पोटातील जंत घालवण्यासाठी घरगुती उपाय
सतत गोड पदार्थ खाल्ल्यामुळे किंवा काही कारणामुळे पोटात जंत होण्याची शक्यता असते. पोटात जंत होणे ही सामान्य समस्या आहे. पोटात जंत झाल्यानंतर अनेक समस्या उद्भवतात. तसेच पोटात होणाऱ्या जंतावर वेळीच उपाय न केल्यास अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. पोटात जंत झाल्यानंतर पोटदुखी, पेटके, उलट्या, मळमळ, अशक्तपणा, भूक न लागणे, जुलाब इत्यादी अनेक लक्षणे जाणवू लागतात. या लक्षणांकडे वेळीच लक्ष देऊन डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार घेणे गरजेचे आहे. तसेच यावर तुम्ही घरगुती उपाय सुद्धा करू शकता.
पोटात जंत होण्यामागे अनेक कारण आहेत. कच्चे मास किंवा चिकन खाणे, दूषित पाण्याचे सेवन करणे इत्यादी गोष्टींमुळे जंत होण्याची शक्यता असते. जंत झाल्यानंतर जेवणाची किंवा कोणताही पदार्थ खाण्याची इच्छा होत नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पोटातील जंतापासून सुटका मिळवण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. हे घरगुती उपाय केल्यास तुमचे पोट स्वच्छ होऊन आराम मिळेल.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: व्याघ्रासनामुळे शरीराला मिळतात हे 5 फायदे
पोटात जंत झाल्यानंतर आतड्यांमध्ये सुद्धा अनेक समस्या उद्भवू लागतात. हे जंतू मारण्यासाठी पीच पानांचा रस अत्यंत प्रभावी आहेया पानांचा रस प्यायल्यामुळे पोटातील जंतू मारून जातात आणि विष्ठेद्वारे पोटातून बाहेर पडतात. त्यामुळे तुम्ही 2 किंवा 3 चमचे पीच पानांचा रस पिऊ शकता. यामुळे तुमचे पोट स्वच्छ होईल. अतिप्रमाणात मिठाई किंवा गोड पदार्थ खाल्ल्यामुळे जंत होण्याची शक्यता असते.
कडुलिंबाची पाने आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहेत. या पानाचा रस प्यायल्यामुळे अनेक आजार बरे होतात. जंतांच्या त्रासाने त्रस्त असाल तर कडुलिंबाच्या पानांचा 3 ते 4 चमचे रस प्या. यामुळे तुमचे पोट स्वच्छ होऊन आराम मिळेल. कडुलिंबातील अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म जंतू मारण्याचे काम करतात.
हे देखील वाचा: ‘या’ 3 समस्या असल्यास नारळाचे पाणी पोहचवेल हानी, वेळीच राहा जाणकार
सर्वच घरांमध्ये तुळशीची रोप असतात. आयुर्वेदिक गुणधर्म असलेली तुळशीची पाने अनेक आजारांवर रामबाण उपाय आहेत. पोटातील जंत मारण्यासाठी 2 ते 3 चमचे तुळशीच्या पानांची चटणी बनवून खावी. यामुळे पोटातील जंत मरून जातील.