त्वचेवर बटाटा लावण्याचे फायदे
लग्नसराईच्या दिवसांमध्ये सर्वच महिला आणि मुलींना सुंदर दिसायचं असतं. या दिवसांमध्ये त्वचेवर आलेले टॅनिंग, पिंपल्स, पिगमेंटेशन घालवण्यासाठी पार्लरमध्ये जाऊन महिला फेशिअल, क्लीनअप इत्यादी अनेक गोष्टी करतात. मात्र यामुळे त्वचेवर काहीकाळ सुंदर प्रभाव दिसून येतो. पण पुन्हा एकदा एकदा त्वचा होती तशीच होऊन जाते. अनेक महिला सुंदर आणि गोऱ्यापान त्वचेसाठी बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या ब्युटी क्रीम, फेअरनेस क्रीम इत्यादी अनेक गोष्टी लावतात. पण यामध्ये असलेले हानिकारक त्वचेची गुणवत्ता खराब करून टाकतात, ज्यामुळे कालातंराने त्वचेवर पिंपल्स, पिगमेंटेशन, ऍक्ने इत्यादी अनेक समस्या वाढू लागतात.(फोटो सौजन्य – iStock)
त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या ट्रीटमेंट किंवा इतर कोणत्याही गोष्टी लावण्याऐवजी घरगुती उपाय करून त्वचेची गुणवत्ता सुधारावी. याशिवाय त्वचेला वरून पोषण देण्याऐवजी आतून पोषण देणे आवश्यक आहे. यामुळे त्वचा दीर्घकाळ निरोगी आणि तरुण राहते. आज आम्ही तुम्हाला त्वचेवर आलेले पिंपल्स, ऍक्ने, पुरळ, पिगमेंटेशन घालवण्यासाठी बटाट्याचा रसाचा कशा पद्धतीने वापर करावा? यामुळे त्वचेला नेमके काय फायदे होतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
बटाट्याचा रस त्वचेसाठी अतिशय फायदेशीर आहे. यामध्ये विटामिन सी भरपूर प्रमाणात आढळून येते. त्यामुळे बटाट्याच्या रसाचा किंवा सालीचा वापर तुम्ही त्वचेसाठी करू शकता. त्वचेसाठी खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी बटाट्याचा रस अतिशय प्रभावी आहे. नॅचरल ब्लिचिंग एजंट असलेला बटाटा त्वचेवर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी अतिशय गुणकारी आहे. बटाटा त्वचेवर लावल्यामुळे टॅनिंग, पिंपल्स कमी होतात .
बटाट्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स त्वचेवरील पिगमेंटेशन, टॅनिंग, सनबर्न घालवण्यासाठी मदत करतो. चेहऱ्यावर आलेले काळे डाग कायमचे घालवण्यासाठी बटाट्याच्या रसाचा वापर करावा. बटाटा त्वचेवर डाग पूर्णपणे घालवून चेहरा डागविरहित होतो. डोळ्यांभोवती आलेले काळे डाग घालवण्यासाठी बटाट्याच्या रसाचा वापर करा.
चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स कमी करण्यासाठी करा स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांचा वापर, त्वचेवर येईल चमक
त्वचेवर बटाट्याचा वापर करण्यासाठी सर्वप्रथम बटाटा स्वच्छ धुवून त्याची साल काढून घ्या. साल काढून घेतल्यानंतर बटाटा किसून घ्या. किसून घेतलेला बटाट्यामधील रस काढून कापसाच्या साहाय्याने त्वचेवर लावून ठेवा. 15 मिनिटं झाल्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा. यामुळे चेहऱ्यावरील टॅनिंग कमी होऊन त्वचा स्वच्छ आणि उजळदार दिसेल. हा उपाय आठवडाभर नियमित केल्यास त्वचेवरील टॅनिंग आणि पिगमेंटेशन कमी होईल.