पायांना झालेली जखम लवकर बारी करण्यासाठी घरगुती उपाय
जगभरात मधुमेहाचे रुग्ण वाढल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. मधुमेह झाल्यानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत जाते, ज्यामुळे इतर आजार होण्याची शक्यता असते. रक्तातील साखरेचे प्रमाण शरीरात अतिप्रमाणात वाढू लागल्यानंतर आरोग्याला हानी पोचण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीरात मधुमेहाची लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करावे. शिवाय थंडीच्या दिवसांमध्ये शरीरात अनेक बदल होत असतात. या बदलांकडे दुर्लक्ष न करता आरोग्याची योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. थंडीच्या दिवसांमध्ये मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी पायांची जास्त काळजी घ्यावी. कारण पायाला जखम झाल्यास किंवा;लागल्यास पाय लवकर बरा होत नाही. त्यामुळे पायाला झालेली जखम लवकर करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही सोपे उपाय सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
लाईफस्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
थंडीच्या दिवसांमध्ये वातावरणात गारवा असल्यामुळे पायांमध्ये ओलसरपणा तसाच राहतो. त्यामुळे बाहेरून जाऊन आल्यानंतर पाय स्वच्छ करून घ्यावे. पाण्याने पाय धुतल्यास सॉफ्ट टॉवेलने पूर्णपणे पाय कोरडे करावे. थंडीच्या दिवसांमध्ये शक्यतो कोमट पाण्याने पाय धुवावे,.यामुळे पायांच्या बोटांमध्ये ओलावा राहणार नाही.
सर्वच ऋतूंमध्ये बाहेर जाताना योगय चपलांची निवड करावी. अति उंच किंवा पायाला लागणाऱ्या चप्पल परिधान करू नये. त्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये अरुंद किंवा घट्ट चपला वापरणे टाळावे. उंच चपला परिधान केल्यामुळे शरीराच्या रक्तभिसरणावर परिणाम होण्याची शक्यता असते. शिवाय घरात चप्पल किंवा सॉक्स घालावे.
पाय स्वच्छ धुवून कोरडे करून झाल्यानंतर पायांना मॉइश्चरायझरचा वापर करणे आवश्यक आहे. मॉइश्चरायझरचा वापर केल्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये पायांना भेगा जात नाहीत. पण जर तुम्ही मॉइश्चरायझरचा वापर केला नाही केला तर पायांना भेगा पडून त्यात बुरशीजन्य संसर्ग होण्याची शक्यता असते. शिवाय त्वचेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही नैसर्गिक तेलाचा सुद्धा वापर करू शकता.
मधुमेहाच्या रुग्णांच्या संहारिला सतत खाज येत असते. पण पण खाज आलेल्या ठिकाणी नखं लागल्यास ती खाज लवकर बारी होत नाही. पायांवर किंवा हातांवर झालेली जखम लवकर बारी न झाल्यामुळे पाय कापावा लागत. पायांवर कोणत्याही प्रकारची जखम, खरचटलेला भाग किंवा सूज आल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करावे.
लाईफस्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
थंडीच्या दिवसांमध्ये शरीराची रक्तभिसरण कमी हिते. यासाठी चालणे, संतुलित आहार, पौष्टिक घटकांचे सेवन, पायांची स्ट्रेचिंग करणे इत्यादी गोष्टी करणे आवश्यक आहे. शिवाय तुम्ही कोमट पाणी भरून पायांना शेक दिऊ शकता. थंडीच्या दिवसांमध्ये आरोग्य लगेच बिघडून जाते., त्यामुळे शरीराची योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.