Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोणत्याही क्षणी येईल Heart Attack! शरीरात दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, जाणून घ्या सविस्तर

हार्ट अटॅक हा सायलेंट किलर आजार आहे. शरीरात महिनाभर आधी अनेक अतिशय सामान्य वाटणारी पण शरीरासाठी घातक असलेली लक्षणे दिसू लागतात. या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 24, 2026 | 08:37 AM
कोणत्याही क्षणी येईल Heart attack! शरीरात दिसून येणाऱ्या 'या' लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, जाणून घ्या सविस्तर

कोणत्याही क्षणी येईल Heart attack! शरीरात दिसून येणाऱ्या 'या' लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Close
Follow Us:

हार्ट अटॅक येण्याची कारणे?
हार्ट अटॅक येण्याआधी दिसून येणारी लक्षणे?
हृद्यविकारापासून बचाव कसा करावा?

जगभरात हार्ट अटॅक येऊन मृत्यू होणाऱ्या लोकांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. जीवनशैलीत होणारे बदल, आहारात होणारा बदल, अपुरी झोप, जंक फूडचे, शारीरिक हालचालींचा अभाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. हार्ट अटॅक केवळ वयस्कर लोकांचं नाहीतर तरुण वयातील मुलामुलींना सुद्धा हार्ट अटॅक येत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक आल्यामुळे काहींचा मृत्यू देखील होतो. डॉक्टरांच्या मते, कार्डियाक अरेस्ट किंवा हार्ट अ‍ॅटॅक कधीच अचानक येत नाही. त्यामुळे सुरुवातीच्या दिवसांमध्ये दिसून येणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यामुळे हृदयाला व्यवस्थित ऑक्सिजन पुरवठा होत नाही. ज्यामुळे आरोग्य बिघडते. हार्ट अटॅक हा सायलेंट किलर आजार आहे. आज आम्ही तुम्हाला हार्ट अटॅक येण्याच्या काही दिवस आधी शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)

Thyroid झाल्यानंतर महिलांच्या शरीरात दिसून येतात ‘हे’ मोठे बदल, वेळीच धोका ओळखून करा योग्य उपचार

पायांना किंवा तळव्यांना सूज येणे:

हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यानंतर शरीरात असंख्य बदल दिसून येतात. दिवस संपताना पायांच्या तळव्यांना किंवा घोट्याजवळ सूज येते. शरीरात फ्लुइड साचून राहिल्यामुळे हार्ट अटॅक किंवा किडनीच्या समस्या उद्भवतात. हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यानंतर हृदय रक्त योग्य प्रकारे पंप करू शकत नाही, ज्यामुळे रक्तप्रवाह कमी होतो. रक्तप्रवाह कमी झाल्यानंतर द्रव पायांपर्यंत नीट पोहोचत नाही. टिश्यूमध्ये द्रव साचून राहिल्यामुळे पायांना सूज येते.

हृदयाची धडधड वाढणे:

हार्ट अटॅक येण्याच्या काही दिवस आधी हृदयाची धडधड खूप जास्त वेगाने वाढते. याशिवाय अनियमित ठोके जाणवू लागतात. बऱ्याचदा अ‍ॅरिदमियाची लक्षणे जाणवू लागल्यानंतर हृदयाची धडधड सामान्य लयीत राहत नाही. रक्त पंप करताना हृदयाला जास्तीची मेहनत घ्यावी लागते. तसेच डॉक्टरांच्या मते, फिब्रिलेशन झाल्यामुळे स्ट्रोक आणि हार्ट फेल्युअर इत्यादी गंभीर आजार होण्याची शक्यता असते.

छातीपासून हातांपर्यंत वेदना होतात:

छातीतील दुखणे हात, जबडा, मान किंवा पाठीपर्यंत पसरल्यानंतर ती सामान्य लक्षणे नसून हार्ट अटॅक येण्याआधी अशी लक्षणे दिसू लागतात. या वेदना काहीवेळा अतिशय तीव्र होतात. काहीवेळा छातीमध्ये वेदना शारीरिक हालचाल न केल्यामुळे आणि मानसिक तणाव वाढल्यामुळे सुद्धा होतात. त्यामुळे शरीरात दिसून येणारी लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे आवश्यक आहे.

Diabetes रूग्णांसाठी बटाटा आणि रताळं ठरतं विष? काय आहे तथ्य

हार्ट अटॅकपासून बचाव करण्यासाठी उपाय:

हार्ट अटॅक येऊ नये म्हणून शरीराची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. शारीरिक हालचाली, नियमित व्यायाम, ध्यान आणि प्राणायाम केल्यामुळे शरीर कायमच हेल्दी राहण्यास मदत होते. शरीरात निर्माण झालेला शारीरिक हालचालींचा अभाव आरोग्यासाठी संकट ठरतो. धूम्रपान व मद्यपान टाळणे, आणि रक्तातील साखर व कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवणे यांसारख्या महत्वपूर्ण गोष्टींची काळजी घेतल्यास हार्ट अटॅकमुळे शरीराचे नुकसान होणार होणार नाही.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: हृदयविकाराच्या झटक्याची प्रमुख लक्षणे कोणती?

    Ans: छातीच्या मध्यभागी कडक होणे, दाब जाणवणे किंवा जळजळ होणे.

  • Que: सायलेंट हार्ट अटॅक म्हणजे काय आणि त्याची लक्षणे?

    Ans: सायलेंट हार्ट अटॅक म्हणजे असा झटका, ज्याची लक्षणे खूप सौम्य असतात किंवा छातीत वेदना होत नाहीत.

  • Que: हार्ट अटॅक येण्यापूर्वीची लक्षणे?

    Ans: छातीत, खांद्यात किंवा जबड्यात वारंवार वेदना होणे.

Web Title: Heart attack will come at any moment do not ignore these symptoms appearing in the body at all know in detail

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 08:37 AM

Topics:  

  • heart attack
  • Heart attack prevention
  • Heart Disease

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.