Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

High Protein Diet Plan: परफेक्ट बॉडी आणि कडक फिटनेससाठी उपयुक्त; जाणून घ्या सकाळपासून रात्रीपर्यंतचा हाय-प्रोटिन डाएट प्लॅन!

जिम वर्कआऊट करणाऱ्यांसाठी दररोज १०० ते १५० ग्रॅम प्रोटीन देणारा हा खास भारतीय डाएट प्लॅन असून, यात शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही उत्तम पर्याय दिले आहेत. अंडी, चिकन, पनीर आणि सोयाबीन अशा घरगुती अन्नपदार्थांचा समावेश करून स्नायू बळकट करण्यासाठी आणि उत्तम फिटनेस मिळवण्यासाठी हा आहार अत्यंत फायदेशीर ठरतो.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jul 19, 2026 | 05:35 PM
High Protein Diet Plan: परफेक्ट बॉडी आणि कडक फिटनेससाठी उपयुक्त; जाणून घ्या सकाळपासून रात्रीपर्यंतचा हाय-प्रोटिन डाएट प्लॅन!
Follow Us
Follow Us:

जर तुम्ही जिममध्ये नियमित वर्कआऊट करत असाल आणि चांगली फिजीक बनवू  इच्छित असाल, तर तुमच्या आहारात योग्य प्रमाणात प्रोटीन असणे अत्यंत गरजेचे आहे. भारतीय अन्नामध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते, पण योग्य नियोजनाने आपण सहजपणे १०० ते १५० ग्रॅम प्रोटीन मिळवू शकतो.  सहसा हे प्रोटीनचे प्रमाण शरीरयष्टी चांगली बनवण्यासाठी योग्य मानले जाते. वर्कआऊट करणाऱ्यांसाठी शाकाहारी आणि मांसाहारी या दोन्ही पर्यायांसह एक संतुलित डाएट प्लॅन अशाप्रमाणे दिला आहे

१. सकाळचा नाश्ता – साधारण ३० ते ३५ ग्रॅम प्रोटीन

दिवसाची सुरुवात हाय-प्रोटिन नाश्त्याने करा, ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळेल.

  • मांसाहारी पर्याय: ३ ते ४ अंड्यांचे ऑम्लेट किंवा भुर्जी किंवा उकड्लेलेई अंडी, सोबत २ ब्राऊन ब्रेड खाऊ शकता.
  • शाकाहारी पर्याय: १०० ग्रॅम पनीर भुर्जी किंवा बेसन-पनीर चिला (२ नग).
  • सोबत: मूठभर भिजवलेले बदाम आणि अक्रोड. पर्यायी.
नॉनव्हेज भाजीलाही मागे टाकेल ही भाजी, घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल ‘मसाला मशरूम’

२. दुपारचे जेवण – साधारण ३५ ते ४० ग्रॅम प्रोटीन

दुपारच्या जेवणात फायबर, कार्ब्स आणि प्रोटीनचा चांगला मेळ असावा.

  • मांसाहारी पर्याय: १५० ग्रॅम ग्रिल्ड किंवा बॉइल्ड चिकन ब्रेस्ट, सोबत १ वाटी भात किंवा २ चपाटी किंवा भाकरी आणि भरपूर कोशिंबीर. चापातीमध्ये शुगर म्हणजेच साखरेचे प्रमाण जास्त असते त्यामुळे शक्यतो भाकरी आहारात ठेवा.
  • शाकाहारी पर्याय: १ मोठी वाटी घट्ट डाळ किंवा राजमा/छोले, सोबत १०० ग्रॅम सोया चंक्सची भाजी आणि १ वाटी दही किंवा ताक (हायड्रेशन साठी). सोबत भाकरी किंवा चपाती.
३. संध्याकाळचा नाश्ता / प्री-वर्कआऊट – साधारण १५ ते २० ग्रॅम प्रोटीन

जिमला व्यायामासाठी जाण्यापूर्वी शरीराला ताकद मिळण्यासाठी हा आहार महत्त्वाचा आहे.

  • पर्याय १: १ वाटी उकडलेले काळे चणे किंवा मूग उसळ
  • पर्याय २: १ स्कूप व्हे प्रोटीन पाण्यात किंवा दुधात मिक्स करून (जर तुम्ही सप्लिमेंट घेत असाल तर).
  • सोबत: एनर्जी मिळण्यासाठी १ केळ किंवा सफरचंद.
पाहूनच तोंडाला पाणी सुटेल! घरी बनवा हिरव्या मसाल्यातील कुरकुरीत ‘पापलेट फ्राय’; चविष्ट आणि झटपट रेसिपी

४. रात्रीचे जेवण – साधारण ३० ते ३५ ग्रॅम प्रोटीन

रात्रीचे जेवण पचनास हलके पण प्रोटिनयुक्त असावे, जेणेकरून झोपेत स्नायूंची रिकव्हरी चांगली होईल.

  • मांसाहारी पर्याय: १५० ग्रॅम फिश करी -मासे किंवा चिकन टिक्का, सोबतीला १ चपाती आणि मिक्स व्हेज सॅलड.
  • शाकाहारी पर्याय: १०० ग्रॅम लो-फॅट पनीर टिक्का किंवा पनीरची सुकी भाजी, सोबत १ वाटी डाळ आणि १ चपाती किंवा भाकरी
काही महत्त्वाच्या टिप्स:-
  • पाण्याचे प्रमाण: पनीर ,चिकन किंवा अंडी यात उष्णता खूप प्रमाणात असते. आणि शरीराला चांगले ठेवण्यासाठी, त्वचा चांगली ठेवण्यासाठी दिवसात भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे. हाय-प्रोटिन डाएट घेत असताना शरीराला हायड्रेट ठेवणे गरजेचे आहे, त्यामुळे दिवसातून कमीत कमी ३ ते ४ लीटर पाणी प्या.
  • बदलांचे स्वातंत्र्य: तुम्ही तुमच्या गरजेनुसार शाकाहारी आणि मांसाहारी दिवसांची अदलाबदल करू शकता. सोया चंक्स, पनीर, अंडी आणि चिकन हे भारतीय आहारातील प्रोटीनचे सर्वात स्वस्त आणि उत्तम स्रोत आहेत.

Web Title: High protein india diet plan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 05:35 PM

Topics:  

  • food
  • LIFESTYLE

संबंधित बातम्या

Paneer kathi Roll: रोजच्या पोहे-उपम्याला द्या ब्रेक! बनवा झटपट पनीर काठी रोल; भाज्या अन् चटणीचा भन्नाट तडका, रेसिपी एकदा वाचाच
1

Paneer kathi Roll: रोजच्या पोहे-उपम्याला द्या ब्रेक! बनवा झटपट पनीर काठी रोल; भाज्या अन् चटणीचा भन्नाट तडका, रेसिपी एकदा वाचाच

Chia Seeds Benefits: शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी चिया सीड्स ठरतात फायदेशीर; जाणून घ्या खाण्याची योग्य पद्धत!
2

Chia Seeds Benefits: शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी चिया सीड्स ठरतात फायदेशीर; जाणून घ्या खाण्याची योग्य पद्धत!

Ukadiche Modak Recipe: मोदकांना द्या सुंदर कळीदार आकार! प्लास्टिकच्या पिशवीची ही ट्रिक पाहून तुम्हीही म्हणाल ‘वा!’
3

Ukadiche Modak Recipe: मोदकांना द्या सुंदर कळीदार आकार! प्लास्टिकच्या पिशवीची ही ट्रिक पाहून तुम्हीही म्हणाल ‘वा!’

घरातील लाकडी फर्निचरला अचानक वाळवी लागल्यास ती नष्ट करण्यासाठी सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय कोणते? जाणून घ्या
4

घरातील लाकडी फर्निचरला अचानक वाळवी लागल्यास ती नष्ट करण्यासाठी सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय कोणते? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.