Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुसळधार पावसात भिजून आल्यानंतर ‘या’ पद्धतीने घ्या शरीराची काळजी, अन्यथा आजारपण वाढून रोगप्रतिकारशक्ती होईल कमी

पावसात भिजून आल्यानंतर शरीराची काळजी घेणे फार आवश्यक आहे. जास्त वेळ ओल्या कपड्यांवर बसून राहू नये, यामुळे सर्दी, खोकला वाढून आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. चला तर जाणून घेऊया सविस्तर.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 02, 2026 | 08:12 AM
मुसळधार पावसात भिजून आल्यानंतर 'या' पद्धतीने घ्या शरीराची काळजी

मुसळधार पावसात भिजून आल्यानंतर 'या' पद्धतीने घ्या शरीराची काळजी

Follow Us
Follow Us:

पावसाळ्यात शरीराची काळजी कशी घ्यावी?
पावसाळ्यात इन्फेक्शनचा धोका कशामुळे वाढतो?
पावसात भिजून आल्यानंतर अशी घ्या काळजी?

संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडत आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी नदी, नाले मोठ्या प्रमाणावर वाहत आहेत. मुसळधार पडणाऱ्या पावसात सगळ्यांचं भिजायला खूप जास्त आवडते. कामावरून येताना किंवा इतर वेळी बाहेर गेल्यानंतर पाऊस पडल्यास भिजायला होतेच. थंडगार पावसात भिजण्याचा मोह अनेकांना अजिबात आवरत नाही. त्यामुळे शरीर पूर्णपणे ओलेचिंब होऊन जाते. पण सतत पडणारा पाऊस आजारपण वाढवतो आणि शरीराला साथीच्या आजारांची लागण होते. संसर्गजन्य आजारांची लागण शरीराला झाल्यानंतर रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन अशक्तपणा, थकवा वाढतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला मुसळधार पावसात भिजून आल्यानंतर शरीराची कशा पद्धतीने काळजी घ्यावी, याबद्दल माहिती सांगणार आहोत. योग्य काळजी न घेतल्यास आरोग्य बिघडण्याची शक्यता असते.(फोटो सौजन्य – AI)

Bad Cholesterol: हेल्दी लाइफस्टाइल असूनही वाढतंय खराब कोलेस्ट्रॉल? जाणून घ्या खरी कारणं

पावसाळ्यात या पद्धतीने घ्या आरोग्याची काळजी:

पावसात भिजून आल्यानंतर सगळ्यात आधी अंगावरचे ओले कपडे काढून टाकावेत. ओले कपडे जास्त वेळ अंगावर राहिल्यामुळे सर्दी किंवा ताप येऊन थंडी वाजण्याची शक्यता असते. त्यामुळे भिजून आल्यानंतर सगळ्यात आधी अंगावरचे ओले कपडे लगेच काढून टाकावेत. ओल्या कपड्यांमुळे शरीराचे तापमान अचानक कमी होऊन जाते. तसेच ओलसरपणामुळे त्वचेला बुरशीजन्य संसर्ग होण्याचा धोका असतो. त्यामुळे कपडे लगेच काढून टाकावे.

पाऊस पडण्यास सुरुवात झाल्यानंतर अनेक ठिकाणी पाणी साचून राहण्यास सुरुवात होते. याच पाण्यात घाणीचे विषाणू आणि नाल्यातील पाणी, सांडपाणी इत्यादी प्रकारचे जंतू आणि प्रदूषण असते. हे विषाणू थेट शरीरात प्रवेश करण्याची शक्यता असते. त्यामुळे बाहेरून आल्यानंतर गरम पाण्याची अंघोळ करणे आवश्यक आहे. अंघोळ करताना पाण्यात मीठ टाकल्यास शरीरावरील जंतू निघून जातात आणि तापमान नियंत्रणात राहण्यास मदत होते. अंघोळ झाल्यानंतर शरीर आणि केस टॉवेलने व्यवस्थित कोरडे करून घ्यावेत.

थंड वातावरणात शरीर आतून उबदार ठेवण्यासाठी गरमागरम चहा किंवा काढा प्यावा. गरम पाणी, गवती चहा, आल्याचा चहा किंवा तुळशी-मिरपूड टाकलेला कढा प्यायल्यास शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारते आणि घशाच्या संसर्गापासून बचाव होतो. त्यामुळे पावसाळ्यात कोणत्याही तिखट किंवा तेलकट पदार्थांचे सेवन करण्याऐवजी घरी बनवलेले पदार्थ खावेत.

Hangover Tips: रात्री दारू पिऊन झालाय हँगओव्हर, करा सोपे उपाय

अनेकदा छत्री असून सुद्धा भिजायला होते.रस्त्यावर साचून राहिलेल्या पाण्यात जास्त वेळ चालल्यामुळे पायांना बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊ शकते. त्यामुळे घरी आल्यानंतर पाय स्वच्छ पाण्याने धुवून कोरडे करा आणि मॉइश्चरायझर किंवा अँटी-फंगल पावडर लावा. यामुळे पायांवर जमा झालेले विषाणू नष्ट होऊन जातील. ओल्या केसांमुळे डोके दुखणे, सर्दी होणे किंवा टाळूला संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे केस व्यवस्थित कोरडे करून घ्यावेत. टॉवेलने किंवा ड्रायरने केस व्यवस्थित वाळवून नंतरच झोपावे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पावसात भिजल्यानंतर सर्वप्रथम काय करावे?

    Ans: ओले कपडे त्वरित बदलावेत, शरीर व्यवस्थित कोरडे करावे आणि शक्य असल्यास कोमट पाण्याने अंघोळ करावी. त्यामुळे शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यास मदत होऊ शकते.

  • Que: पावसात भिजल्यानंतर गरम पेय पिणे फायदेशीर ठरते का?

    Ans: कोमट पाणी, सूप किंवा इतर गरम पेये घेतल्याने शरीराला उब मिळू शकते आणि आराम वाटू शकतो.

  • Que: पावसात भिजल्याने रोगप्रतिकारशक्ती कमी होते का?

    Ans: केवळ पावसात भिजल्याने रोगप्रतिकारशक्ती थेट कमी होत नाही. मात्र थंडी, ओले कपडे आणि संसर्गजन्य जंतूंचा संपर्क यामुळे काही लोकांमध्ये आजारी पडण्याचा धोका वाढू शकतो.

Web Title: Got soaked in heavy rain follow these essential body care tips to stay healthy and reduce the risk of illness

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 08:12 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • monsoon care
  • Monsoon Season

संबंधित बातम्या

No Sugar Benefits:साखर खाणे पूर्णपणे बंद केल्यास १४ दिवसांमध्ये लिव्हर-मेंदूच्या आरोग्यात दिसून येतील सकारात्मक बदल
1

No Sugar Benefits:साखर खाणे पूर्णपणे बंद केल्यास १४ दिवसांमध्ये लिव्हर-मेंदूच्या आरोग्यात दिसून येतील सकारात्मक बदल

HPV Vaccination: उद्याच्या कर्करोगापासून आजच मिळवा संरक्षण! सायन रुग्णालयात HPV लसीकरण मोहिमेला यश, १,००० डोसची मोहीम पूर्ण
2

HPV Vaccination: उद्याच्या कर्करोगापासून आजच मिळवा संरक्षण! सायन रुग्णालयात HPV लसीकरण मोहिमेला यश, १,००० डोसची मोहीम पूर्ण

Kidney Health: लघवीच्या रंगात दिसलेल्या ‘या’ बदलांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! इनफेक्शन वाढल्यास किडनी- लिव्हर होईल कायमचे निकामी
3

Kidney Health: लघवीच्या रंगात दिसलेल्या ‘या’ बदलांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! इनफेक्शन वाढल्यास किडनी- लिव्हर होईल कायमचे निकामी

World Heart Day:‘नॉर्मल’ रेंजच्या पलीकडे वैयक्तिक LDL-C ध्येय माहित असणे हृदयाच्या आरोग्यासाठी का आहे महत्त्वाचे
4

World Heart Day:‘नॉर्मल’ रेंजच्या पलीकडे वैयक्तिक LDL-C ध्येय माहित असणे हृदयाच्या आरोग्यासाठी का आहे महत्त्वाचे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.