सर्दी-खोकला झाल्यावर काही फळांचे सेवन केल्याने लक्षणे अधिक बळावू शकतात. फळ शरीरासाठी पोषक असतात. लाभदायक असतात. फळे खाण्याचा आपल्या शरीरावर चांगलाच पाइरिनाम होतो. परंतु, प्रत्येकवेळी नाही. सर्दी-खोकलाच्या लागण झाल्यास काही फळे न खाल्लेलीच बरी असतात. या दरम्यान, तुम्ही किवी किंवा चेरीसारख्या फळांचे सेवन करू शकतात. तसेच इतर पथ्य पाळून आपला उपचार करू शकता.
'ही' फळे सर्दी-खोकल्याच्या वाढीस कारणीभूत ठरतात. (फोटो सौजन्य - Social Media)
सर्दी-खोकल्याचा त्रास असल्यास केळीचे सेवन करणे टाळा. केली आरोग्यसाठी जरी लाभदायक असली तरी या परिस्थितीमध्ये केळीपासून चार हात लांब राहिलेलेच बरे. केळी थंड असते, तिचे सेवन केल्याने सर्दी आणखीन वाढण्याची शक्यता असते.
चिक्कू चवीला फार गोड असतो. या गुणधर्मामुळेच चिक्कू अनेकांच्या पसंतीचा आहे. परंतु, सर्दी-खोकला असल्यास चिक्कू खाणे टाळावे.
द्राक्ष चवीला आंबट असतात. अधिक आंबट खाल्ल्यामुळे कफ वाढते. परिणामी, खोकला वाढण्याची शक्यता असते.
द्राक्षसारखेच संत्री चवीला आंबट असतात.अति आंबट असल्यामुळे सर्दी-खोकल्याची लक्षणे बळावू शकतात.
सर्दी-खोकल्याची लागण झाल्यास कलिंगड खाणे टाळावे. कलिंगड थंड असतो. याचे सेवन केले कि घशात खवखव निर्माण होते. परिणामी, खोकला वाढतो.