
मधुमेह झाल्यानंतर शरीरात दिसून येतात 'ही' महाभयानक लक्षणे, वेळीच उपाय करून घ्या काळजी
मधुमेह हा आरोग्यासंबंधित अतिशय घातक आहे. कारण हा आजार झाल्यानंतर कधीच बरा होत नाही. मधुमेहाचे निदान झाल्यानंतर संपूर्ण आयुष्यभर गोळ्या औषधांचे सेवन करावे लागते. दैनंदिन आहारात होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर झाल्यानंतर सुरुवातीला अनेक लोक दुर्लक्ष करतात. मात्र वारंवार दुर्लक्ष करणे शरीरासाठी अतिशय घातक ठरते. मधुमेहाला साइलेंट किलर आजार असे म्हणतात. कारण मधुमेह झाल्यानंतर शरीरात लवकर लक्षणे दिसून येत नाही. सतत गोड पदार्थांचे सेवन केल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढू लागते. रक्तातील साखर वाढल्यानंतर योग्य वेळी लक्ष न दिल्यास शरीराच्या इतर अवयवांना हानी पोहचू शकते. तसेच रक्तातील साखर वाढल्यानंतर जखमा लवकर बऱ्या होत नाहीत. याशिवाय डोळयांमध्ये वेदना, दृष्टी कामे होणे इत्यादी अनेक गंभीर समस्या उद्भवू लागतात.(फोटो सौजन्य – istock)
मधुमेहाची लक्षणे शरीराच्या आतील अवयवांना इजा होते. तसेच या आजाराची लागण झाल्यानंतर अनेक गंभीर आजार होऊन शरीराचे नुकसान होते. रक्तात वाढलेल्या साखरेमुळे काहीवेळा उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल इत्यादी समस्या उद्भवण्याची शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला मधुमेह झाल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. शरीरात ही लक्षणे दिसल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला आणि घरगुती उपाय करून शरीराची काळजी घ्यावी.
मधुमेह झाल्यानंतर मान, काख, कंबर काळी पडून जाते. याशिवाय मांडीच्या आतील भागसुद्धा काळा होऊन जातो. त्वचा काळसर, मखमली किंवा गडद तपकिरी दिसू लागल्यास रक्तातील साखर वाढू लागते. या स्थितीला Acanthosis Nigricans असे म्हणतात. मधुमेह झाल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात त्वचेला रंग काळा निळा होऊन जातो.
शरीराला कोणत्याही आजाराची लागण झाल्यानंतर शरीरात दिसून येणारे अतिशय सामान्य लक्षण वजन झपाट्याने कमी होते. शरीर ग्लुकोजचं ऊर्जेमध्ये रूपांतर होत नाही, तेव्हा स्नायू आणि चरबी तोडून ऊर्जा तयार करतात. ज्यामुळे शरीराचे वजन झपाट्याने कमी होऊन जाते. याशिवाय शरीर कमकुवत होणे, चेहरा विचित्र आणि म्हतारसारख्या दिसू लागल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर दुर्लक्ष केल्यास डोळ्यांसंबंधित समस्या उद्भवतात. दृश्य धूसर, दोनदोन गोष्टी एकत्र दिसणे, फोकस नीट न होणे इत्यादी लक्षणे दिसू लागल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावेत. डायबेटिक रेटिनोपॅथीसारख्या गंभीर आजाराची लागण झाल्यानंतर दृष्टीची कार्य क्षमता कमी होऊन जाते.
Ans: मधुमेह ही एक अशी स्थिती आहे जेव्हा शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढते कारण स्वादुपिंड पुरेसे इन्सुलिन तयार करत नाही किंवा तयार केलेल्या इन्सुलिनचा योग्य वापर करू शकत नाही.
Ans: संतुलित आणि पौष्टिक आहार घेणे नियमित शारीरिक हालचाल आणि व्यायाम करणे
Ans: प्री-डायबिटीस म्हणजे रक्तातील साखरेची पातळी सामान्यपेक्षा जास्त असणे, पण ती टाइप २ मधुमेहाइतकी वाढलेली नसते. जीवनशैलीत बदल न केल्यास प्रीडायबिटीस असलेल्या व्यक्तींना टाइप २ मधुमेह होण्याचा धोका वाढतो.