अशा प्रकारे घ्या फुफ्फुसांच्या आरोग्याची काळजी
सर्वच शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रदूषण वाढत आहे. वाढत्या गाड्यांची संख्या, वातावरणातील प्रदूषण, ध्वनी प्रदूषण इत्यादी गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. प्रदूषणात वाढ झाल्यानंतर फुफ्फुसांचे आरोग्य हळूहळू बिघडण्यास सुरुवात होते. अस्थमा, दमा इत्यादी फुफ्फुसांसंबंधित आजार वाढू लागल्यानंतर अनेक समस्या उद्भवतात. नियमित चार ते पाच व्यक्तींना फुफ्फुसांच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. अशावेळी आरोग्याची काळजी घेऊन निरोगी जीवन जगणे आवश्यक आहे. शहरांमध्ये वाढलेल्या प्रदूषणाचा परिणाम आरोग्यावर लगेच होतो. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला वाढत्या प्रदूषणामुळे फुफ्फुसांमध्ये चिकटून राहिलेली घाण स्वच्छ करण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावे, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: ‘हे’ ५ संकेत तुमच्या वागण्यात दिसले तर समजून जा, तुम्ही स्वतःसाठी बनला आहात टॉक्सिक
अशा प्रकारे घ्या फुफ्फुसांच्या आरोग्याची काळजी
सकाळी उठल्यानंतर नियमित गरम पाण्यात लिंबू मिक्स करून प्यायल्यामुळे फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी गरम पाण्यात तुम्ही लिंबू मिक्स करून पिऊ शकता. या पाण्याचे सेवन केल्यामुळे फुफ्फुस मजबूत होऊन आरोग्य सुधारण्यास मदत होईल. लिंबू पाण्यात विटामिन सी मुबलक प्रमाणात आढळून येते.
शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी नियमित किंवा आठवड्यातून दोनदा बीटरूटचा रस प्यावा. या रसाचे सेवन केल्यामुळे फुफ्फुसांसह संपूर्ण शरीराला अनेक फायदे होतात. बीटरूटमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि नायट्रेट्स आढळून येते, ज्यामुळे फुफ्फुसांचे कार्य सुरळीत होण्यास मदत होते. तसेच शरीरातील ऑक्सिजनची पातळी सुधारते.
अशा प्रकारे घ्या फुफ्फुसांच्या आरोग्याची काळजी
हळदीमध्ये असलेले क्युमिन अनेक आजारांवर गुणकारी आहे. रोज रात्री झोपण्याआधी किंवा सकाळच्या वेळी कोमट दुधात चिमूटभर हळद टाकून प्यायल्यास आरोग्याला अनेक फायदे होतील. हळदीमध्ये दाहक विरोधी गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे फुफ्फुसांमध्ये होणारी जळजळ कमी होण्यास मदत होते. फुफ्फुसांच्या निरोगी आरोग्यासाठी नियमित हळदीचे दूध प्यावे.
हे देखील वाचा: सर्दी-खोकल्याची लागण असल्यास ‘या’ फळांचे सेवन टाळा
अशा प्रकारे घ्या फुफ्फुसांच्या आरोग्याची काळजी
उन्हाळ्यासह सर्वच ऋतूंमध्ये शरीराला हायड्रेट ठेवणे फार गरजेचे आहे. कारण शरीराला पाण्याची आवश्यकता आहे. पाण्याचे कमी सेवन केल्यामुळे आरोग्य बिघडते. पाण्याचे सेवन केल्यामुळे घशातील प्रदूषणाचे कण शरीरातील विषारी पदार्थांचे वाटे निघून जातात. ज्यामुळे शरीर रोगापासून दूर राहते. कोमट पाण्यात मीठ टाकून नियमित गुळण्या केल्यास घसा आणि फुफ्फुसांसह शरीराचे आरोग्य सुधारते.