तळपायाच्या भेगा कमी होत नसल्यास करून पहा 'हे' घरगुती उपाय,
थंडीच्या दिवसांमध्ये अनेकांच्या हातापायांची त्वचा फुटून भेगा पडून लागतात. या दिवसांमध्ये त्वचेसंबंधित समस्या उद्भवू लागल्यास अनेक महिला डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करतात, तर काही महिला बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या क्रीम्सचा वापर करतात. मात्र या सर्व गोष्टींचा फार काळ प्रभाव त्वचेवर दिसून येत नाही. पायांमध्ये भेगा पडल्यानंतर चालताना किंवा पाण्यात काम करताना या भेगा आणखीन वाढून त्यातून रक्त येऊ लागते. वातावरणात थंडी असल्यामुळे शरीरावरील त्वचा कोरडी आणि निस्तेज होऊन जाते. काहीवेळा तर संपूर्ण अंगच कोरडं पडून जातं. त्वचा कोरडी पडल्यानंतर पायांवर पडलेल्या भेगा आणखीन वाढून त्यातून रक्त येऊ लागतं.(फोटो सौजन्य – iStock)
चष्मीश मित्रहो! चष्म्याचा कंटाळा आलाय? सकाळसकाळी ‘हा’ पदार्थ मिसळून प्या गरम पाणी
पायांना पडलेल्या भेगा भरण्यासाठी अनेक महिला पार्लरमध्ये जाऊन वेगवेगळ्या ट्रीटमेंट करून घेतात. मात्र या महागड्या ट्रीटमेंट करण्यापेक्षा घरगुती उपाय करून पायांच्या त्वचेची काळजी घ्यावी. पायांमध्ये पडलेला भेगा भरण्यासाठी तुम्ही घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांचे वापर केल्यास त्वचेची खराब झालेली गुणवत्ता पुन्हा सुधारण्यास मदत होईल. घरी पदार्थ त्वचेमधील चमक कायम टिकवून ठेवतात आणि त्वचेची काळजी घेतात. पायांच्या भेगा फुटल्यानंतर कोणते घरगुती उपाय करावे?
पायांच्या फुटलेल्या भेगा बऱ्या करण्यासाठी घरगुती उपाय केल्यास लवकर आराम मिळेल. यासाठी टोपामध्ये मोहरीचे तेल घेऊन त्यात व्हॅसलिन आणि मेणबत्तीचा एक तुकडा टाकून तयार केलेले मिश्रण गॅसवर ठेवा. तयार केलेलं मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर तयार करून घेतलेले मिश्रण हळूहळू पातळ होईल. त्यानंतर तयार क्रीम पायांच्या भेगांवर लावून रात्रभर तशीच ठेवून द्या. हे मिश्रण नियमित पायांवर लावल्यास पायांवरील भेगा कमी होतील आणि पाय सुंदर आणि चमकदार दिसतील.
रोज सकाळी अंघोळ केल्यानंतर नियमित पायांना हे क्रीम लावल्यास पायांची चमक पुन्हा परंत येईल. पाय स्वच्छ आणि सुंदर दिसतील. रात्री झोपण्याआधी पाय स्वच्छ पाण्याने धुवावे. हा उपाय केल्यामुळे तळव्याच्या भेगा आणि रखरखीतपणाकमी होण्यास मदत होईल. घरगुती उपाय त्वचेची गुणवत्ता सुधारण्यासाठी मदत करतात.