
Hemoglobin वाढवणाऱ्या 'या' पदार्थांचे आहारात आवर्जून करा सेवन, रक्त वाढवण्यासोबतच शरीर राहील कायमच तंदुरुस्त
हिमोग्लोबिनची कमतरता कशामुळे निर्माण होते?
हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी काय खावे?
हिमोग्लोबिन कमी झाल्यास उपचार?
Hemoglobin: निरोगी राहण्यासाठी शरीराला रक्ताची फार आवश्यकता असते. हिमोग्लोबिन लाल रक्तपेशींमध्ये असणारे एक महत्त्वाचे लोहयुक्त प्रथिन घटक आहे, ज्यामुळे रक्ताचा रंग लाल दिसतो. हिमोग्लोबिन शरीरासाठी फार महत्वाचे आहे. फुफ्फुसातून प्राणवायू शोषून तो शरीराच्या सर्व अवयवांपर्यंत व पेशींपर्यंत पोहचवण्याचे काम हिमोग्लोबिन करते. याशिवाय शरीरातील ऊतींमधून कार्बन डायऑक्साइड गोळा करून तो फुफ्फुसांपर्यंत आणून त्याजागी श्वासावाटे बाहेर टाकला जातो. शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता निर्माण झाल्यानंतर थकवा, अशक्तपणा, चक्कर येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, त्वचा फिकट पडणे इत्यादी वेगवेगळी लक्षणे दिसू लागतात. याशिवाय हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे शरीराला गंभीर आजारांची लागण होऊ शकते. त्यामुळे आहारात या पदार्थांचे सेवन केल्यास हिमोग्लोबिनची कमतरता भरून निघण्यास मदत होईल.
Health Tips: जेवणानंतर चालल्याने जास्त फॅट बर्न होते? विज्ञान काय सांगतं
शरीराला हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी सर्वच विटामिनची आवश्यकता असते. लोहासोबतच फोलेट, विटामिन बी-१२ आणि प्रथिने इत्यादी घटक योग्य प्रमाणात असणे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे. त्यामुळे दैनंदिन आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. रोजच्या आहारात पालक, मेथी, शेवग्याची पाने, चाकवत यांसारख्या हिरव्या पालेभाज्यांचे सेवन करावे. हिरव्या पालेभाज्यांमध्ये लोहाचे प्रमाण खूप जास्त असते. डाळी, हरभरा, राजमा, मसूर, सोयाबीन, चणे यांसारख्या कडधान्यांचे सुद्धा अधून मधून सेवन करणे फायदेशीर ठरते.
जेवणात लिंबू, आवळा, पेरू, संत्री आणि इतर विटामिन असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. याशिवाय नियमित सकाळी उठल्यानंतर आवळ्याचा रस प्यावा. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा गाजर आणि बीटचे सेवन करावे. यामुळे लाल रक्त पेशींची वाढ होण्यास मदत होते. सकाळच्या नाश्त्यात नियमित एक मूठभर चणे आणि गूळ खावे. यामुळे रक्ताची कमतरता झपाट्याने भरून निघते आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. हिमोग्लोबिनची कमतरता कडधान्ये, शेंगदाणेही खावेत.
हिमोग्लोबिनची कमतरता निर्माण झाल्यानंतर दिसून येणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार आणिआहारात बदल करणे फार आवश्यक आहे. हिमोग्लोबिन कमी झाल्यानंतर रक्त तपासणी करून आहारावर अवलंबून राहणे शरीरासाठी धोक्याचे ठरते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार करावेत. रक्ताची कमतरता जाणवू लागल्यास आहारात बदल, शारीरिक हालचाल, भरपूर पाण्याचे सेवन करणे फार आवश्यक आहे.
Ans: पालक, मेथी, चवळी, मसूर, हरभरा, राजमा, तीळ, खजूर आणि इतर पोषक पदार्थ आहारात समाविष्ट करता येतात. आहारातील आयर्नसोबत प्रथिने, फोलेट आणि इतर पोषक घटक मिळणेही महत्त्वाचे आहे.
Ans: हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी शरीराला आयर्नची आवश्यकता असते. त्यामुळे आयर्नयुक्त पदार्थ संतुलित आहाराचा महत्त्वाचा भाग आहेत.
Ans: खजूर आणि मनुकांमध्ये आयर्नसह विविध पोषक घटक असतात. मात्र केवळ हे पदार्थ खाल्ल्याने हिमोग्लोबिनची कमतरता दूर होईलच असे नाही.