Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दूध न आटवता १० मिनिटांमध्ये झटपट बनवा घट्ट-रवाळ रबडी! पुरीसोबत लागेल सुंदर चव

सणावाराच्या दिवशी प्रत्येक घरात गोड पदार्थ बनवले जातात. नेहमीच खीर खाऊन कंटाळा आल्यास तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये घट्टसर रबडी बनवू शकता. हा पदार्थ बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 17, 2025 | 08:00 AM
दूध न आटवता १० मिनिटांमध्ये झटपट बनवा घट्ट-रवाळ रबडी

दूध न आटवता १० मिनिटांमध्ये झटपट बनवा घट्ट-रवाळ रबडी

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय पदार्थांमध्ये रबडीचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं रबडी खायला खूप जास्त आवडते. रबडीचे नाव ऐकल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. गोड आणि चविष्ट पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यानंतर बाजारातून विकत रबडी किंवा गुलाबजाम आणले जाते. मात्र नेहमीच विकतची रबडी खाण्यापेक्षा तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये रबडी बनवू शकता. आपल्यातील अनेकांना नेहमीच असे वाटते की रबडी बनवण्यासाठी जास्तीचा वेळ लागतो, तासनतास दूध गॅसवर आटवून घ्यावे. पण आज आम्ही तुम्हाला १० मिनिटांमध्ये झटपट रबडी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेली रबडी चवीला अतिशय सुंदर लागते. पुरी किंवा चपातीसोबत तुम्ही हा पदार्थ खाऊ शकता. रबडी घट्ट होण्यासाठी त्यात दह्याचा वापर केला जातो. चला तर जाणून घेऊया घट्ट आणि रवाळ रबडी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pintrest)

संध्याकाळ होईल आणखीन मजेदार; घरी बनवा चवदार अन् थंडगार दहीवडा, खूप सोपी आहे रेसिपी

साहित्य:

  • दूध
  • ब्रेड
  • कंडेंस्ड मिल्क
  • बदाम
  • काजू
  • वेलची पावडर
  • साखर
  • खवा
  • जायफळ पावडर
  • पिस्ता
  • तूप
पिकलेलं केळ खायला आवडत नाही? मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा केळीचे खमंग आप्प्पे, नोट करा रेसिपी

कृती:

  • रबडी बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढईमध्ये दूध गरम करण्यासाठी ठेवा. रबडी बनवताना दुधामध्ये अजिबात पाणी टाकू नये.
  • मिक्सरच्या भांड्यात ब्रेड टाकून बारीक वाटून घ्या. ब्रेडच्या चुऱ्यामुळे रबडी अतिशय घट्ट आणि सुंदर होते.
  • दुधाला उकळी आल्यानंतर त्यात वाटीभर कंडेंस्ड मिल्क घालून सतत मिक्स करत राहा. यामुळे रबडी कढईला चिटकणार नाही.
  • दोन्ही पदार्थ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यात साखर घालून मिक्स करा. साखर पूर्णपणे वितळल्यानंतर त्यात वेलची पावडर आणि जायफळ पावडर घालून मिक्स करा.
  • नंतर त्यात बारीक करून घेतलेली ब्रेडची पावडर घालून मिक्स करा.मिक्स करून झाल्यानंतर त्यात चमचाभर खवा टाका.
  • सगळ्यात शेवटी तयार केलेल्या घट्टसर रबडीमध्ये काजू, बदाम तुकडे घालून मिक्स करून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली घट्टसर रबडी. हा पदार्थ सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.

Web Title: Ho to make creamy rabadi at home simple food recipe sweet food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

तिखट कांदापोहे खाऊन कंटाळा आला असेल तर कोकणातील पारंपरिक पद्धतीने बनवा गोड पोहे, लहान मुलांसह मोठे खातील आवडीने
1

तिखट कांदापोहे खाऊन कंटाळा आला असेल तर कोकणातील पारंपरिक पद्धतीने बनवा गोड पोहे, लहान मुलांसह मोठे खातील आवडीने

उन्हाळ्यात पचनक्रिया राहील कायमच सक्रिय! ५ मिनिटांमध्ये बनवा आंबट तिखट चवीचा लेमन राईस, नोट करून घ्या रेसिपी
2

उन्हाळ्यात पचनक्रिया राहील कायमच सक्रिय! ५ मिनिटांमध्ये बनवा आंबट तिखट चवीचा लेमन राईस, नोट करून घ्या रेसिपी

साऊथ इंडियन पदार्थाने वाढवा जिभेची चव! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा वन पॉट रस्सम राईस, नोट करून घ्या रेसिपी
3

साऊथ इंडियन पदार्थाने वाढवा जिभेची चव! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा वन पॉट रस्सम राईस, नोट करून घ्या रेसिपी

Recipe : शाही, सुगंधित चवीचा ‘बगारा राईस’ तुम्ही कधी खाल्ला आहे का? एकदा घरी बनवूनच पहा
4

Recipe : शाही, सुगंधित चवीचा ‘बगारा राईस’ तुम्ही कधी खाल्ला आहे का? एकदा घरी बनवूनच पहा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.