हल्ली सोशल मीडियावर असे अनेक पेज सापडतील जे मानवी वागणुकीवर भाष्य करत असतात. अनेक व्हिडिओज सुद्धा व्हायरल होत असतात ज्यात टॉक्सिक लोकांना कसे ओळखायचे याबद्दल माहिती दिली जाते. पण दुसऱ्यांना ओळखण्याआधी आपण स्वतःला ओळखणे फार महत्वाचे आहे. आपण आपली मेंटल हेल्थ दुसऱ्यांमुळे नव्हे तर स्वतःच्या वागणुकीमुळे खराब करत असतो. खरंतर या वागणुकीची आपल्याला सुद्धा जाणीव नसते. याला सेल्फ टॉक्सिटी असे सुद्धा म्हणतात. पुढील संकेत तुमच्या वागणुकीत आढळ्यास समजून जावा की तुम्ही स्वतःसाठी टॉक्सिक झाला आहात.
स्वतःसाठीच बनू नका टॉक्सिक (फोटो सौजन्य: iStock)
जर तुम्ही नेहमी इतरांच्या गरजांना पहिले प्राधान्य देत असाल आणि तुमच्या स्वतःच्या गरजांकडे दुर्लक्ष करत असाल, तर हे देखील सेल्फ टॉक्सिटीचे लक्षण आहे.
जेव्हा कोणी तुमचे कौतुक करते किंवा तुमच्या कामाचे कौतुक करते आणि तुम्ही ते नाकारता तेव्हा तुम्ही तुमच्या मानसिक आरोग्याशी खेळत असता.
जेव्हा तुम्ही स्वतःच्या समस्यांसाठी दुसऱ्यांना दोष देता तेव्हा हे असे वागणे नमूद करते की तुम्ही जबाबदाऱ्यांपासून धावत आहात.
जर तुम्ही तुमचा वेळ सोशल मीडियावर सतत वाया घालवत असाल तर तुम्ही स्वतःचे नुकसान करत आहात. हे सेल्फ टॉक्सिटीचे लक्षण आहे.
अनेकदा लोकं काय म्हणतील या भीतीने जर आपण लोकांच्या म्हणण्याप्रमाणे जगत असू आणि स्वतःच्या इच्छा मारत असू तर हे सेल्फ टॉक्सिटीचे लक्षण आहे.