Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फुफ्फुसांना चिटकून राहिलेला घट्ट कफ काढून टाकण्यासाठी करून पहा ‘हे’ घरगुती उपाय, खोकला होईल गायब

छातीमध्ये किंवा फुफ्फुसांमध्ये कफ साचून राहिल्यानंतर श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला फुफ्फुसांमध्ये साचून राहिलेला घट कफ काढून टाकण्यासाठी घरगुती उपाय सांगणार आहोत. हे उपाय नक्की करून पहा.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 07, 2024 | 12:01 PM
छातीमध्ये साचून राहिलेला कफ काढून टाकण्यासाठी घरगुती उपाय

छातीमध्ये साचून राहिलेला कफ काढून टाकण्यासाठी घरगुती उपाय

Follow Us
Close
Follow Us:

हिवाळ्याच्या दिवसांमध्ये वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. सर्दी, खोकला, ताप इत्यादी अनेक आजार वाढू लागतात. या आजारांमुळे आरोग्य आधिक बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसांमध्ये आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी. खाण्यापिण्याच्या सवयिंकडे लक्ष देऊन आहारात बदल करावे. हिवाळ्यात सर्दी, खोकला झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने लगेच औषध उपचार करावे. पण डॉक्टरांच्या गोळ्या घेतल्यानंतर सुद्धा काहीवेळा कफ फुफ्फुसांमध्ये तसाच राहतो. ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो, तर अनेकदा खोकला आल्यामुळे फुफ्फुस दुखू लागतात. छातीमध्ये कफ साचून राहिल्यामुळे छातीमध्ये सतत जडपणा जाणवतो आणि श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो.(फोटो सौजन्य-istock)

हे देखील वाचा: कॅन्सरशी लढणाऱ्या योध्दयांसाठी आणि जागृकतेसाठी साजरा केला जातोय ‘National Cancer Awareness Day’

गोळ्या औषध घेतल्यामुळे खोकला कमी होतो, मात्र छातीमध्ये कफ तसाच साचून राहतो. छातीमध्ये कफ साचून राहिल्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. छातीमध्ये आणि फुफ्फुसांमधील खोकला कमी करण्यासाठी गोळ्या औषधांसोबतच घरगुती उपाय सुद्धा करावे. घरगुती उपाय केल्यानंतर छातीमध्ये साचून राहिलेला कफ मोकळा होण्यास मदत होते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला फुफ्फुसांमध्ये चिटकून राहिलेला घट कफ काढून टाकण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावे, याबद्दल सांगणार आहोत.

छातीमध्ये साचून राहिलेला कफ काढून टाकण्यासाठी घरगुती उपाय:

कफ काढून टाकण्यासाठी घरगुती उपाय

हळदीचे दूध:

हळद आणि दुधामध्ये असलेले गुणधर्म फुफ्फुसांमध्ये साचून राहिलेला घट कफ मोकळा करण्यासाठी मदत करतात. हळदीमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे कफ कमी होतो. एक ग्लास गरम दुधात हळद टाकून प्यायल्यास छातीमध्ये आणि फुफ्फुसांमध्ये अडकून राहिलेला कफ कमी होण्यास मदत होईल. हळदीचे सेवन केल्यामुळे अन्ननलिका स्वच्छ होण्यास मदत होते.

मध आणि आल्याचा रस:

आल्यामध्ये असलेले दाहक विरोधी गुणधर्म छातीमध्ये साचून राहिलेला कफ मोकळा करण्यासाठी मदत करतात. आलं आणि मध हे दोन्ही पदार्थ आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहेत. मधाचे सेवन केल्यास छातीमध्ये साचून राहिलेला कफ निघून जाण्यास मदत होईल. एक चमचा आल्याचा रस घेऊन त्यात मध मिक्स करून खावे. हा उपाय सकाळी लवकर उठून करावा.

वाफ घेणे:

सर्दी किंवा खोकला झाल्यानंतर सगळ्यात आधी वाफ घेण्याचा सल्ला दिला जातो. गरम पाण्यात एक थेंब निलगिरीचे तेल घालून वाफ घ्यावी. श्वसनमार्ग स्वच्छ होतो आणि कफ विरघळण्यास मदत होते. सर्दी खोकला झाल्यानंतर वाफ घेतल्यास नाक, गळा, आणि छातीत साठलेला कफ मोकळा होण्यास मदत होते. त्यामुळे दिवसभरातून दोन ते तीन वेळा वाफ घ्यावा.

हे देखील वाचा:रात्री जेवल्यानंतर अ‍ॅसिडीटी होते? मग सकाळी उठल्यानंतर नियमित करा ‘या’ फळाचे सेवन, अ‍ॅसिडीटी होईल कमी

कफ काढून टाकण्यासाठी घरगुती उपाय

तुळशीचा रस:

तुळशीच्या पानांचा रस बनवण्यासाठी गरम पाण्यात तुळशीची पाने टाकून उकळवून घ्या. त्यानंतर पाणी गाळून त्यात मध मिक्स करून प्यायल्यास सर्दी, खोकला कमी कमी होईल. तुळशीच्या पाण्याचे सेवन केल्यास श्वास घेण्यास त्रास निर्माण होणार नाही. या रसाचे सेवन केल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Home remedies to remove cough what to eat to remove dirt from lungs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2024 | 09:59 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • healthy lungs

संबंधित बातम्या

शरीरात वाढलेले पित्त नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात करा कोकमचा समावेश, मळमळ- उलट्या होतील कमी
1

शरीरात वाढलेले पित्त नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात करा कोकमचा समावेश, मळमळ- उलट्या होतील कमी

राज्यात संसर्गजन्य आजारांच्या रुग्ण संख्येत मोठी वाढ! अवकाळी-पूर-दुष्काळासोबत डेंग्यू-मलेरियाचा धोका
2

राज्यात संसर्गजन्य आजारांच्या रुग्ण संख्येत मोठी वाढ! अवकाळी-पूर-दुष्काळासोबत डेंग्यू-मलेरियाचा धोका

कॅन्सर रुग्णांना मोठा धक्का! PMJAY पॅनेलमधून ३०० डॉक्टरांना वगळले, भविष्यात निर्माण होऊ शकते तत्ज्ञांची कमतरता
3

कॅन्सर रुग्णांना मोठा धक्का! PMJAY पॅनेलमधून ३०० डॉक्टरांना वगळले, भविष्यात निर्माण होऊ शकते तत्ज्ञांची कमतरता

उन्हाळ्यात ‘या’ लोकांनी आवर्जून करावे फणसाच्या गऱ्यांचे सेवन, जाणून घ्या शरीराला होणारे भरमसाट फायदे
4

उन्हाळ्यात ‘या’ लोकांनी आवर्जून करावे फणसाच्या गऱ्यांचे सेवन, जाणून घ्या शरीराला होणारे भरमसाट फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.