दातांवरील पिवळा थर स्वच्छ करण्यासाठी 'या' पद्धतीने करा ५ रुपयांच्या लिंबाचा वापर
दैनंदिन आहारात सतत तेलकट किंवा तिखट पदार्थांच्या अतिसेवनामुळे दातांवर पिवळा थर किंवा पांढरा थर साचून राहण्यास सुरुवात होते. कोणत्याही पदार्थांचे सेवन केल्यानंतर दात स्वच्छ न केल्यास दात खराब होतात. दातांवर साचून राहिलेल्या पिवळेपणामुळे अनेकदा चार लोकांमध्ये गेल्यानंतर लाजिरवाण्यासारखे वाटू लागते. हसताना किंवा बोलताना श्वसनाची दुर्गंधी आल्यानंतर लाज वाटू लागते. त्यामुळे दात स्वच्छ असणे आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – iStock)
पोटातून सतत गुरगुरण्याचा आवाज येतो? मग ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा आराम, पोटाला मिळेल आराम
दातांवर साचून राहिलेला पिवळा थर कमी करण्यासाठी लिंबाच्या रसाचा वापर करावा. लिंबाच्या रसात असलेले गुणधर्म दातांवरील पिवळा थर कमी करून दात स्वच्छ करण्यासाठी मदत करतात. लिंबाच्या सालीमध्ये सायट्रिक ऍसिड आढळून येते. याशिवाय तुम्ही आल्याचा सुद्धा वापर दात स्वच्छ करण्यासाठी करू शकता.
दात स्वच्छ करण्यासाठी लिंबाच्या सालीसोबत तुम्ही आल्याचा सुद्धा वापर करू शकता. आल्याचा वापर केल्यामुळे दातांवर साचून राहिलेले बॅक्टेरिया नष्ट होतात आणि दात स्वच्छ होतात. आल्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट गुणधर्म दात स्वच्छ करून दातांवर लागलेली कीड किंवा इतर विषाणू नष्ट करतात. यासाठी वाटीमध्ये लिंबाचा रस घेऊन त्यात आल्याचा रस टाकून मिक्स करा. त्यानंतर तयार केलेले मिश्रण दातांवर लावून ब्रश किंवा हातांच्या बोटांनी दातांवर लावून घ्या. त्यानंतर हलक्या हातानी मसाज करा. हा उपाय नियमित केल्यास दातांवरील पिवळेपणा कमी होऊन दात स्वच्छ होतील. मात्र तयार केलेले मिश्रण दातांवर जास्त वेळ ठेवू नये.
दात स्वच्छ करण्यासाठी तुम्ही लिंबाच्या रसासोबत बेकिंग सोड्याचा सुद्धा वापर करू शकता. यासाठी वाटीमध्ये बेकिंग सोडा घेऊन त्यात लिंबाचा रस टाकून मिक्स करा. त्यानंतर तयार केलेले मिश्रण ब्रशवर घेऊन दात स्वच्छ करा. यामुळे दातांवर साचलेली घाण निघून जाईल आणि तोंडातील दुर्गंधी कमी होईल. लिंबाच्या रसात नैसर्गिकरित्या आम्लयुक्त गुणधर्म आढळून येतात.
सकाळी उठताच हातपाय पडलेत पिवळे, समजून जा नसांमध्ये घुसलेय घाणेरडे कोलेस्ट्रॉल; काय आहेत लक्षणे
लिंबाच्या सालीचा वापर तुम्ही दात स्वच्छ करण्यासाठी करू शकता. यामुळे दातांवरील घाण कमी होईल आणि दात पांढरेशुभ्र दिसू लागतील. लिंबाच्या सालीचा वापर करताना सगळ्यात आधी त्यातील रस काढून घ्या. त्यानंतर साल दातांवर घासा आणि गुळण्या करून दात स्वच्छ करा. हा उपाय आठवडाभर नियमित केल्यास दात पांढरे होतील. लिंबाच्या सालीमध्ये नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्म आढळून येतात.