Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Heart Health: फिट हार्ट, हेल्दी लाइफ! रोजच्या जीवनातील ‘या’ सवयी हृदयासाठी ठरतील वरदान

Best Habits For Healthy Heart: हृदयाशी संबंधित आजारांचा वाढता धोका टाळण्यासाठी योग्य आहार, नियमित व्यायाम आणि संतुलित जीवनशैली गरजेची आहे, कोणत्या सवयी अंगीकारल्या हृदयविकाराचा धोका कमी होतो, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 02, 2026 | 09:02 PM
photo- yandex

photo- yandex

Follow Us
Follow Us:
  • हृदय निरोगी ठेवायचे आहे?
  • आजपासूनच अंगीकारा या सवयी
  • नियमित आरोग्य तपासणी करा
आजकाल हृदयाशी संबंधित आजारांचे प्रमाण वेगाने वाढत आहे. वाढता ताण, अनियमित दिनचर्या, जंक फूडचे वाढते सेवन आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे तरुणांमध्येही हृदयविकाराच्या समस्या दिसून येत आहेत. मात्र, दैनंदिन जीवनातील काही साध्या पण सातत्यपूर्ण सवयी अंगीकारल्यास हृदय निरोगी ठेवण्यासाठी मदत होऊ शकते. योग्य आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि वेळोवेळी आरोग्य तपासणी यामुळे देखील अनेक गंभीर आजारांचा धोका कमी होण्यास मदत होतो. हृदय निरोगी ठेवण्यासाठी कोणत्या सवयी अंगीकारल्या पाहिजेत, जाणून घ्या.

साखर तर फक्त निमित्त! ‘या’ वाईट सवयींमुळे होतो मधुमेह; अनेकांना ठाऊकच नाही

संतुलित आहाराला द्या प्राधान्य

हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहार हा सर्वात महत्त्वाचा घटक मानला जातो. रोजच्या जेवणात ताजी फळे, हिरव्या पालेभाज्या, संपूर्ण धान्ये, कडधान्ये, ड्राय फ्रुट्स आणि बिया यांचा समावेश करावा. ओमेगा-३ फॅटी अॅसिडयुक्त पदार्थ, कमी फॅटचे दुग्धजन्य पदार्थ आणि पुरेशा प्रमाणात पाणी पिण्याची सवयही फायदेशीर ठरते. यामुळे रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारते आणि कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहण्यास मदत होते.

दररोज शरीराची हालचाल आवश्यक

हृदय मजबूत ठेवण्यासाठी नियमित व्यायाम अत्यंत महत्त्वाचा आहे. दररोज किमान ३० ते ४० मिनिटे वेगाने चालणे, सायकल चालवणे, योगा, पोहणे किंवा हलका व्यायाम केल्यास रक्ताभिसरण सुधारते. यामुळे वजन नियंत्रणात राहते आणि रक्तदाब संतुलित राहण्यास मदत होते तसेच हृदयावर अतिरिक्त ताण येत नाही.

तणाव कमी करा आणि झोप पूर्ण घ्या

सततचा मानसिक तणाव आणि अपुरी झोप हृदयाच्या आरोग्यावर परिणाम करू शकते. दररोज सात ते आठ तास शांत आणि गाढ झोप घेणे आवश्यक आहे. ध्यान, प्राणायाम, योगा किंवा आवडत्या छंदासाठी वेळ दिल्यास मन शांत राहते आणि तणाव कमी होतो. मानसिक आरोग्य चांगले असेल तर त्याचा सकारात्मक परिणाम हृदयावरही होतो.

वाईट सवयींपासून ठेवा अंतर

धूम्रपान, तंबाखूचे सेवन, मद्यपान, जास्त मीठ, साखर आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे वारंवार सेवन हृदयासाठी हानिकारक ठरू शकते. तसेच दीर्घकाळ एकाच जागी बसून काम करण्याऐवजी प्रत्येक काही वेळाने उठून चालण्याची सवय लावणे गरजेचे आहे.

नियमित आरोग्य तपासणी करा

उच्च रक्तदाब, मधुमेह आणि वाढलेले कोलेस्टेरॉल ही हृदयविकाराची प्रमुख कारणे मानली जाते. त्यामुळे वेळोवेळी रक्तदाब, रक्तातील साखर आणि लिपिड प्रोफाइल तपासून घेणे आवश्यक आहे. छातीत दुखणे, धाप लागणे, अनियमित हृदयाचे ठोके किंवा अचानक थकवा जाणवत असल्यास दुर्लक्ष न करता त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Paneer Corn Sandwich: झटपट आणि हेल्दी नाश्ता हवा? मग ट्राय करा पनीर- कॉर्न सँडविच, वाचा सोपी रेसिपी

Web Title: Heart health tips healthy habits to prevent heart disease

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2026 | 09:02 PM

Topics:  

  • Heart attack prevention
  • heart care tips
  • heart problems

संबंधित बातम्या

जळगाव जामोद तालुका कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करा; अन्यथा २८ तारखेपासून बेमुदत उपोषण; शेतकऱ्यांचे तहसीलदारांना साकडे
1

जळगाव जामोद तालुका कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करा; अन्यथा २८ तारखेपासून बेमुदत उपोषण; शेतकऱ्यांचे तहसीलदारांना साकडे

50 वर्षीय मधुमेही पुरुषाच्या रक्तवाहिन्यांमधील कॅल्शियमचे थर अत्याधुनिक उपचाराने फोडले; उच्च जोखमीची शस्त्रक्रिया टळली
2

50 वर्षीय मधुमेही पुरुषाच्या रक्तवाहिन्यांमधील कॅल्शियमचे थर अत्याधुनिक उपचाराने फोडले; उच्च जोखमीची शस्त्रक्रिया टळली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.