
भिजवलेल्या बिया खाण्याचे फायदे
निरोगी जीवनशैली जगण्यासाठी अनेक लोक रोजच्या आहारात पौष्टिक पदार्थांचे सेवन करतात. त्यामध्ये फळे, भाज्या, चिकन, अंडी, ब्रोकोली इत्यादी अनेक पदार्थांचे सेवन केले जाते. हल्ली वातावरणात सातत्याने होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर दिसू लागल्यानंतर शरीरसंबंधित अनेक गंभीर समस्या उद्भवतात. या समस्यांपासून दूर राहण्यासाठी आहारात पौष्टिक पदार्थांसोबतच बियांचे सुद्धा सेवन करावे.
बियांचे सेवन केल्यामुळे शरीराला आवश्यक असलेली प्रथिने, फायबर, ओमेगा-३ फॅटी ॲसिड आणि खनिजे इत्यादी पौष्टिक असतात. त्यामुळे रोजच्या आहारात अंबाडीच्या बिया, चिया सीड्स आणि इतरही बियांचे सेवन करू शकता. या बिया खाल्ल्यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते. आज आम्ही तुम्हाला अशा काही बियांबद्दल सांगणार आहोत, ज्याचे सेवन पाण्यात भिजवल्यानंतर करावे. भिजवलेल्या बिया खाल्ल्यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: तुपात भिजवलेले खजूर खाणे आरोग्यासाठी फायदेशीर की नुकसानदायक? जाणून घ्या
अपचन किंवा वाढलेल्या वजनाने त्रस्त असाल तर रोज सकाळी उठल्यानंतर एक ग्लास चिया सीड्सचे पाणी प्यावे. यासाठी एक ग्लास पाण्यात अर्धा चमचा चिया सीड्स टाकून भिजत ठेवा. त्यानंतर सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी बियांच्या पाण्याचे सेवन करा. चिया सीड्समध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड आणि फायबर मुबलक प्रमाणात आढळून येते, ज्यामुळे वाढलेले वजन कमी होण्यास आणि हृदयाचे आरोग्य सुधारते.
अंबाडीच्या बियांपासून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. या बियांचे नियमित सेवन केल्यास हाडांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. अंबाडीच्या बिया भिजवल्यानंतर जेलीसारख्या होऊन जातात. तसेच या बियांचे पाणी सुद्धा आरोग्यासाठी गुणकारी आहे. शरीरात वाढलेली कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आणि हृदय निरोगी ठेवण्यासाठी नियमित अंबाडीच्या बियांचे सेवन करावे.
भोपळ्याच्या बिया सॅलेड किंवा इतर पदार्थांमध्ये वारपल्या जातात. या बियांमध्ये झिंक आणि मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणावर आढळून येते. ज्यामुळे स्नायू आणि हाडांचे आरोग्य सुधारते.
हे देखील वाचा: अंजीरचा ज्यूस पिण्याचे 5 जबरदस्त फायदे
सूर्यफुलाच्या बियांमध्ये प्रथिने आणि अँटिऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत आहे. त्यामुळे या बिया तुम्ही भिजवून किंवा साल काढून अशाच खाऊ शकता. या बियांचे नियमित सेवन केल्यामुळे शरीराची कमी झालेली ऊर्जा वाढून रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते.