आहारात दह्याचे सेवन करावे. दही खाल्यामुळे पचनक्रिया सुधारून आरोग्याला अनेक फायदे होतात. सकाळच्या आहारात प्रथिने युक्त पदार्थांचे सेवन करून दुपारी दही खावे.
हे देखील वाचा: ‘या’ व्यक्तींच्या आरोग्यासाठी साबुदाणा ठरेल घातक, अन्यथा उद्भवतील आरोग्यासंबंधित गंभीर समस्या
बद्धकोष्ठतेच्या समस्येने अनेक लोक त्रस्त आहेत. चुकीची जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये सतत होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवते. त्यामुळे आहारात दह्याचे सेवन केल्यास बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवणार नाही.