तूप आणि खजूर दोन्ही फायदेशीर गोष्टी आहेत. आपण कित्येकदा आपल्या दैनंदिन आहारात तुपाचा वापर करत असतो. कधी आपण त्याचा वापर डाळ भातात करतो तर कधी साजूक पूर्ण पोळीत. तर दुसरीकडे खजूर आपण गोडधोड पदार्थात वापरात असतो. पण या दोन्ही गोष्टी आपण एकत्र खाल्ले तर फायदा होईल की नुकसान? चला जाणून घेऊया तुपात भिजवलेले खजूर खाल्ल्यास आपल्या शरीरावर त्याचा काय परिणाम होते.
तूप आणि खजूर खाल्ल्याने काय होते (फोटो सौजन्य: Freepik)

आयुर्वेदानुसार खजूर आणि तूप हे ऊर्जेचे चांगले स्रोत आहेत. तसेच, कफ, चिंता आणि तणाव व हाडांच्या आरोग्यासाठी देखील तूप चांगले मानले जाते.

जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर तुम्ही विशेषतः तुमच्या दिनचर्येत खजूर आणि तुपाचा समावेश करावा. खजूरमध्ये भरपूर फायबर असते आणि तुपासोबत ते पोटाचे पचन सुरळीत करण्याचे काम करते.

खजूरमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस असते, जे हाडांचे आरोग्य राखण्यास मदत करते. यामुळे आपली हाडं अधिक मजबूत होतात.

खजूरमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि भरपूर जीवनसत्त्वे असतात. तुपामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. दोन्ही मिळून तुमची प्रतिकारशक्ती वाढवतात.

तज्ज्ञांच्या मते, तूप आणि खजूर यांचे मिश्रण त्वचेसाठी आश्चर्यकारक आहे. तुपामध्ये असलेले हेल्दी फॅट्स आणि खजूरमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स त्वचेचे पोषण करतात आणि ते हायड्रेट ठेवतात.






