
पावसाळ्यात वारंवार आजारी पडताय? 'या' संसर्गजन्य गंभीर आजारांपासून स्वतःचा बचाव करा, रोगप्रतिकारशक्ती होईल कमकुवत
पावसाळ्यात होणारे आजार?
साथीच्या आजारांपासून बचाव कसा करावा?
पावसाळ्यात साथीचे आजार का होतात?
राज्यासह संपूर्ण देशभरात मुसळधार पाऊस पडत आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. याशिवाय पावसाळ्यात साथीचे आजार झपाट्याने पसरतात आणि शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत करून टाकतात. सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी, अंगदुखी यासारख्या समस्या उद्भवल्यानंतर फारसे लक्ष दिले जात नाही. पण कालांतराने आजारपण वाढल्यानंतर शरीराला हानी पोहचते तर अनेकदा मृत्यू सुद्धा होऊ शकतो. थकवा आणि अशक्तपणा वाढल्यानंतर खूप जास्त त्रास होतो. अनेक ठिकाणी नदी नाल्यांचे पाणी साचून राहते, ज्याच्या परिणामामुळे रोगराई वाढते. पावसाळा ऋतू विविध किटाणू आणि जिवाणूच्या वाढीसाठी अतिशय पोषक मानला जातो.(फोटो सौजन्य – AI)
पावसाळ्यात साथीच्या आजारांची लागण झपाट्याने होते. याशिवाय जंक फूड किंवा दूषित पाण्याचे सेवन केल्यास पोटाचे विकार होऊन आरोग्य बिघडते. पोटाचे विकार झाल्यानंतर उलट्या, जुलाब होऊन थकवा, अशक्तपणा वाढतो. त्यामुळे पावसाळ्यात शरीराची काळजी घेणे फार आवश्यक आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पावसाळ्यात कोणत्या आजारांचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढतो, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. त्यामुळे शरीरात कोणतीही लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे आवश्यक आहे.
सर्दी, खोकला किंवा ताप आल्यानंतर बऱ्याचदा दुर्लक्ष केले जाते. पण असे न करता वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. कारण निमोनिया झाल्यानंतर थंडी वाजणे, ताप येणे, खोकताना कफ बाहेर पडणे आणि श्वासोच्छवास घेताना त्रास इत्यादी लक्षणे निमोनिया झाल्यानंतर दिसून येतात. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे, पावसात भिजणे, अंगावर ओले कपडे जास्त वेळ राहणे, खाण्यापिण्याच्या सवयी, फ्रीजमधील पाणी पिणे इत्यादी कारणांमुळे निमोनियासारख्या गंभीर आजारांची लागण होण्याची शक्यता असते.
पावसाळ्यात मच्छराच्या प्रादुर्भाव वाढल्यामुळे मलेरियाची लागण होण्याची भीती असते. त्यामुळे पावसाळ्यात मच्छरांपासून शरीराचा बचाव करणे फार आवश्यक आहे. शरीरात खोकला, ताप, श्वासोच्छवास करताना त्रास होणे, घसा खवखवणे, खोकताना कफ बाहेर पडणे, अशक्तपणा, अंगदुखी, अंगात ताप असताना घाम येणे इत्यादी लक्षणे दिसू लागल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे.
पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर प्रामुख्याने उद्भवणारा आजार म्हणजे डेंग्यू. हा अतिशय धोकादायक आजार आहे, कारण यामुळे मृत्यू होण्याची शक्यता असते. डेंग्यू झाल्यानंतर शरीरातील पांढऱ्या पेशी नष्ट होऊन जातात, ज्याच्या परिणामामुळे रक्ताचे पाणी होते. ताप, सर्दी, हाडे आणि सांधेदुखी, डोळ्यांमध्ये जळजळ होणे इत्यादी लक्षणे दिसू लागल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत.
Ans: पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, व्हायरल ताप, लेप्टोस्पायरोसिस, टायफॉईड, गॅस्ट्रोएन्टेरायटिस आणि सर्दी-खोकल्यासारखे संसर्गजन्य आजार होण्याचा धोका वाढू शकतो.
Ans: स्वच्छ पाणी पिणे, ताजे व शिजवलेले अन्न खाणे, हात स्वच्छ धुणे, डासांपासून संरक्षण करणे, पाणी साचू न देणे आणि वैयक्तिक स्वच्छता राखणे महत्त्वाचे आहे.
Ans: संतुलित आहार, हंगामी फळे-भाज्या, पुरेशी झोप, नियमित व्यायाम, पुरेसे पाणी पिणे आणि ताणतणाव नियंत्रणात ठेवणे रोगप्रतिकारशक्तीला आधार देऊ शकते.