पोटातील गुरगुरण्याचा आवाज येत असल्यास हे घरगुती उपाय
दैनंदिन आहारात बदल झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. आहारात होणारे बदल, जंक फूडचे अतिसेवन आणि अपुऱ्या झोपेचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. अनेकदा पोट स्वच्छ न झाल्यामुळे किंवा इतर कोणत्याही कारणांमुळे पोटातून सतत गुरगुरण्याचा आवाज येऊ लागतो. पोटातून येणारा गुरगुरण्याचा आवाज अनेक वेळा दैनंदिन आरोग्यावर परिणाम करतो. त्यामुळे शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्यावरसुद्धा परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे दैनंदिन आहारात चुकीच्या पदार्थांचे सेवन करण्याऐवजी शरीराला पचन होईल अशाच पदार्थांचे सेवन करावे. पोटात निर्माण झालेला गॅस कमी करण्यासाठी अनेक लोक मेडिकलमधून गोळ्या औषध घेतात.(फोटो सौजन्य – iStock)
सकाळी उठताच हातपाय पडलेत पिवळे, समजून जा नसांमध्ये घुसलेय घाणेरडे कोलेस्ट्रॉल; काय आहेत लक्षणे
मात्र, पोटासंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर अधिककाळ दुर्लक्ष केल्यामुळे या समस्या आणखीन गंभीर होण्याची शक्यता असते. पोटातून गुरगुरण्याचा आवाज येऊ लागल्यानंतर अनेक लोक डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करतात. मात्र तरीसुद्धा पोटातून गुरगुरण्याचा आवाज येत असल्यास घरगुती उपाय करावे. घरगुती उपाय केल्यामुळे पोटात साचून राहिलेली घाण स्वच्छ होते आणि पोटासंबंधित समस्या दूर होतात. गॅस, अॅसिडिटी आणि अपचन यांसारख्या समस्या दूर करण्यासाठी घरगुती उपाय करावे.
पोटातून गुरगुरण्याचा आवाज येऊ लागल्यानंतर किंवा पोट बिघडल्यानंतर पचनास जड पदार्थ खाण्याऐवजी हलक्या पदार्थांचे सेवन करावे. त्यामध्ये तुम्ही दह्याचे सेवन करू शकता. दही खाल्यामुळे शरीराला थंडावा मिळतो. शरीरातील उष्णता कमी होते आणि पचनाच्या समस्या दूर होतात. बद्धकोष्ठता, अपचन इत्यादी अनेक समस्यांपासून आराम मिळतो. पचनक्रिया उसुधारण्यासाठी दह्याचे सेवन करावे.
आयुर्वेदामध्ये त्रिफळा खाणे अतिशय फायदेशीर मानले जाते. त्रिफळा पावडरचे सेवन केल्यामुळे बिघडलेली पचनक्रिया सुधारून शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात. त्रिफळा पावडर बनवण्यासाठी आवळा, बहेडा आणि हिरडा इत्यादी पदार्थांचा वापर केला जातो. रात्री झोपण्याआधी कोमट पाण्यात त्रिफळा पावडर टाकून मिक्स करून घ्या. या पाण्याचे नियमित सेवन केल्यास शरीर डिटॉक्स होईल आणि पोट, आतड्यांमध्ये साचून राहिलेली घाण स्वच्छ होईल.
कोमट पाण्यात लिंबू मिक्स करून प्यायल्यामुळे अपचन, गुरगुरण्याचा आवाज कमी होईल. लिंबू पाण्यात असलेले घटक शरीरातील उष्णता कमी करून शरीरात थंडावा निर्माण होतो. लिंबू पाणी शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकतात. ज्या व्यक्तींना पोटासंबंधित समस्या असतील अशांनी लिंबू पाण्याचे नियमित सेवन करावे. लिंबाचा रस आणि मध मिक्स करून प्यायल्यामुळे अनेक फायदे होतील.
आल्यामध्ये असलेले दाहक विरोधी गुणधर्म शरीरासाठी अतिशय महत्वाचे आहेत./ आल्याच्या पाण्याचे किंवा रसाचे सेवन केल्यास शरीरातील हानिकारक घटक बाहेर पडून जातील आणि पोट स्वच्छ होईल. पोटाला आराम देण्यासाठी आल्याच्या रसाचे नियमित सेवन करावे. सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी आल्याचा रस प्यावा.