आजही भर उन्हात नारळ पाणी प्यायल्यावर आपल्या शरीरात एक वेगळीच तरतरी येत असते. कित्येक जण तर रोज नारळ पाणी पित असतात. यात लहानग्यांपासून थोरांपर्यंतचा समावेश आहे. तसेच आपल्या जवळील व्यक्ती आजरी असल्यास त्याला आपण नारळ पाणी सुद्धा देतो. नारळ पाणीचे फायदे तर तुम्ही खूप ऐकले असेल पण जसे प्रत्येक गुणकारी गोष्ट दुसऱ्यासाठीही गुणकारी ठरेल असे नसते. चला जाणून घेऊया असे कोणते लोकं आहे ज्यांनी नारळ पाणी पिणे टाळले पाहिजे.
या लोकांनी नारळ पाणी पिऊ नये (फोटो सौजन्य: iStock)
आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या मते, नारळ पाणी पिण्याचे फायदे जरी असले तरी त्याचे काही तोटेही आहेत. काही आजारांनी त्रस्त असलेल्यांनी नारळ पाणी पिणे टाळावे. त्यांनी तसे न केल्यास त्यांना नफ्यापेक्षा अधिक नुकसान होऊ शकते.
ज्यांना लोकांना अपचनाचा त्रास होतो त्यांनी नारळ पाणी पिणे टाळावे. नारळ पाणी प्यायल्याने त्यांना पोटदुखी किंवा जुलाबाचा त्रास होऊ शकतो. याचे कारण म्हणजे नारळाच्या पाण्यात पोटॅशियम असते, जे पोटाला हानी पोहोचवू शकते.
ज्या लोकांना डायबिटीसचा त्रास आहे त्यांनी वारंवार नारळ पाणी पिणे टाळावे. यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते, ज्यामुळे दोन्ही किडनी निकामी होऊ शकतात.
हाय ब्लड प्रेशरच्या रुग्णांना अनेकदा नारळ पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. पण जर तुम्ही गरजेपेक्षा जास्त नारळ पाणी प्याले तर तुमचा बीपी खूप कमी होऊ शकतो.
अधूनमधून नारळाचे पाणी पिण्यात काही नुकसान नाही, परंतु जर तुम्ही ते जास्त प्याल तर ते तुमच्या शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन बिघडू शकते. परिणामी तुम्ही तंदुरुस्त होण्याऐवजी आणखी आजारी पडू शकता.