Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोमट पाणी पिऊनसुद्धा पोट स्वच्छ होत नाही? उपाशी पोटी करा ‘या’ पदार्थांचे सेवन, आतड्यांमधील घाण होईल मिनिटांमध्ये स्वच्छ

बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवल्यानंतर अनेक लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र यामुळे आरोग्यासंबंधित गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता असते बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवल्यानंतर कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, जाणून घेऊया सविस्तर.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 20, 2025 | 05:30 AM
बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी घरगुती उपाय

बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी घरगुती उपाय

Follow Us
Follow Us:

शरीरात साचून राहिलेले विषारी घटक आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहेत. यामुळे पोटासंबंधित समस्या, आतड्यांसंबंधित समस्या, बद्धकोष्ठता इत्यादी अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे नेहमी पोट स्वच्छ असणे आवश्यक आहे. पोट स्वच्छ न झाल्यामुळे मानसिक संतुलन बिघडून जाते. शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता, शारीरिक हालचालींचा अभाव, जंक फूडचे अतिसेवन, मानसिक तणाव, अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम पचनक्रियेवर दिसून येतो. पचनक्रिया बिघडल्यानंतर पोट स्वच्छ न होणे, मलावष्टंभाची समस्या इतर अनेक समस्या त्रास देऊ लागतात. काहींना सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी कोमट किंवा गरम पाणी पिण्याची सवय असते. मात्र या पाण्याचे सेवन करूनसुद्धा शरीरातील घाण स्वच्छ होत नाही.(फोटो सौजन्य – iStock)

दातांवरील पिवळा थर स्वच्छ करण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा ५ रुपयांच्या लिंबाचा वापर, अंधारातही दिसतील पांढरेशुभ्र दात

पोट स्वच्छ न झाल्यामुळे पोट गच्च वाटणे, खाण्यापिण्याच्या इच्छा न होणे, मानसिक तणाव इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. अनेक लोक बद्धकोष्ठतेचा समस्या उद्भवल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य औषध घेतात. मात्र नेहमी नेहमी गोळ्या औषध घेणे किडनीच्या आरोग्यासाठी चांगले नाही. म्हणून आज आम्ही तुम्हाला बद्धकोष्ठता, पोट आणि आतड्यांमधील घाण स्वच्छ करण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. हे घरगुती उपाय करून तुम्ही तात्काळ आराम मिळवू शकता. चला तर जाणून घेऊया.

कोमट पाणी आणि लिंबू:

पोटातील घाण स्वच्छ होण्यासाठी सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी कोमट पाण्यात लिंबू टाकून प्यावे. यामुळे पोट आणि आतड्यांमधील घाण स्वच्छ होईल आणि तुम्हाला आराम मिळेल. लिंबामध्ये आढळून येणारे सायट्रिक ऍसिड आतड्या स्वच्छ करण्यासाठी मदत करतात. तसेच शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातात. आतड्यांच्या निरोगी आरोग्यासाठी नियमित कोमट पाण्यात लिंबू टाकून प्यावे.

फायबरयुक्त अन्नपदार्थ:

रोजच्या आहारात फायबर युक्त अन्नपदार्थांचे नियमित सेवन करावे. यामध्ये फळे, धान्य, पालेभाज्या, फळभाज्या, सुकामेवा इत्यादी पदार्थांचे सेवन करावे. याशिवाय सफरचंद, केळी, पेरू आणि पालक इत्यादी पदार्थांचे नियमित सेवन केल्यास पचनसंबंधित समस्या कधीच उद्भवणार नाही. फायबरयुक्त अन्नपदार्थ आतड्यांचे कार्य सुरळीत ठेवण्यासाठी मदत करतात.

पोटातून सतत गुरगुरण्याचा आवाज येतो? मग ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा आराम, पोटाला मिळेल आराम

भरपूर पाणी पिणे:

शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे नियमित भरपूर पाणी प्यावे. पाणी प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि ताजेतवाने दिसते. पाण्याचे सेवन केल्यामुळे आतड्या मोकळ्या राहतात आणि पचनसंस्था चांगली राहते. तसेच आहारात नारळ पाणी, सूप, फळांचा रस, हर्बल चहा इत्यादींचे सेवन करावे.

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Home remedies to relieve constipation consume these foods to clean the dirt in the intestines

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2025 | 05:30 AM

Topics:  

  • constipation home remedies
  • Digestion Problem
  • stomach health

संबंधित बातम्या

Constipation Home Remedies: बद्धकोष्ठता, ब्लोटिंग आणि आतड्यांची सूज कमी करण्यासाठी एक सोपा पदार्थ
1

Constipation Home Remedies: बद्धकोष्ठता, ब्लोटिंग आणि आतड्यांची सूज कमी करण्यासाठी एक सोपा पदार्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.