फोटो सौजन्य - Social Media
डोळ्यांनाही दृष्टी कमी असो वा त्वचेसंबंधित त्रास असो हा उपाय All इन वन आहे. आपल्याला फार काही कष्ट घ्यायची गरज नाही आहे. सकाळसकाळी उठून चहा बनवण्यासाठी जशी आपण कष्ट घेतो. त्याचप्रकारे एक छोटा पाण्याने भरलेला टोप चहा बनवता बनवता शेजारच्या चुलीवर गरम करत ठेवा. पाणी उकळू द्या. पाणी उकळले तर गॅस बंद करून पाणी एका पेल्यामध्ये काढून घ्या. त्या पेल्यात शुद्ध गावठी तूप टाका आणि दररोज त्या पाण्याचे सेवन सकाळसकाळी रिकाम्या पोटी करत चला आणि होणारा कमाल पहाच. फक्त चष्मीश नाही तर अन्य अनेक लोकांच्या समस्येचा हा निवारण आहे. चला तर मग जाऊन घेऊयात फायदे:
गरम किंवा कोमट पाण्यात तूप टाकून प्यायल्यास केसांच्या, त्वचेच्या आणि डोळ्यांच्या अनेक समस्यांचे निवारण होते. मुळात, कुलिंग एजेंट म्हणून हे पेय काम करते. यातील ओमेगा ३ डोळ्यांची चमक वाढवणे तसेच डोळ्यांची दृष्टी सुधारण्यावर काम करते. जर तुमच्या डोळ्यांमध्ये सुखेपणा असेल तर हा नुस्का नक्कीच वापरात आणा आणि कमाल बघाच. पचनासंबंधित असणाऱ्या त्राससाठी हा उपाय फार फायद्याचा ठरतो. जर तुम्हला बद्धकोष्ठता असेल तर या पेयाने या समस्या टाळता येतात. हे पेय दररोज प्यायल्याने या सर्व समस्यांपासून आराम मिळतो.
त्वचेची चमक गेली असेल तर आता टेन्शन नॉट! दररोज सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी कोमट पाण्यात तूप मिसळून प्यायल्याने त्वचेवर नैसर्गिक ग्लो पुन्हा येतो. या पेयाच्या नियमित सेवनाने शरीरातील हानिकारक टॉक्सिन्स बाहेर निघतात, ज्यामुळे रक्तशुद्धी होते आणि त्वचा अधिक तजेलदार व आरोग्यदायी दिसू लागते. तसेच, हे पेय त्वचेवरील कोरडेपणा, डाग आणि अन्य समस्यांवर देखील फायदेशीर ठरते. जर तुमच्या परिसरात थंड हवामान असेल, तर हे पेय अधिक उपयुक्त ठरते, कारण यामुळे शरीर उष्ण राहते आणि नाक व घशातील संसर्ग टाळण्यास मदत होते.
शिवाय, नियमित सेवन केल्यास गळा आणि छातीमध्ये होणाऱ्या इन्फेक्शनपासूनही बचाव होतो. हे नैसर्गिक उपाय असल्याने शरीरावर कोणतेही साइड इफेक्ट्स होत नाहीत आणि त्यामुळे कोणत्याही वयोगटातील व्यक्तींनी त्याचा सहज अवलंब करू शकतो. जर तुम्हाला तुमची त्वचा अधिक निरोगी, चमकदार आणि मऊ हवी असेल, तर या सोप्या आणि घरगुती उपायाचा जरूर विचार करा.